एक्स्प्लोर

धक्कादायक... अंगावर चटके, मारहाण करत चिमुकल्यांचा छळ; वडील अन् सावत्र आईला पोलिसांकडून अटक

अंगावर चटके देत मुलांचा वडील आणि सावत्र आईकडून छळ करण्यात आला असून वडील पोलीस कर्मचारी असल्याची माहिती मिळत आहे.

नाशिक : वडील आणि सावत्र आईने आपल्या लहान मुलांना अमानुष मारहाण केल्याची अमानुष घटना नाशिकच्या इगतपुरी येथे घडली आहे. या प्रकरणातील वडील स्वतः पोलीस कर्मचारी असल्याची माहिती मिळत आहे. आईच्या निधनानंतर पोरकं झालेल्या वडील आणि सावत्र आईकडून दररोज छळ असल्याची माहिती मुलांच्या मामानं दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलांच्या वडीलांना आणि सावत्र आईला अटक केली आहे. तर मुलांवर सध्या नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील तळेगाव शहरात ही घटना घडली. या घटनेतील आरोपी राहुल मोरे हे स्वतः रेल्वे पोलीस कर्मचारी आहेत. ते आपली दुसरी पत्नी आणि पहिल्या पत्नीच्या दोन मुलांसोबत राहतात. दोन्ही मुलं लहान असून एक 5 वर्षाची मुलगी आणि 8 वर्षांचा मुलगा आहे. परंतु, या दोन्ही मुलांचा दोघेही आई-वडील छळ करतात. त्यांना चटके देतात. तसेच त्यांना मारहाणही करतात.

पाहा व्हिडीओ : अंगावर चटके, मारहाण करत वडील आणि सावत्र आईकडून चिमुकल्यांचा छळ

दोन्ही मुलांचा रडण्याचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक तिथे गोळा झाले आणि त्यांनी घडलेला प्रकार मुलांच्या मामाला कळवला. मुलांचा मामा सूरतहून याठिकाणी दाखल झाला. त्यानंतर त्याने मुलांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. त्यानंतर मुलांच्या आजीने मुलांचे वडील आणि सावत्र आईविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, पोलिसांनी आता मुलांची वडील राहुल मोरे आणि मुलांच्या सावत्र आईला अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मुलांचा छळ करत त्यांना मारहाण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, मुलांना खूप मारहाण केली असून मुलं बोलूही शकत नाहीत. या संपूर्ण घटनेनंतर सर्वच स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच याप्रकरणी मुलांचे वडील आणि सावत्र आई यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime News : चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!

व्हिडीओ

Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
Embed widget