News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट
X

सविस्तर माहिती : पंतप्रधान पीक विमा योजना

FOLLOW US: 
Share:
पुणे : राज्याच्या कृषी आयुक्तलयाने सर्व जिल्ह्यांमध्ये ‘पंतप्रधान पीक विमा योजना’ राबवण्यास सुरुवात केली आहे. 2017 च्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी 31 जुलै 2017 पर्यंत या योजनेत सहभागी व्हावं, असं आवाहनही कृषी आयुक्तलायकडून करण्यात आले आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांचे पाच गट करण्यात आले आहेत. या पाच गटांसाठी विमा कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुठल्या जिल्ह्यात कोणती विमा कंपनी योजना राबवणार?
  • नॅशनल इन्शुरन्स कं. लि., मुंबई – लातूर, अकोला, हिंगोली, सांगली, ठाणे, पालघर
  • भारतीय कृषी विमा कं. लि., मुंबई – उस्मानाबाद, नांदेड, औरंगाबाद, नंदुरबार, सिंधुदुर्ग, रायगड
  • दि ओरिएन्टल इन्शुरन्स कं. लि. – जालना, जळगाव, वाशिम, सोलापूर, भंडारा, सातारा
  • रिलायन्स जनरल इन्शुरन्स कं. लि., मुंबई – परभणी, अमरावती, वर्धा, धुळे, गडचिरोली, गोंदिया
  • भारतीय कृषी विमा कं. लि. मुंबई – बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, कोल्हापूर
  • (अद्याप कंपनी निश्चित नाही.) – बीड, अहमदनगर, नाशिक, पुणे, रत्नागिरी
कोणत्या पिकासाठी किती रक्कम भरावी लागणार? Chart 1 Chart 2 विमा संरक्षणाच्या बाबी :
  1. पीक पेरणीपासून काढणीपर्यंत कालावधीत उत्पादनात येणारी घट
  2. पीक पेरणीपूर्ण/लावणीपूर्व नुकसान भरपाई
  3. हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत नुकसना भरपाई
  4. काढणी पश्चात नुकसान
  5. स्थानिक नैसर्गिक आपत्ती
पीक विमा योजनेसाठी कोणती कागदपत्र आवश्यक?
  • योजनेसाठी अर्ज करताना बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आपला फोटो असलेलं बँक पासबुक आणि आधारकार्डाची झेरॉक्स सादर करणं गरजेचं आहे.
  • आधारकार्ड नसल्यास पुढील ओळखपत्र सादर करावे लागतील : मतदान ओळखपत्र, किसान क्रेडिटकार्ड, नरेगा जॉबकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स
पंतप्रधान पीक विमा योजनेत सहाभागी होऊ इच्छिणाऱ्या कर्जदार शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याला आधार्डकार्ड जोडणं आवश्यक आहे, तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना आधारकार्ड संलग्न असलेल्या बँक खात्याची माहिती योजनेत सहभागी होताना द्यावी लागणार आहे.
Published at : 21 Jun 2017 06:05 PM (IST)

आणखी महत्वाच्या बातम्या

Horoscope Today 14 January 2026: आज मकर संक्रातचा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! सूर्यदेवाच्या कृपेने प्रश्न लागतील मार्गी, आजचे राशीभविष्य वाचा

Horoscope Today 14 January 2026: आज मकर संक्रातचा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! सूर्यदेवाच्या कृपेने प्रश्न लागतील मार्गी, आजचे राशीभविष्य वाचा

योग हा जीवनशैलीचा अविभाज्य भाग, चांगल्या आरोग्यासाठी सातत्य आणि आहारावर भर द्या : बाबा रामदेव 

योग हा जीवनशैलीचा अविभाज्य भाग, चांगल्या आरोग्यासाठी सातत्य आणि आहारावर भर द्या : बाबा रामदेव 

धक्कादायक! 35 रुपयावरुन दोघांमध्ये भांडण, वाद सोडवायला गेलेल्या व्यक्तिलाच लावली आग  

धक्कादायक! 35 रुपयावरुन दोघांमध्ये भांडण, वाद सोडवायला गेलेल्या व्यक्तिलाच लावली आग  

BMC Election : गोरेगावात ठाकरेंना धक्का! शिंदे दाम्पत्यांचा सकाळी 11 वाजता भाजपमध्ये प्रवेश ठरला, आदल्या रात्री 11 वाजता शिंदेंनी हेरला

BMC Election : गोरेगावात ठाकरेंना धक्का! शिंदे दाम्पत्यांचा सकाळी 11 वाजता भाजपमध्ये प्रवेश ठरला, आदल्या रात्री 11 वाजता शिंदेंनी हेरला

BMC : निवडणुकीसाठी पालिका प्रशासन सज्ज! 85 लाख मतदार माहिती चिठ्ठ्यांचे वितरण पूर्ण; उर्वरित 15 लाख चिठ्ठ्या मतदान केंद्रांवर उपलब्ध

BMC : निवडणुकीसाठी पालिका प्रशासन सज्ज! 85 लाख मतदार माहिती चिठ्ठ्यांचे वितरण पूर्ण; उर्वरित 15 लाख चिठ्ठ्या मतदान केंद्रांवर उपलब्ध

टॉप न्यूज़

संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग

संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग

मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता

मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता

झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी

झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी

Kolhapur ZP Election: कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?

Kolhapur ZP Election: कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?