एक्स्प्लोर

Crime News : नोकरी देतो सांगून हॉटेलमध्ये बोलावलं, कोल्ड ड्रींकमध्ये गुंगीचं औषध मिसळून पाजलं, अन्...; नवऱ्याच्या मित्राकडूनच महिलेवर अत्याचार

Crime News : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधील बिजनौर पोलीस स्टेशन परिसरात एका मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.

Crime News : नवी दिल्ली : नोकरी देतो असं सांगून एका महिलेला गेस्ट हाऊसमध्ये भेटायला बोलावलं. त्यानंतर तिच्या कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळलं आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून तपास सुरू आहे. 

उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) राजधानी लखनौमधील (Lucknow) बिजनौर पोलीस स्टेशन परिसरात एका मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. तरुणीला नोकरीच्या नावाखाली गेस्ट हाऊसमध्ये बोलावून कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध टाकलं. आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप पीडितेनं केला आहे. सध्या पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी तपास सुरू आहे. 

नेमकं काय घडलं? 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेवर बलात्कार करणारा आरोपी पीडितेच्या पतीचाच मित्र आहे. लखनौच्या बिजनौरमध्ये त्याचं गेस्ट हाऊस असून, नोकरीच्या नावावर त्यानं मुलीला बोलावलं होतं. तरुणी गेस्ट हाऊसमध्ये पोहोचल्यावर आरोपीनं कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून तिला दिलं, त्यानंतर काही वेळानं ती बेशुद्ध झाली. त्यानंतर आरोपीनं तिच्यावर बलात्कार केला.

पीडिता शुद्धीवर आल्यानंतर तिला तिच्यासोबत अघटीत घडल्याची जाणीव झाली. आरोपीनं तिच्यासोबत केलेल्या क्रूर कृत्याचा व्हिडीओही बनवला होता. जेव्हा पीडितेनं आरोपीला विरोध केला, तेव्हा आरोपी अभिमन्यू सिंहनं तिला धमकी दिली आणि सांगितले की, तिने कोणाला काही सांगितलं तर तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करेल.

यानंतर पीडितेनं घरी पोहोचून संपूर्ण घटना तिच्या पतीला सांगितली. पतीनं आपल्या पत्नीला घेऊन पोलिसांत धाव घेतली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पीडितेच्या पतीनं पत्नीला नोकरी मिळवून देण्यासाठी त्याचा मित्र अभिमन्यू याच्याशी बोलणी केली होती. यावर अभिमन्यू म्हणाला होता की, त्याच्या हॉटेलमध्ये केअरटेकरची जागा रिक्त आहे. यामुळे मुलगी आरोपीच्या हॉटेलमध्ये गेली, तिथे तिच्यावर बलात्कार झाला. पोलिसांनी सांगितलं की, आयपीसीच्या कलम 64 (1) आणि 123 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पुढील कारवाई करण्यात येत आहे.                                           

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

दीरासोबत प्रेमाचं सूत जुळलं, पण नवऱ्याला सगळं कळलं; महिलेनं माहेरी जाऊन रचला हत्येचा कट, अन्...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra assembly election Voting turnout 2024: राज्यातील 30 मतदारसंघांमध्ये खटाखट मतदान, मेट्रो सिटीवाल्यांपेक्षा गावकऱ्यांनी लोकशाहीचा आब राखला
राज्यातील 30 मतदारसंघांमध्ये खटाखट मतदान, मेट्रो सिटीवाल्यांपेक्षा गावकऱ्यांनी लोकशाहीचा आब राखला
Voting Percentage in Mumbai City : मुंबई शहर जिल्ह्यात दुपारी 3 वाजेपर्यंत माहीममध्ये सर्वाधिक तर कुलाबा मतदारसंघात कमी मतदान, जाणून घ्या आकडेवारी
मुंबई शहरमधील 10 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत किती टक्के मतदान, जाणून घ्या आकडेवारी? 
Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना
निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना
मुंबई-पुण्याहून गावी जाणाऱ्यांच्या रांगाच रांगा, ऐनवेळी टोल फ्री झाली वाहतूक; मतदारांना अत्यानंद
मुंबई-पुण्याहून गावी जाणाऱ्यांच्या रांगाच रांगा, ऐनवेळी टोल फ्री झाली वाहतूक; मतदारांना अत्यानंद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Votting Superfast | विधानसभेसाठी मतदान, राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवरCM Eknath Shinde : महाराष्ट्राला उज्ज्वल भवितव्याकडे नेणारा उत्सव;सर्व मतदारांनी सहभागी व्हा - शिंदेSanjay Raut Vidhan Sabha Election : मिंधे गटाने पैसे वाटपासाठी खास माणसं ठेवली - संजय राऊतDevendra Fadnavis On Vidhan Sabha : यंदा महिला मतदार गॅप भरु काढतील; फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra assembly election Voting turnout 2024: राज्यातील 30 मतदारसंघांमध्ये खटाखट मतदान, मेट्रो सिटीवाल्यांपेक्षा गावकऱ्यांनी लोकशाहीचा आब राखला
राज्यातील 30 मतदारसंघांमध्ये खटाखट मतदान, मेट्रो सिटीवाल्यांपेक्षा गावकऱ्यांनी लोकशाहीचा आब राखला
Voting Percentage in Mumbai City : मुंबई शहर जिल्ह्यात दुपारी 3 वाजेपर्यंत माहीममध्ये सर्वाधिक तर कुलाबा मतदारसंघात कमी मतदान, जाणून घ्या आकडेवारी
मुंबई शहरमधील 10 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत किती टक्के मतदान, जाणून घ्या आकडेवारी? 
Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना
निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना
मुंबई-पुण्याहून गावी जाणाऱ्यांच्या रांगाच रांगा, ऐनवेळी टोल फ्री झाली वाहतूक; मतदारांना अत्यानंद
मुंबई-पुण्याहून गावी जाणाऱ्यांच्या रांगाच रांगा, ऐनवेळी टोल फ्री झाली वाहतूक; मतदारांना अत्यानंद
Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Maharashtra Assembly Election 2024 : मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
Embed widget