Sangli Crime News: सांगलीत दुर्मिळ खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्यास आलेल्या रत्नागिरीच्या दोघांना अटक; 12 लाखांच्या मुद्देमालसह अटक
Sangli Crime News: सांगलीत दुर्मिळ खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्यास आलेल्या रत्नागिरीच्या दोघांना अटक करण्यात आली असून 12 लाखांच्या मुद्देमालसह अटक करण्यात आली आहे.
Sangli Crime News: सांगलीत (Sangli News) दुर्मिळ खवल्या मांजराची तस्करी करण्यास आलेल्या रत्नागिरीच्या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 12 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं ही कारवाई केली आहे. इम्रान अहमद मुलाणी (वय 42 रा. मु.पो. अलोरे ता. चिपळुण जि. रत्नागिरी) आणि दिनेश गोपाळ डिंगणकर (वय 45 रा. चिंद्रवळे, ता. गुहागर जि. रत्नागिरी) अशी दोघांची नावं असून त्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकानं जेरबंद केलं आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाची सौंदर्य प्रसाधनं, औषधं तयार करण्यासाठी या खवल्या मांजराची तस्करी केली जात होती. पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणून आरोपींना जेरबंद केलं आहे. याप्रकरणी आतापर्यंत दोन तस्करांना अटक करण्यात आली आहे. पथकाला कोकणातील दोघेजण दुर्मिळ खवले मांजर विक्रीसाठी कुपवाड येथील अहिल्यानगर येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. पथकानं सापळा रचून दोघांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडील सॅकची झडती घेतल्यानंतर त्यामध्ये दुर्मिळ खवले मांजर आढळले. त्याबाबत चौकशी केल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांना कुपवाड एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.
कुपवाडमधील शिवमुद्रा चौकामध्ये दोन इसम अत्यंत दुर्मिळ समजल्या जाणार्या खवल्या मांजराची खवले घेउन विक्रीसाठी येत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे अधिक्षक बसवराज तेली आणि निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदीप शिंदे, संदीप पाटील, संजय कांबळे, संकेत मगदूम, सुनिल चौधरी, सुधीर गोरे, अमोल ऐदळे, राहूल जाधव, गौतम कांबळे, अजय बेंदरे, संकेत कानडे, ऋषिकेश सदामते, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकासह मानद वन्यजीवरक्षक अजितकुमार पाटील, वनपाल तुषार भोरे यांच्यासह पाळत ठेवली.
यावेळी इम्रान अहमद मुलाजी (वय 42 रा.अलोरे ता. चिपळूण) आणि दिनेश गोपाळ डिंगणकर (वय ४५ रा. चिंद्रवळे ता. गुहागर) यांच्या हालचाली पथकाला संशयास्पद वाटल्या. त्यांना ताब्यात घेउन झडती घेतली असता पाठीवरील पिशवीमध्ये खवल्या मांजराची 4 किेलो 750 ग्रॅम वजनाची खवले आढळून आली. गावाकडे रानात मृत झालेल्या खवल्या मांजराची खवले असून ती जादा किंमत मिळते म्हणून विक्रीसाठी आणली असल्याचं संशयितांनी सांगितलं.
तांबूस, पांढर्या रंगाचे टणक कवच असलेले अतिशय दुर्मिळ, संरक्षित आणि नामशेष होत असलेल्या खवल्या मांजराचे खवले हे महागडी औषधे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची सौंदर्य प्रसाधने बनविण्यासाठी वापरले जातात. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर या खवल्यांना प्रचंड मागणी आहे. दोघांविरुध्द कुपवाड एमआयडी पोलीस ठाणे येथे वन्यजीव अधिनियम 1972 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरीक्षक सतिश शिंदे, सहायक निरीक्षक संदीप शिंदे, अंमलदार संदिप पाटील, संजय कांबळे, संकेत मगदुम, सुनिल चौधरी, सुधीर गोरे, अमोल ऐदाळे, राहूल जाधव, गौतम कांबळे, अजय बेंदरे, संकेत कानडे, ऋषीकेश सदामते, कॅप्टन गुंडवाडे, मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील वनपाल लुषार भोरे यांच्या पथकानं ही कारवाई केली.
खवल्यांना आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आणि विशेष संरक्षक प्रजातीत समावेश
सदरचे खवले हे अतिशय दुर्मीळ, संरक्षित आणि नामशेष होत असलेल्या खवल्या मांजराचे असुन सदरच्या खवल्यांचा उपयोग महागडी औषधे, आंतरराष्ट्रीय दर्जाची सौंदर्य प्रसाधने आदी बनविण्यासाठी केला जात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे सदर खवल्यांना आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असून याची उच्च दरानं विक्री करण्यासाठी तस्करी फेली जाते. हा वन्यजीव नामशेष होण्याचे मार्गावर असल्याने खवले मांजर या प्रजातीच्या संरक्षणासाठी सदर वन्यजिवास शासनाने विशेष संरक्षित प्रजातीमध्ये समाविष्ट केलं आहे.