VIDEO : घरात कुणीच नसल्याचं पाहून बॉयफ्रेंड आला, दोन मुलांच्या आईच्या प्रेमाचा THE END; विरार मर्डरची इनसाइड स्टोरी
Virar Murder Crime Story : पती कामावर गेला आणि मुलं शाळेत गेली, नेमकी हीच संधी साधून बॉयफ्रेंड घरी गेला आणि त्याने विवाहित गर्लफ्रेंडचा जीव घेतला.
Virar Murder Crime Story : घरी कुणीच नसल्याचं पाहून तो घरात शिरला आणि दोघात बाचाबाची झाली. तिला चक्कर आल्याचं सांगून तो तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला अन् डॉक्टरांनी धनश्रीला मृत घोषीत केलं. दोन मुलांच्या आईच्या मृत्यूचं गूढ काय? दोन मुलांच्या आईच्या प्रेमाचा THE END कसा झाला? विरारमधील हत्याकांडची इनसाइड स्टोरी 'एबीपी माझा'ने उघडकीस आणली आहे.
या प्रकरणातील मृत महिलेचं नाव धनश्री आंबडस्कर (वय वर्षे 32). धनश्री आपल्या दोन मुली आणि पती रुपेशसह विरारमध्ये राहत होती. सोमवारी सकाळ रुपेश कामाला गेला. दोन मुली शाळेत गेल्या. त्यामुळे धनश्री घरी एकटीच होती.
वाद झाला आणि गळा आवळला
दुपारच्या वेळी धनश्रीचा मानलेला भाऊ शेखर कदम घरी आला. लोकांना सांगण्यासाठी भाऊ पण खरंतर शेखर धनश्रीचा प्रियकर होता. मागील 5-6 वर्षांपासून धनश्री आणि शेखरचं विवाहबाह्य संबंध होते. धनश्रीला शेखरसोबत लग्न करायचं होतं. यावरून दोघात वारंवार खटके उडायचे. सोमवारी दोघात नेहमीसारखाच वाद झाला. शेखर संतापला अन् रागाच्या भरात त्याने आपल्याच प्रेयसीचा, धनश्रीचा गळा आवळला. धनश्री तडफडू लागली, जीव वाचवण्यासाठी धडपडू लागली. मात्र शेखर काही थांबला नाही. साडीने गळा आवळून शेखरने धनश्रीचा जीव घेतला.
घरी असलेल्या शेखरने बनाव रचला आणि धनश्रीची प्रकृती खालावल्याचं सांगत तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. तिथं डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केलं. धनश्रीचा पती रुपेशला फोन करून तसं कळवण्यात आलं. त्याच्यातर पायाखालची जमीनच सरकली.
दोघेही विवाहित, पाच-सहा वर्षांपासून अफेअर सुरू
या घटनेचा पोलिसांनी सखोल तपास सुरू केला त्यावेळी शेखरचा बनाव उघड झाला. पोलिसांनी खाक्या दाखवताच शेखर बोलता झाला. शेखर पेशानं रिक्षाचालक आहे. तोदेखील विवाहित असून त्याला एक मुलगी आहे.
गेल्या पाच-सहा वर्षांसून शेखर आणि धनश्री एकमेकांच्या संपर्कात होते. धनश्रीला शेखरसोबत संसार थाटायचा होता. मात्र शेखरचा लग्नासाठी साफ नकार होता आणि शेवटी त्यानेच धनश्रीचा शेवट केला.
धनश्रीच्या घरच्यांनी अनेकदा धनश्री आणि शेखरला समज दिली होती. मात्र दोघांनी कुणाचं एकलं नाही. या घटनेनं आज दोन कुटुंबीय उद्ध्वस्त झाली आहेत. दोन मुलांच्या आईच्या प्रेमाचा अशा पद्धतीने द एन्ड झाला आहे.
ही बातमी वाचा: