(Source: ECI | ABP NEWS)
युवतीकडून मारहाण, अपमान सहन न झाल्याने शेतकऱ्याने संपवलं जीवन; तिघांविरुद्ध गुन्हा
गावाकडे परत येत असताना युवतीसह तिच्या दोन सहकाऱ्यांनी केलेल्या मारहाणीमुळे व्यथित झाल्यामुळेच संदीपने जीवन संपवल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे

यवतमाळ : लागवडीसाठी बियाणे खरेदी करून गावाकडे परत येत असताना झालेल्या मारहाणीच्या घटनेतून शेतकरी (Farmer) तरुण मनातून खचला होता. बियाणे खरेदीकडून आपल्या घाटंजी (Ghatangi) गावाकडे येत असताना वळणावर एका मित्रासोबत बोलत उभा राहिला. पण, मित्राच्या बाजूलाच उभ्या असलेल्या एका युवतीसह अन्य दोघांनी बेदम मारहाण करत कपडे फाडले. याबाबतची माहिती मिळताच, त्याचा लहान भाऊ तिथे आले. लहान भावाने मोठ्या भावाला घरी परत नेले. मात्र, दुसऱ्यादिवशी हा अपमान जिव्हारी लागल्याने युवा शेतकऱ्याने शेतात जाऊन विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यातील बायपास रोडवर घडली आहे. या घटनेनं गावात खळबळ उडाली असून पोलिसांत (Police) गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. संदीप जयवंतराव नारनवरे(40) असे मृत शेतकऱ्यांचे नाव आहे.
गावाकडे परत येत असताना युवतीसह तिच्या दोन सहकाऱ्यांनी केलेल्या मारहाणीमुळे व्यथित झाल्यामुळेच संदीपने जीवन संपवल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. संदीपने विष प्राशन केल्यानंतर त्याला उपचारासाठी घाटंजीच्या रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
बियाणे खरेदी करुन गावाकडे परत येताना पांढुर्णा ते यवतमाळ बायपास रोडवर ही मारहाणीची घटना घडली होती. संदीप जयवंतराव नारनवरे(40) असे मृत शेतकऱ्यांचे नाव आहे. तर, सीमरन पाटील (20), करण गौतम पाटील दोन्ही रा.चोरंबा, प्रशांत चौधरी रा. घाटंजी अशी मारहाण करणाऱ्यांची नावे आहेत. याप्रकरणी, पोलिसांत गुनाहे दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लहान भाऊ मंगेश नारनवरे याने घाटंजी पोलिसात फिर्याद दिली. आपला भाऊ संदीप नारनवरेला सीमरन पाटील, करण पाटील, प्रशांत चौधरी या तिघांनी मारहाण करून अपमानित केल्यानेच त्याने आत्महत्या केली असून, ते आपल्या भावाच्या मृत्यूस कारणीभूत आहेत, अशी फिर्याद संदीपच्या भावाने दिली होती. याप्रकरणी घाटंजी पोलिसांनी विविध कलमान्वये तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
हेही वाचा
अहमदाबाद विमानाचा व्हिडिओ शुट करणारा आर्यन पोलिसांच्या ताब्यात; घराबाहेर माध्यम प्रतिनिधींच्या रांगा
शेतजमिनीचा वाद, माजी आमदाराची फॉर्च्युनर कुऱ्हाडीने फोडली; गुन्हा दाखल
























