एक्स्प्लोर

Madhya Pradesh Crime : नको तो व्हिडीओ पाहून सख्या बहिणीसोबत गैरकृत्य, त्यानंतर आईसमोरच गळा घोटला; नराधम भावाचं धक्कादायक कृत्य

Madhya Pradesh Crime : मध्य प्रदेशातील धक्कादायक घटनेनं संपूर्ण देश हादरला. एका अल्पवयीन मुलानं आधी स्वतःच्या 9 वर्षांच्या बहिणीवर बलात्कार केला. त्यानंतर त्यानं तिची गळा आवळून हत्या केली.

Madhya Pradesh Crime : मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) घडलेल्या घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. ज्या भावाच्या हातावर राखी बांधून बहीण त्याच्याकडून तिचं आयुष्यभर रक्षण करण्याचं वचन घेते, त्याच नराधम भावानं आपल्या सख्या 9 वर्षांच्या बहिणीला वासनेचं शिकार बनवल्याचं प्रकरण समोर आलं आहे. हा नराधम एवढ्यावरच थांबला नाही, तर घडला प्रकरा उघडकीस येऊ नये म्हणून यानं स्वतःच्या सख्या बहिणीचा गळा आवळून जीव घेतला आहे. ही धक्कादायक घटना उघड झाल्यानंतर संपूर्ण देश हादरला आहे. काळीज पिळवटणारी बाब म्हणजे, आरोपी भाऊ अल्पवयीन असून त्याचा गुन्हा लपवण्यासाठी आईनं पुरावेदेखील नष्ट केल्याचं उघड झालं आहे. 

मध्य प्रदेशातील धक्कादायक घटनेनं संपूर्ण देश हादरला. एका अल्पवयीन मुलानं आधी स्वतःच्या 9 वर्षांच्या बहिणीवर बलात्कार केला. त्यानंतर त्यानं तिची गळा आवळून हत्या केली. या घटनेपूर्वी आरोपीनं मोबाईलवर अश्लिल व्हिडीओ पाहिल्याचंही समोर आलं आहे. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण दडपण्यासाठी आणि आरोपीच्या बचावासाठी आई आणि इतर बहिणीनं अनेक पुरावे नष्ट केल्याचंही पोलीस तपासात समोर आलं आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही भीषण घटना 24 एप्रिल रोजी घडली. तब्बल 3 महिन्यांच्या कसून चौकशीनंतर पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला. याप्रकरणात 50 जणांची चौकशी करण्यात आली आहे. तसेच, आरोपींची सखोल चौकशी सुरू आहे. तसेच, तांत्रिक पुराव्याच्या आधारे या प्रकरणात आणखी काही गोष्टींची उकल होऊ शकते, असंदेखील पोलिसांनी सांगितलं आहे. पीडितेचा 13 वर्षांचा भाऊ, तिची आई आणि दोन 17-18 वर्षांच्या बहिणींना याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांकडून याप्रकरणी चौघांची चौकशी सुरू आहे.

घराच्या अंगणात सापडला मुलीचा मृतदेह 

पोलीस अधीक्षक विवेक सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 एप्रिल रोजी जिल्ह्यातील जावा पोलीस स्टेशन परिसरात 9 वर्षीय मुलीवर बलात्कार झाला, त्यानंतर तिची गळा आवळून हत्या करण्यात आली. या प्रकरणी मृत तरुणीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पीडितेचा मृतदेह तिच्या घराच्या अंगणातून सापडला, जिथे ती घटनेच्या वेळी झोपली होती. कुटुंबीयांची कसून चौकशी केल्यानंतर पीडितेचा 13 वर्षीय भाऊ रात्री तिच्या शेजारीच झोपल्याचं उघड झालं.

अश्लिल व्हिडीओ पाहून सख्या बहिणीवर अत्याचार 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलानं मोबाईल फोनवर अश्लिल व्हिडीओ पाहिल्यानंतर आपल्या बहिणीवर बलात्कार केला. ज्यावेळी पीडितेनं आपल्या वडिलांना ही घटना सांगणार असल्याचं आरोपीला सांगितलं, त्यावेळी घाबरून आरोपीनं बहिणीचा गळा आवळून तिचा जीव घेतला. त्यानंतर आपल्या आईला उठवून सर्व घटना सांगितली. तेव्हाही पीडित मुलगी जीवंत होती. पण, बहिण अजूनही जिवंत आहे, हे समजल्यावर आरोपी भावानं पुन्हा तिचा गळा घोटला आणि तिचा जीव घेतला. धक्कादायक गोष्ट म्हणजे, हे सर्व आईच्या डोळ्यांसमोर होत होतं. 

पोलिसांना गुंगारा देण्यासाठी पुरावे नष्ट केले 

आरोपीची आई आणि दोन बहिणींना संपूर्ण प्रकार समजला. त्यावेळी लोकांना आणि पोलिसांना गुंगारा देण्यासाठी सर्वात आधी अंथरुणं बदलली. त्यानंतर ज्यावेळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यावेळी त्यांनी सांगितलं की, विषारी किडा चावल्यामुळे मुलीचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. त्यानंतर मुलीवर बलात्कार झाला आणि त्यानंतर तिची हत्या झाल्याचं रिपोर्टमधून समोर आलं. आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक एसआयटी गठीत करण्यात आली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
Hyderabad Crime News: हॉटेलच्या खोलीत CA चा दुर्दैवी अंत, यूट्यूबवर हेलियम गॅस हुंगण्याचे व्हिडीओ पाहिले अन्...; चिठ्ठीतून चक्रावणारं कारण समोर
हॉटेलच्या खोलीत CA चा दुर्दैवी अंत, यूट्यूबवर हेलियम गॅस हुंगण्याचे व्हिडीओ पाहिले अन्...; चिठ्ठीतून चक्रावणारं कारण समोर
Nagpur Crime: नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
Chhatrapati Sambhajinagar Crime: शाळेत मधल्या सुट्टीत धक्का लागला, विद्यार्थ्याने पॉकेट चाकूने वर्गातच चौघांवर वार केले, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना
शाळेत मधल्या सुट्टीत धक्का लागला, विद्यार्थ्याने पॉकेट चाकूने वर्गातच चौघांवर वार केले, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delimitation Bill: सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Mumbai Pune Expressway Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर व्हिडीओ
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर VIDEO
Raj Thackeray in Nashik press conference: नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
Mumbai Railway: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
Bhandara Crime News: भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
Nagpur Crime: नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
Embed widget