![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
वरळी हिट अँड रन प्रकरण : मिहीर शहाचं गाडी चालवत होता, अपघातातील जखमी प्रदीप यांचा दावा; मद्यप्राशन करुन गाडी चालवल्याचं समोर
Worli BMW Accident Case : वरळी हिट अँड रन प्रकरणात मिहीर शहाचं गाडी चालवत होता, असा मोठा खुलासा अपघातातील जखमी प्रदीप नाखवा यांनी केला आहे. दरम्यान, मिहीरने मद्यप्राशन करुन गाडी चालवल्याचं समोर आलं आहे.
![वरळी हिट अँड रन प्रकरण : मिहीर शहाचं गाडी चालवत होता, अपघातातील जखमी प्रदीप यांचा दावा; मद्यप्राशन करुन गाडी चालवल्याचं समोर Worli hit and run case Mihir was driving Shah s car Pradeep Nakhawa who was injured in accident makes big revelation In front of drunk driving Mumbai Crime News वरळी हिट अँड रन प्रकरण : मिहीर शहाचं गाडी चालवत होता, अपघातातील जखमी प्रदीप यांचा दावा; मद्यप्राशन करुन गाडी चालवल्याचं समोर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/d5cbc45e4e193af03fc65d5652d80c021720351731421322_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : पुण्यातील (Pune) हिट अँड रन (Worli Hit And Run Case) प्रकरणाची पुनरावृत्ती मुंबईच्या वरळीत (Worli) घडली आहे. वरळीत हिट अँड रनच्या घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे. चारचाकीने पती-पत्नीला टक्कर मारली आणि फरफटत नेलं. बीएमडब्ल्यूच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणानंतर आरोपी मिहीर शहा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणात मिहीरच्या ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे.
मिहिरला गाडी चालवताना प्रदीप यांनी पाहिलं
बीएमडब्ल्यूने प्रदीप नाखवा आणि कावेरी नाखवा या दाम्पत्याला टक्कर मारली आणि फरफटत नेलं. दरम्यान, अपघातानंतर प्रदीप नाखवा यांनी मिहिर शहाला गाडी चालवताना पाहिलं असल्याचा मोठा खुलासा केला आहे. अपघातानंतर कावेरी या गाडीखाली असल्याचे पाहिल्यानंतर प्रदीप यांनी मिहिरला गाडी थांबवण्याची विनंती केली, मात्र मिहिरने गाडी पळवली. गाडीबरोबर कावेरी या फरफटत जात होत्या, असं जखमी प्रदीप नाखवा यांनी सांगितलं असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.
अपघातावेळी नेमकं काय घडलं?
प्रदीप नाखवा यांनी अपघाताबद्दल सांगताना म्हटलं की, बीएमडब्ल्यूने आमच्या गाडीला टक्कर दिली. त्यानंतर कावेरी गाडीखाली गेली, ते पाहून प्रदीप यांनी मिहीरला गाडी थांबवण्याची विनवणी केली, पण पळण्याच्या नादात त्याने गाडी थांबवली नाही आणि कावेरी गाडीसोबत फरफटत गेली. प्रदीप हे गाडीच्यामागून धावत होते. काही अंतरावरून त्यांनी टॅक्सीची मदत घेऊन पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. दीड किलोमीटर अंतरावर टॅक्सीने प्रवास केल्यानंतरही कावेरी दिसून न आल्याने प्रदीप यांनी मदतीसाठी टॅक्सी वरळी पोलिस ठाण्यात वळवल्याची माहिती प्रदीप यांनी ' एबीपी माझा'च्या प्रतिनिधीला दिली.
मिहीर शहा शिवसेना उपनेत्याचा मुलगा
दरम्यान, या प्रकरणातील फरार मिहीर शहा शिवसेना उपनेत्याचा मुलगा आहे. आरोपी कार चालक शिंदे गटाचे (Shinde Group) पालघरमधील उपनेते राजेश शहा (Rajesh Shah) यांचा मुलगा मिहीर शहा असल्याचं समोर आलं आहे. राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहानं याने बीएमडब्ल्यूने पती-पत्नीला उडवलं. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला असून पती जखमी झाला आहे.
मिहीरने मद्यप्राशन करुन गाडी चालवल्याचं समोर
मिहीर शहा याने त्यारात्री मद्यप्राशन केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी वाइस ग्लोबल बारचे मालक करण शहा यांनी खुलासा केला आहे. त्यारात्री हीर शहा हा मित्रांसोबत त्यांच्या रात्री 11 वाजेच्या सुमारास बारमध्ये पार्टीसाठी आला होता. ते सर्व एक-एक बियर प्यायले होते. त्यांचं बिल 18730 रुपये झालं होतं, जे त्याच्या मित्राने भरलं होतं. त्यानंतर ते 1.30 वाजेच्यासुमारास बारमधून बाहेर पडले, असं बारमालकाने सांगितलं आहे.
पाहा व्हिडीओ : BMW मिहीरच चालवत होता, मृत महिलेच्या पतीचा दावा
महत्त्वाच्या इतर बातम्या :
वरळी हिट अँड रन : त्याने ब्रेक मारला असता, तर माझी पत्नी वाचली असती, आरोपीवर कारवाई करण्याची पतीची मागणी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)