हत्येच्या काही तासांपूर्वी यशश्री गेली होती मैत्रिणीच्या घरी, पोलिसांना सापडला महत्त्वाचा दुवा, अनेक प्रश्नांचा उलगडा होणार?
उरणमधील 22 वर्षीय तरुणीचा निर्घृण हत्या झाल्यानंतर सगळीडे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे.
मुंबई : सध्या राज्यात यशश्री शिंदे या तरुणीचे हत्याप्रकरण राज्यभर गाजत आहे. उरणमध्ये या तरुणीची निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली आहे. नुकतेच या प्रकरणातील प्रमुख आरोप दाऊद शेख याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. नवी मुंबई पोलिसांनी त्याला कर्नाटकमधून अटक केली. दाऊदच्या अटकेनंतर या हत्या प्रकरणातील अनेक गुपितं समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून पोलिसांना आणखी एक महत्त्वाचा दुवा सापडला आहे. यशश्रीच्या एका मैत्रिणीची पोलीस चौकशी करणार आहेत.
मैत्रिणीचा नोंदवला जबाब
मिळालेल्या माहितीनुसार यशश्री दाऊदला भेटण्यापूर्वी तिच्या मैत्रिणीच्या घरी थांबली होती. याच मैत्रिणीचा जबाब उरण पोलिसांनी नोंदवला आहे. दाऊदकडे निघण्यापूर्वी यशश्रीची मनस्थिती कशी होती? तिचे हावभाव काय होते? तिला कुणाचे फोन येत होते? ती कुणाशी बोलत होती? या साऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.
यशश्रीने मैत्रिणीला काही सांगितले का?
यशश्री दाऊदला भेटण्यापूर्वी तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली होती. तिने हा निर्णय का घेतला? यशश्रीने तिच्या मैत्रिणीला दाऊदबद्दल काही सांगितले का, हे जाणून घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
राज्य महिला आयोगाने घेतली दखल
दरम्यान, यशश्री शिंदे या तरुणीच्या हत्येची दखल थेट महिला राज्य आयोगानेही घेतली आहे. राज्य महिला आयोगानं उरण पोलिसांकडून या हत्येबाबातचा अहवाल मागवला आहे. तपासात काय प्रगती आहे हे जाणून घेण्यासाठी तपासाचा प्रगती अहवाल सादर करण्याचेही निर्देश महिला आयोगाने पोलिसांना दिले आहेत.
दरम्यान, दाऊदला अटक केल्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली. यात दाऊदला कसं अटक करण्यात आलं याबाबत पोलिसांनी सविस्तर सांगितलं. दाऊदच्या एका मित्राकडून तो कर्नाटकला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दाऊद आणि यशश्री एकमेकांना ओळखत होते. गेल्या कित्येक दिवसांपासून ते एकमेकांच्या संपर्कात नव्हते. पण ते दोघे भेटणार होते. त्यानंतर त्यांच्यात वाद झाला असावा आणि यातून हे हत्येचे कृत्य घडले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दाऊदने यशश्रीची हत्या केल्याची कबुली दिली आहे.
हेही वाचा :
Navi Mumbai Crime: मोठी बातमी : यशश्री शिंदेची हत्या नेमकी कशी केली, पोलिसांनी थरारक अँगल सांगितला