अनैतिक संबंधातून भाच्यानं मामीला संपवलं, स्प्रे आणि मतदार यादीवरुन प्रकरणाचा छडा; आरोपीला दिल्लीतून अटक
Vasai Crime News : अनैतिक संबंधातून भाच्याने मामीची हत्या केल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी अत्यंत कसोशीने तपास करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहे.
वसई : नालासोपाऱ्यात सापडलेल्या अज्ञात महिलेच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. 28 मे रोजी पोलिसांनी नालासोपाऱ्यातील धनिव बाग येथे एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणात पोलिसांनी अत्यंत कसोशीने तपास करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. अनैतिक संबंधातून या महिलेची हत्या झाल्याचं उघड झालं आहे. अनैतिक संबंधातून भाच्याने मामीची हत्या केल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे.
अनैतिक संबंधातून भाच्याकडून मामीची हत्या
मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी अज्ञात महिलेच्या हत्येचं मागचं कारण आणि आरोपीचा शोध सुरु केला. मतदार यादी आणि घटनास्थळावरुन भेटलेल्या स्प्रेवरुन या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी आरोपीला दिल्लीहून अटक केली आहे. अनैतिक संबंधातून महिलेची हत्या झाल्याचं पोलिस तपासात उघड झालं आहे. अनैतिक संबंधातून भाच्याने आपल्या मामीची हत्या केल्याची घटना 28 मे रोजी वसईत घडली होती.
मयत महिलेची ओळख पटली
नालासोपाऱ्यातील धानिव बाग येथील डोंगराच्या पायथ्याशी एका अज्ञात महिलेची हत्या झाल्याची घटना 28 मे रोजी समोर आली होती. मयत महिलेची ओळख पटत नव्हती. पोलिसांना मृतदेहाजवळ एक वापरलेले काँडम आणि एक स्प्रे आढळून आला. तोच दुवा पकडून गुन्हे प्रकटीकरण शाखेने या प्रकरणाच कसून तपास केला. त्या स्प्रेवर असलेल्या बॅच वरून पोलिसांनी परिसरातील सर्व मेडिकल दुकानात तपास सुरू केला.
मेडिकलच्या सीसीटीव्हीवरून आरोपीची ओळख पटवली
दरम्यान, मयत महिलेच्या कपड्यांवरून ती महिला मुस्लिम असल्याचं कळल्यावर मतदारयादीच्या तपशीला वरून महिलेचा छडा लावण्यात आला. मयत महिलेचे नाव सायराबानू शाह असं असल्याची माहिती मिळाली. मेडिकलच्या सीसीटीव्हीवरून पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. आरोपी हा मयत महिलेचा भाचा असल्याच उघड झालं. यानंतर पोलिसांनी आरोपी नजाबुद्दील सम्मी याला दिल्लीहून अटक केली आहे.
मामी आणि भाच्यामध्ये अनैतिक संबंध
आरोपी नजाबुद्दीन आणि मयत सायराबानू यांचे मागील दोन वर्षांपासून अनैतिक संबंध होते. मात्र, नजाबुद्दीनने लग्न केल्याने सायराबानू संतप्त झाली. नजाबुद्दीनच्या लग्नामुळे त्याचे सायराबानूसोबत खटके उडू लागले. त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. त्यामुळे नजाबुद्दीनने तिची हत्या केल्याची माहिती पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी दिली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Beed Crime : बीडमध्ये लाचखोरीचं सत्र सुरूच! 20 हजार रूपयांची लाच घेताना कोतवाल एसीबीच्या जाळ्यात, लाचखोर तहसिलदार फरार