एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Twitter : ट्विटर अकाऊंट व्हेरिफाईड करुन देतो म्हणत प्रसिद्ध वकिलाला फसवलं! मुंबईत गुन्हा दाखल

Twitter Verified : ट्विटर अकाऊंट व्हेरिफाईड करुन देतो म्हणत प्रसिद्ध वकिलाला फसवल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Twitter Verified Crime : आजकाल लोकं कसं आणि कुणाला फसवतील याचा नेम नाही. वेगवेगळी पद्धतीची अमिषं दाखवून फसवणुकीचे अनेक प्रकार रोज समोर येत असतात. असाच फसवणुकीचा एक प्रकार आता मुंबईत समोर आला आहे. ट्विटर अकाऊंट व्हेरिफाय करण्याच्या नावावर ही फसवणूक केली गेलीय. ती ही एक प्रसिद्ध महिला वकिलाची.  

प्रसिद्ध महिला वकील आभा सिंह यांच्यासोबत हा प्रकार घडला असून त्यांनी अज्ञात व्यक्तिविरोधात मुंबईच्या वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे की, आरोपीनं सिंह यांना सांगितलं की, ट्विटर अकाऊंट व्हेरिफाय करुन देईल आणि त्यामुळं त्यांचे फॉलोअर्सही वाढतील.  

29 मार्च रोजी वकील आभा सिंह यांच्याशी आरोपीनं सोशल मीडियावरुन बातचीत केली. त्यावेळी त्यानं सिंह यांना  त्यांचं ट्विटर अकाऊंट व्हेरिफाय करुन देण्याचं आणि त्यामुळं त्यांचे फॉलोअर्सही वाढतील असं सांगितलं. आरोपीनं महिला वकिलाच्या ट्विटरची माहिती घेत त्यांचं ट्विटर हॅक देखील केलं असल्याचा आरोप आहे.  

सदर आरोपीनं अकाऊंट हॅक करत वकील आभा सिंह यांचा डीपी बदलवून तिथं एका मुस्लिम व्यक्तिचा फोटो लावला आणि अकाऊंटचे हक्क परत देण्यासाठी आभा सिंह यांच्याकडे 500 डॉलर्सची मागणीही केली, असा आरोप सिंह यांनी केला आहे. या प्रकरणी वरळी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद केला आहे. आता पोलिस याबाबत तपास करत आहेत. 

ट्विटर व्हेरिफाईड म्हणजे काय आणि ते कसं करावं? (What is Twitter Verified and how to do it?)
ट्विटर व्हेरिफिकेशनद्वारे एखाद्या व्यक्तिला व्हेरिफाईड केले जाते. व्हेरिफाईड झाल्यानंतर त्या व्यक्तिच्या अकाऊटच्या नावासमोर ब्लू टिक येते. यामुळं ओरिजिनल अकाऊंट ओळखण्यास मदत होते. ट्विटरनं विविध क्षेत्रातील 'नोटेबल' व्यक्तिंसाठी ही सुविधा आणलीय. व्हेरिफाईड करण्यासाठी ट्विटरवर Request Verification असा ऑप्शन अकाऊंट सेटिंग्समध्ये असतो. यावर जाऊन आपण ज्या प्रकारामध्ये येतो. त्यातून आपण अकाऊंट व्हेरिफिकेशनसाठी विनंती ट्विटरकडे करु शकता. यानंतर ट्विटर आपल्या अकाऊंटचा अभ्यास करुन आपलं अकाऊंट व्हेरिफाईड करायचं की नाही हे ठरवतं. यासंदर्भात आपल्याला मेल देखील ट्विटरकडून येतात. यासाठी कुठल्याही प्रकारची फी किंवा पैसे लागत नाहीत. त्यामुळं आपल्याला जरी कुणी अशी आमिष दाखवत असेल की पैसे देऊन अकाऊंट व्हेरिफाईड करुन देऊ तर त्यावर विश्वास ठेवू नका. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget