एक्स्प्लोर

Yavatmal News : पोलिसांना सांगून सांगून वैतागले, भाजप आमदार स्वत:च मटका अड्ड्यावर धाडीसाठी पोहोचले!

भाजप आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी स्वतः एका मटका अड्ड्यावर धाड टाकून अवैध धंद्यांची पोलखोल केलीय. पोलिसांनी या प्रकरणी लक्ष घालून सर्व अवैध धंद्यांना आळा घालावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

Yavatmal News : यवतमाळच्या (Yavatmal) कोळसा खदाणीमुळे वणी (Wani) तालुक्याला राज्यभरात ओळखले जाते. परंतु, आता वणी शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढले असल्याचे निदर्शनात आले आहे. त्यात मटका, जुगार, खुले आम सुरू असून, याकडे पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे, असा आरोप भाजप आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार (MLA Sanjivreddy Bodkurwar) यांनी केलाय. याबाबत वणी पोलीस आणि वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती देऊनही पोलीस याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी स्वतः या मटका अड्ड्यावर धाड टाकून या सर्व प्रकाराची पोलखोल केलीय.

दिवसभर मजूर काम केल्यानंतर मटका जुगार खेळून पैसे हरतात. यामुळे अनेकांचे कुटुंब उघड्यावर येत आहे. दुसरीकडे गुन्हेगारीला उत येत आहे. असे असताना असे प्रकार खुलेआम सुरू असून पोलीस प्रशासन याकडे का लक्ष देत नाही, असा प्रश्न या निमित्याने निर्माण झाला आहे. त्यामुळे आतातरी मटका ,जुगार सारखे अवैध धंदे बंद होणार का, असा प्रश्न या निमित्याने उपस्थित केला जात आहे.

भाजप आमदार स्वत:च मटका अड्ड्यावर धाडीसाठी पोहोचले!

यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात मोठ्याप्रमाणात कोळसा खदान आहेत. त्यामुळे राज्यासह परराज्यातील मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग या ठिकाणी वास्तव्यास आहे. दिवसभर मोलमजूरी करून मिळालेल्या पैशातून मटक, जुगार, सट्टा, इत्यादि अवैध धंदे खुलेआम सुरू असल्याचे निदर्शनात आले आहे. परिणामी, यातून अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी मिळत असल्याची शंकाही उपस्थित करण्यात आली आहे. अलिकडेच जिल्ह्यात आयपीएल क्रिकेटवर जुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी धाड टाकून हा प्रकार उघडकीस आणला होता. हे प्रकरण ताजे असताना जिल्ह्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले आहे. अशाच एका जुगार अड्ड्यावर आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी स्वतः धाड टाकून हा प्रकार उघडकीस आणला आहे. पोलिसांनी या प्रकरणी लक्ष घालून जिल्ह्यातील सर्व अवैध धंद्यांना आळा घालावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. 

तुरुंग अधिकार्‍यासह कर्मचाऱ्यांला आठ न्यायाधीन बंद्यांची मारहाण

यवतमाळ येथील जिल्हा कारागृहातील प्रतिबंधित क्षेत्रात जाण्यास मज्जाव केल्याने 8 न्यायाधीन बंद्यांनी चांगलाच राडा घातलाय. यात तुरुंग अधिकारी धनाजी हुलगुंडे आणि कर्मचारी सुरज मसराम यांना जबर मारहाण केलीय. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची ही खळबळजनक घटना यवतमाळच्या कारागृहात घडलीय. दरम्यान, कारागृह अधिकारी धनाजी हुलगुंडे यांनी यवतमाळच्या अवधूतवाडी पोलिसात आठ जणांविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. ओंकार कुंडले, जुनेद फारुक शेख, सतपाल रुपनवार, नैनेश निकम, आकाश भालेराव, सोहेल मेहबूब बादशाह शेख, मनोज शिरशीकर, नामदेव नाईक अशी हल्ला करणाऱ्या संशयित आरोपींची नावे आहेत.      

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राहुल गांधींनी धारावी झोपडपट्टीत केलं शिवणकाम, शिलाई मशिनवर पाय; हाती सुई-दोरा अन् ब्रँडेड पर्स
राहुल गांधींनी धारावी झोपडपट्टीत केलं शिवणकाम, शिलाई मशिनवर पाय; हाती सुई-दोरा अन् ब्रँडेड पर्स
बाप रे... विठुरायाच्या पंढरीत तब्बल 147 किलो गांजा जप्त; अमली पदार्थाविरुद्ध पोलिसांची मोठी कारवाई
बाप रे... विठुरायाच्या पंढरीत तब्बल 147 किलो गांजा जप्त; अमली पदार्थाविरुद्ध पोलिसांची मोठी कारवाई
वडिलांना औरंगजेबाची उपमा, सुनिल तटकरेंचा लेक संतापला; शिवसेना आमदार थोरवेंचा व्हिडिओ दाखवला
वडिलांना औरंगजेबाची उपमा, सुनिल तटकरेंचा लेक संतापला; शिवसेना आमदार थोरवेंचा व्हिडिओ दाखवला
शॉकिंग! 'या' मठाचा मीच पुजारी अन् मालक म्हणत 64 वर्षीय शिवाचार्य स्वामींना लोखंडी गजाने जबर मारहाण
शॉकिंग! 'या' मठाचा मीच पुजारी अन् मालक म्हणत 64 वर्षीय शिवाचार्य स्वामींना लोखंडी गजाने जबर मारहाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anil Parab Speech : राज्यपालांचं भाषण कबुतराच्या भोXXX ठेवतो, अनिल परब यांचं UNCUT भाषणJob Majha : केंद्रीय औद्योगिक दलात नोकरीची संधी, अटी काय?Maharashtra Superfast | राज्यातील बातम्यांचा आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06PM 06 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल गांधींनी धारावी झोपडपट्टीत केलं शिवणकाम, शिलाई मशिनवर पाय; हाती सुई-दोरा अन् ब्रँडेड पर्स
राहुल गांधींनी धारावी झोपडपट्टीत केलं शिवणकाम, शिलाई मशिनवर पाय; हाती सुई-दोरा अन् ब्रँडेड पर्स
बाप रे... विठुरायाच्या पंढरीत तब्बल 147 किलो गांजा जप्त; अमली पदार्थाविरुद्ध पोलिसांची मोठी कारवाई
बाप रे... विठुरायाच्या पंढरीत तब्बल 147 किलो गांजा जप्त; अमली पदार्थाविरुद्ध पोलिसांची मोठी कारवाई
वडिलांना औरंगजेबाची उपमा, सुनिल तटकरेंचा लेक संतापला; शिवसेना आमदार थोरवेंचा व्हिडिओ दाखवला
वडिलांना औरंगजेबाची उपमा, सुनिल तटकरेंचा लेक संतापला; शिवसेना आमदार थोरवेंचा व्हिडिओ दाखवला
शॉकिंग! 'या' मठाचा मीच पुजारी अन् मालक म्हणत 64 वर्षीय शिवाचार्य स्वामींना लोखंडी गजाने जबर मारहाण
शॉकिंग! 'या' मठाचा मीच पुजारी अन् मालक म्हणत 64 वर्षीय शिवाचार्य स्वामींना लोखंडी गजाने जबर मारहाण
Video : तुमच्या औलादी कोणत्या शाळेत शिकल्या? भय्याजी जोशींचं समर्थन करत सदावर्तेंचा ठाकरेंना बोचरा सवाल
Video : तुमच्या औलादी कोणत्या शाळेत शिकल्या? भय्याजी जोशींचं समर्थन करत सदावर्तेंचा ठाकरेंना बोचरा सवाल
30 वर्षांपूर्वीच गाव सोडलं, पण भूमिपुत्रासाठी एकवटले बार्शीकर; देशमुखांच्या न्यायासाठी कडकडीत बंद
30 वर्षांपूर्वीच गाव सोडलं, पण भूमिपुत्रासाठी एकवटले बार्शीकर; देशमुखांच्या न्यायासाठी कडकडीत बंद
Nashik Weather Update : मार्चच्या सुरुवातीलाच नाशिककरांना उन्हाची झळ, अंगाची अक्षरशः लाहीलाही; बदलत्या वातावरणामुळे नागरिक हैराण
मार्चच्या सुरुवातीलाच नाशिककरांना उन्हाची झळ, अंगाची अक्षरशः लाहीलाही; बदलत्या वातावरणामुळे नागरिक हैराण
Chine Budget : चीनच्या सुरक्षा बजेटमध्ये 7.2 टक्क्यांची वाढ, भारतासाठी धोका का आहे? चार मोठी कारणे  
चीनच्या सुरक्षा बजेटमध्ये 7.2 टक्क्यांची वाढ, भारतासाठी धोका का आहे? चार मोठी कारणे  
Embed widget