एक्स्प्लोर

Yavatmal Crime News: भर दिवसा तरुणाला, तर पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीला संपवलं; दोन हत्येच्या घटनेने यवतमाळ हादरलं! 

Yavatmal Crime News:  दोन खूनांच्या घटनांनी यवतमाळ जिल्हा हादरला आहे. यवतमाळ शहरात वस्तीत भरदिवसा खूनाची (Crime News) घटना घडली. तर दुसरी घटना वडगाव जंगल पोलीस ठाणेअंतर्गत यावली (कारेगाव) येथे घडली.

Yavatmal Crime News:  दोन खूनांच्या घटनांनी यवतमाळ जिल्हा हादरला आहे. यवतमाळ शहरात वस्तीत भरदिवसा खूनाची (Crime News) घटना घडली. तर दुसरी घटना वडगाव जंगल पोलीस ठाणेअंतर्गत यावली (कारेगाव) येथे घडली. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीची तलवारीने हत्या केली. 

यवतमाळ शहरातील घटनेतील मृतकाचे नाव मनीष शेंद्रे (रा.पाटीपुरा) असून वडगाव (जंगल) येथील घटनेत बेबीबाई दलुराम राठोड (56), असे मृत महिलेचे नाव आहे. यवतमाळ शहरातील चांदणी चौकात 30 वर्षीय युवकाचा चाकूने भोसकून हत्या करण्यात आला.  मृतकाच्या पोटावर आणि मानेवर वार केले. यातच मनीष शेंद्रे यांचा मृत्यू झाला. कळंब चौक परिसरामध्ये काही महिन्यापूर्वी वाद झाला होता. त्यामध्ये बंदुकीमधून गोळ्या झाडून एका युवकाची हत्या करण्यात आली होती. याच प्रकरणाशी मृतकाचा संबंध होता. आरोपीला पकडण्यासाठी पोलिस विभागाचे तीन पथक तत्काळ पाठविण्यात आले आहे. 

चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीची केली हत्या 

तर दुसऱ्या घटनेत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीची तलवारीने हत्या केली. ही घटना वडगाव जंगल पोलीस ठाणे अंतर्गत यावली (कारेगाव) येथे घडली. वडील आईवर तलवारीने हल्ला करत आहेत, हे पाहून मुलगा आईच्या बचावासाठी धावला. त्याने वडिलांचा प्रतिकार केला असता त्यात आरोपी वडील खाटेवरपडून गंभीर जखमी झाले. त्याला यवतमाळ शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. बेबीबाई दलूराम राठोड (56), असे मृत महिलेचे नाव आहे. तर दलुराम गुलाब राठोड (59), असे आरोपीचे नाव आहे. दलुराम हा संशयी प्रवृत्तीचा होता. यातूनच त्याने  बेबीबाईसोबत वाद घातला.

दोन हत्येच्या घटनेने यवतमाळ हादरलं! 

वाद विकोपाला जाऊन त्याने घरातील तलवार काढून बेबीबाईवर वार केला. आईचा आवाज ऐकून शेजारच्या खोलीतील मुलगा संदीप दलुराम राठोड हा तेथे धावून आला. वडलांच्या तावडीतून आईला वाचविण्यासाठी त्याने वडिलांना जोरात धक्का दिला. यात दलुराम घरातील खाटेवर कोसळला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तर दुसरीकडे बेबीबाईला वर्मी घाव बसल्याने जागेवरच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. मात्र या दोन घटनेने यवतमाळ शहर हादरले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

आमचे प्रेमसंबंध, जबरदस्ती नव्हे, मी मर्जीने आले, भिगवणच्या तरुणीचा VIDEO समोर, अपहरण नाट्यात ट्विस्ट!
आमचे प्रेमसंबंध, जबरदस्ती नव्हे, मी मर्जीने आले, भिगवणच्या तरुणीचा VIDEO समोर, अपहरण नाट्यात ट्विस्ट!
Crime News: दिवा लावून सात फेरे घेतले; पॉवरच्या गोळ्या घेऊन बनला हैवान, गर्लफ्रेंडचा जीव घेतल्यानंतरही थांबला नाही, मृतदेहासोबत अत्याचार केलेल्या पियूषचा खळबळजनक दावा
दिवा लावून सात फेरे घेतले; पॉवरच्या गोळ्या घेऊन बनला हैवान, गर्लफ्रेंडचा जीव घेतल्यानंतरही थांबला नाही, मृतदेहासोबत अत्याचार केलेल्या पियूषचा खळबळजनक दावा
Bhigwan Kidnapping Case: भिगवण तरुणी अपहरण प्रकरणात महत्त्वाची अपडेट; दीड महिन्यात तरुणाशी 11 वेळा बोलली, मुलीने 8 वेळा मेसेज पाठवला, व्हॉटसॲप कॉलने गूढ वाढवलं
भिगवण तरुणी अपहरण प्रकरणात महत्त्वाची अपडेट; दीड महिन्यात तरुणाशी 11 वेळा बोलली, मुलीने 8 वेळा मेसेज पाठवला, व्हॉटसॲप कॉलने गूढ वाढवलं
Pune Crime News: बुधवार पेठेत पोलिसांची छापेमारी; सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ११ बांगलादेशी महिला, दलालांसह कुंटणखाना चालवणाऱ्यांविरोधात कारवाईचा दिला आयुक्तांनी इशारा
बुधवार पेठेत पोलिसांची छापेमारी; सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ११ बांगलादेशी महिला, दलालांसह कुंटणखाना चालवणाऱ्यांविरोधात कारवाईचा दिला आयुक्तांनी इशारा

व्हिडीओ

Bhiwandi Mahapalika भाजपने महापौरपदाचा उमेदवार बदलला,नारायण चौधरींऐवजी स्नेहा मेहुल पाटील यांना संधी
Imtiyaz Jaleel on Muslim Reservation : मुस्लिम आरक्षणावरुन रणकंदन,जलील यांचं मौलानांना थेट आव्हान
Mulund Metro Slab  : मुलुंडमधील मेट्रो स्लॅब अपघात प्रकरण, 2 कंपन्याना काळ्या यादीत टाकणार
Sanjay Raut PC : अजितदादांची 'ती' फाईल ते अमित शाहांवर निशाणा, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषद
Asawari Jagdale Pune : एबीपी माझाच्या बातमीनंतर आसावरी जगदाळे यांना नोकरी मिळाली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 फेब्रुवारी 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 फेब्रुवारी 2026 | बुधवार
Ishan Kishan: मैदानात फटके देताच अन् इशान किशनची गर्लफ्रेंड सुद्धा पहिल्यांदाच समोर येताच पाकिस्तानमध्ये गेल्या तीन दिवसांपासून भलताच सर्च ट्रेंड समोर
मैदानात फटके देताच अन् इशान किशनची गर्लफ्रेंड सुद्धा पहिल्यांदाच समोर येताच पाकिस्तानमध्ये गेल्या तीन दिवसांपासून भलताच सर्च ट्रेंड समोर
आमचे प्रेमसंबंध, जबरदस्ती नव्हे, मी मर्जीने आले, भिगवणच्या तरुणीचा VIDEO समोर, अपहरण नाट्यात ट्विस्ट!
आमचे प्रेमसंबंध, जबरदस्ती नव्हे, मी मर्जीने आले, भिगवणच्या तरुणीचा VIDEO समोर, अपहरण नाट्यात ट्विस्ट!
Gopichand Padalkar : मुलीवर जबरदस्ती करुन व्हिडिओ केला, पोलिसांना, घरच्यांना व्हिडिओ पाठवला म्हणजे त्यांचं धाडस वाढतंय, गोपीचंद पडळकरांचा आरोप
जनआक्रोश मोर्चापूर्वी मुलीचा व्हिडिओ समोर आला; मुलीवर जबरदस्ती करत व्हिडिओ तयार केला, गोपीचंद पडळकरांचा आरोप
Share Market Update: शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 283 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 1.8 लाख कोटींची कमाई   
शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 283 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 1.8 लाख कोटींची कमाई   
Raj Thackeray Meets Eknath Shinde: राज ठाकरे थेट भाईंच्या भेटीला ठाण्यातील नंदनवनात पोहोचले, कोणता 'मनसे' शब्द दिला? भेटीचा तपशील समोर
राज ठाकरे थेट भाईंच्या भेटीला ठाण्यातील नंदनवनात पोहोचले, कोणता 'मनसे' शब्द दिला? भेटीचा तपशील समोर
Crime News: दिवा लावून सात फेरे घेतले; पॉवरच्या गोळ्या घेऊन बनला हैवान, गर्लफ्रेंडचा जीव घेतल्यानंतरही थांबला नाही, मृतदेहासोबत अत्याचार केलेल्या पियूषचा खळबळजनक दावा
दिवा लावून सात फेरे घेतले; पॉवरच्या गोळ्या घेऊन बनला हैवान, गर्लफ्रेंडचा जीव घेतल्यानंतरही थांबला नाही, मृतदेहासोबत अत्याचार केलेल्या पियूषचा खळबळजनक दावा
Satara : साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सत्ता स्थापन करणार, एकनाथ शिंदेंचा ग्रीन सिग्नल, मकरंद पाटील-शंभूराज देसाईंच्या भेटीत निर्णय 
मकरंद पाटील- शंभूराज देसाईंंच्या भेटीत एकनाथ शिंदेंचा ग्रीन सिग्नल, सातारा जिल्हा परिषदेवर शिवसेना- राष्ट्रवादीची सत्ता येणार
Embed widget