एक्स्प्लोर

आंदेकरचा गेम होणार, त्या व्हायरल मेसेजमुळे टीपही लागली होती; हैदराबादच्या गँगशी झालेला जुना मॅटर नडला?

Vanraj Andekar Pune Crime News: वनराज चांदेकर यांची हत्या कौटुंबिक वाद आहे की कट, याचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.

Vanraj Andekar Pune Crime News: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांच्या हत्येने पुण्यात खळबळ उडाली आहे. रविवारी सायंकाळी पुण्यातील नाना पेठे येथे वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार (Pune Crime News) आणि कोयत्याने वार करण्यात आला. जवळपास 14-15 जणांची वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला केला. सदर प्रकरणी पुणे पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं आहे.

वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांच्यावर कौटुंबिक वादातून हल्ला केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. मात्र यादरम्यान एक महत्वाची माहिती समोर येत आहे. गुन्हे शाखेने दोन वर्षांपूर्वी एका गुन्हेगाराला हैदराबाद येथून अटक केली होती. आंदेकर टोळीतील काही गुंडांनी हैदराबाद वरून अटक केलेल्या गुन्हेगाराच्या साथीदाराचा हात तोडला होता. तेव्हापासून आंदेकर आणि त्या टोळीतील संघर्षाला सुरुवात झाली होती. सध्या हा गुन्हेगार तुरुंगात असला तरी त्यावेळी त्याने तपासादरम्यान आंदेकर याचा खून करणार असल्याचा दावा केला होता. त्यातच वनराज आंदेकर याचा झालेला खून हा चर्चेचा विषय ठरला आहे. हा खून होण्यापूर्वी काही तास एक या घटनेच्या अनुषंगाने एक मेसेज व्हायरल झाला होता. त्यामुळे ही घटना केवळ कौटुंबिक वाद आहे की कट, याचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

नाना पेठेत 14 ते 15 हल्लेखोर दुचाकी घेऊन आले. यावेळी एका मित्रासोबत उभे असलेले वनराज आंदोरकर यांच्या अंगावर धावून जात गोळीबार करण्यास सुरुवात केली. काहीजण कोयता घेऊन त्यांच्या अंगावर गेले. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार वनराज आंदेकर यांना पाच राऊंडपैकी एक देखील गोळी लागली नाही. मात्र गोळीबारानंतर त्यांच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला त्यात वनराज आंदेकर यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. सदर घटनेनंतर वनराज आंदेकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

नाना पेठेत आंदेकर टोळीचा दबदबा-

नाना पेठेत आंदेकर टोळीचा दबदबा आहे. आंदेकर टोळी गेली पंचवीस वर्ष पुण्यात गुन्हेगारी कारवाया करत असून प्रमोद माळवदकर या गुंडाच्या खुनाच्या प्रकरणी बंडू उर्फ  सूर्यकांत आंदेकर याला जन्मठेपेची शिक्षा ही झालेली आहे. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न खंडणी मारामारी यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत आंदेकरविरुद्ध 1985 पासून खून, खुनाचे प्रयत्‍न, धमक्या देणे, शस्त्रे बाळगणे, अपहरण अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे पुण्यातील फरासखाना, खडक व समर्थ या पोलीस ठाण्यात, तसेच सातारा जिल्ह्यातील खंडाळा पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

संंबंधित बातमी:

पाच राऊंड फायर केले, पण एकही गोळी लागली नाही...; मग वनराज आंदेकरांचा मृत्यू नेमका कसा झाला?, मोठी माहिती समोर

संबंधित व्हिडीओ:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Embed widget