(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Rape Case : पोलिसाकडूनच महिलेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना, मुंबईतील भोईवाडा पोलिसांकडून गुन्हा दाखल
Mumai Rape Case : मुंबईतील भोईवाडा पोलिसांनी सहाय्यक पोलीस निरीक्षकाविरुद्ध महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
Bhoiwada Rape Case : मुंबईमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. रक्षकचं भक्ष्यक बनल्याचं समोर आलं आहे. पोलिसाकडून महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईतील भोईवाडा पोलिसांनी सहाय्यक पोलीस निरीक्षकाविरुद्ध महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी या प्रकरणी माहिती देत सांगितलं की, महिलेनं दावा केला आहे की आरोपी पोलिसाने लग्नाच्या बहाण्यानं तिच्यावर अनेकदा बलात्कार केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. जाधव हे सध्या नागपूर येथील पोलीस ठाण्यात तैनात आहेत. पीडित 37 वर्षीय महिलेनं आरोप केला आहे की, ही घटना 2017 मध्ये घडली आहे. जाधव कुर्ला येथील नेहरूनगर पोलीस ठाण्यात तैनात असताना ही घटना घडली.'
एक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की, महिलेनं पुढे दावा केला आहे की, 'त्रास देणाऱ्या तिच्या पतीविरुद्ध तक्रार करण्यासाठी आपण पोलिसांकडे धाव घेतली. यावेळी तिला मदत करण्याच्या बहाण्याने आरोपी जाधव यानं आपल्याशी संपर्क साधला आणि व्हॉट्सअॅपवर चार्टिंग सुरू केलं. आरोपीनं तिला भोईवाडा कार्यक्षेत्रातील एका हॉटेलमध्ये नेऊन शारीरिक संबंध ठेवलं.'
पीडितेनं सांगितलं की, आरोपी पोलिसानं आपल्यासोबत अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले आणि तिला लग्नाचं आश्वासन दिलं. पण नंतर आरोपी लग्नाचा प्रस्ताव नाकारू लागला. मात्र, महिलेनं भोईवाडा पोलिसात जाऊन भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
महत्त्वाच्या इतर बातम्या