एक्स्प्लोर

Yavatmal Crime News: यवतमाळमध्ये किरकोळ वाद विकोपाला! चक्क बेसबॉल स्टिकने डाकसेवकाला जबर मारहाण; घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद

Yavatmal Crime News: किरकोळ वादातून एका डाकसेवकाला जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ज्यामध्ये दोन अज्ञात हल्लेखोराने बेसबॉल स्टीकने प्रहार करून डाकसेवकाला गंभीर इजा केली आहे.

यवतमाळ: रस्त्यावरील कार बाजूला घेण्याच्या किरकोळ वादातून एका डाकसेवकाला जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळमध्ये उघडकीस आला आहे.  दोन अज्ञात हल्लेखोराने बेसबॉल स्टीकने प्रहार करून डाकसेवकाच्या डोक्याला गंभीर इजा केली आहे. ही भयावह घटना यवतमाळच्या (Yavatmal Crime) वीर सावरकर चौक परिसरात रविवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी डाकसेवकाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात दोघाविरुद्ध अवधूतवाडी पोलिसांनी (Yavatmal Police) खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

डोक्यावर बेसबॉल स्टिकने हल्ला केला 

राहुल रमेश कराळे (राहणार दुबे ले आऊट, जुना उमरसरा,यवतमाळ) असे जखमी डाकसेवकाची नाव आहे. तो गिलाणी नगर येथील उप. डाकघरात कार्यरत आहेत. घटनेच्या वेळी राहुल त्याच्या कारमधून (एमएच 29 बीव्ही 9739) दाते कॉलेज चौकाकडून आर्णी रोडकडे जात होता. त्यावेळी पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या दोघांनी वाहन आडवे लावून राहुल सोबत वाद घातला. त्यानंतर राहुल आणि अज्ञात दोघे राहुलला शिवीगाळ करत त्यांनी मारहाण करायला सुरुवात केली.

दरम्यान, त्यातील एकाने कारमधील बेसबॉल स्टीकने राहुलच्या डोक्यावर प्रहार केला. ज्यामध्ये राहुल गंभीर जखमी झाला आहे. सध्या राहुलला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, त्याच्या डोक्याची कवटी फुटल्याचे सांगण्यात आले आहे. राहुलची प्रकृती सध्या गंभीर असून याप्रकरणी मंगळवारी 24 जानेवारीला रमेश कराळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलिसांनी दोघांवर गुन्हे दाखल केले आहे. 

घटना सीसीटिव्ही कॅमेर्‍यात कैद

या घटनेत मारहाण केल्याचा संपूर्ण प्रकार सीसीटिव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. या व्हीडिओच्या साह्याने पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. मात्र केवळ किरकोळ कारणावरून डाकसेवक राहुलला केलेल्या जबर मारहानीमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

वर्षभरात एकूण दीडशे आरोपी 'मोस्ट वाँटेड  लिस्टमध्ये 

गेल्या वर्षभरात यवतमाळ जिल्ह्यात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याचे चित्र आहे. सतत गुन्हेगारी कारवाया करणारे आणि नंतर पसार होणारे आरोपी संख्येने अधिक आहेत. या आरोपींची मागील वर्षीपेक्षा यंदा संख्या वाढली आहे. एकूणच गुन्हे वाढत असल्याने आरोपींचा सहभागी त्यात वाढत असल्याचे दिसून येते. वाढत्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान सध्या पोलीसांपुढे  उभे ठाकले आहे मागील वर्षभरात एकूण दीडशे आरोपी 'मोस्ट वाँटेड'च्या लिस्टमध्ये आहे. त्यापैकी 45 आरोपी मिळाले असून,95 जणांचा अजूनही शोध सुरू आहे. फरार आरोपींचीही स्थिती अशीच आहे. त्यावरही विशेष काम पोलिसांकडून केले जात आहे. यात कितपत यश येते, हे कायदा व सुव्यवस्थेसाठी महत्त्वाचे आहे.

महत्वाच्या इतर बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Stylish Look : गॉगल,मफ्लर, शूज ते कडक ब्लेजर...स्टार्सना टक्कर देणारा भुजबळांचा लूक!Chhagan Bhujbal NCP Adhiveshan Shirdi :नाराजी दूर झाल्याचा प्रश्नच नाही...छगन भुजबळांचं मोठं वक्तव्यAjit Pawar Shirdi : राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी अजितदादा शिर्डीत, साईंच्या चरणी नतमस्तकNCP Ajit Pawar Shirdi : 500 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण,दादांची रांगोळी; NCPच्या शिबिराची तयारी पाहा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Chhagan Bhujbal : पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Embed widget