Scholarship Program: बारावी पास आहात? उत्तम शिष्यवृत्ती मिळवण्याची संधी, सविस्तर माहिती वाचा
Best Scholarship Program : हा स्कॉलरशिप प्रोग्राम परदेशात जाऊन इंजिनिअयरींगचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष आहे. टाटा ट्रस्टकडून ही स्कॉलरशिप देण्यात येते.
Best Scholarship Program for 12th Pass : देशात केंद्र सरकार (Central Govt.) आणि विविध राज्यांच्या सरकारकडून (State Govt.) आर्थिक परिस्थिती वाईट असलेल्या विद्यार्थ्यांना आधार आणि मदत म्हणून स्कॉलरशिप म्हणजे, शिष्यवृत्ती दिली जाते. अनेक हुशार मुले आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. पण आपल्या देशात अशा काही शिष्यवृत्ती आहेत, ज्याद्वारे हुशार आणि अभ्यासू विद्यार्थी त्यांचं स्वप्न पूर्ण करू शकतात. बारावी पास विद्यार्थ्यांसाठी हे स्कॉलरशिप प्रोग्राम आहेत. या शिष्यवृत्तीबाबतची अधिक माहिती जाणून घ्या.
KVPY किशोर वैज्ञानिक शिष्यवृत्ती
किशोर वैज्ञानिक शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून देण्यात येते. भविष्यात शास्त्रज्ञ होण्याची इच्छा असणाऱ्या तसेच विज्ञान विषयात आवड असणाऱ्या विद्यार्थ्यसाठी हा स्कॉलरशिप प्रोगाम आहे. बारावीमध्ये 75 टक्क्यांहून अधिक गुण मिळालेले विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत. ही शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी KVPY परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल.
AICTE शिष्यवृत्ती
किशोर वैग्यानिक शिष्यवृत्ती कार्यक्रम हा शिष्यवृत्ती कार्यक्रम मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाद्वारे चालवला जातो. अशा शिष्यवृत्ती कार्यक्रमाच्या माध्यमातून तंत्रज्ञान क्षेत्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिली जाते. यासाठी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना एआयसीटीई मान्यताप्राप्त संस्थांमध्ये प्रवेश घ्यावा लागतो. तुमची या शिष्यवृत्ती कार्यक्रमासाठी निवड झाल्यास, तुम्हाला पदवी आणि पदविका अभ्यासक्रमांसाठी 2000 रुपयांचा शिष्यवृत्ती कार्यक्रम दिला जातो. आणि 1000 शिष्यवृत्ती दिव्यांग मुलींसाठी राखीव आहेत.
रतन टाटा शिष्यवृत्ती
ही शिष्यवृत्ती खास परदेशात अभियांत्रिकीचे म्हणजे इंजिनीअरींग शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. टाटा ट्रस्टकडून केवळ गुणवत्तेच्या आधारावर विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येते. जे विद्यार्थी भारतीय नागरिक आहेत आणि त्यांनी कॉर्नेल विद्यापीठातून पदवी मिळवली आहे, तेच विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतात. टाटा ट्रस्ट शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत दरवर्षी सुमारे 20 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते आणि त्यांचा परदेशातील इंजिनीअरींगच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च टाटा ट्रस्टमार्फत केला जातो.
केंद्रीय क्षेत्र शिष्यवृत्ती
केंद्रीय क्षेत्र शिष्यवृत्ती केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मानव संसाधन विभागामार्फत (Human Resource Department) देण्यात येते. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती देण्यात येते. बारावी परीक्षेत 80 टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळविणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतात. यासोबतच देशातील कोणत्याही नामांकित संस्थेत नियमित बिजनेस केलेल्यांनाच ही शिष्यवृत्ती देण्यात येते. या शिष्यवृत्तीमधील 50 टक्के जागाल मुलींसाठी राखीव आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
CBSE Exam 2023: सीबीएसई बोर्डाची परीक्षा 15 फेब्रुवारीपासून; लवकरच जारी होणार प्रवेशपत्र
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI