तुळजाभवानी दानपेटी घोटाळा प्रकरण, न्यायालयाने आदेशानंतरही गुन्हा दाखल नाहीच; हिंदू जनजागृती समिती आक्रमक
Tuljabhawani Temple Scam : तुळजाभवानी दानपेटी घोटाळा प्रकरणी न्यायालयाने आदेशानंतरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याने हिंदू जनजागृती समिती आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

धाराशिव : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात (Tuljabhavani Mandir) झालेल्या सिंहासन दानपेटी घोटाळ्या प्रकरणी हिंदू जनजागृती समिती आक्रमक झाली आहे. या प्रकरणात संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे उच्च न्यायालयाने आदेश देऊन एक महिना उलटला. मात्र अद्यापही गुन्हे दाखल न झाल्याने मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर घंटानाद आंदोलन करण्यात आलं. यावेळी न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा हिंदू जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे. अटक करा, अटक करा, भ्रष्टाचाऱ्यांना अटक करा, अशी घोषणाबाजी करत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला होता.
तुळजाभवानी दानपेटी घोटाळा प्रकरण
तुळजाभवानी देवीच्या मंदिरात 8 कोटी 45 लाख 97 हजार रुपयांचा सिंहासन दानपेटी घोटाळा समोर आला. याप्रकरणी एक महिना उलटला तरी गुन्हा दाखल झालेला नसल्याने हिंदू जनजागृती समिती आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. हिंदू जनजागृती समितीने तुळजाभवानीच्या मुख्य प्रवेशद्वारावर घंटानाद आंदोलन केलं. तुळजाभवानी देवीच्या मंदिरात झालेल्या भ्रष्टाचाराचे गुन्हे तात्काळ दाखल करण्याची मागणी, यावेळी करण्यात आली.
न्यायालयाने आदेशानंतरही गुन्हा दाखल नाहीच
कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरात आठ कोटी 45 लाख 97 हजार रुपयांचा दानपेटी घोटाळा झाल्याचं उघडकीस आलं होतं. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तुळजाभवानी दानपेटी घोटाळा प्रकरणी गुन्हा नोंद करण्यास दिरंगाई झाल्याचं समोर आलं आहे. यामुळे हिंदू जनजागृती समितीने न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे. तुळजाभवानी दानपेटी घोटाळा प्रकरणात काही अधिकाऱ्यांचाही हात असल्याचा आरोप करण्यात येत असून यामुळे याच प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचं बोललं जात आहे.
हिंदू जनजागृती समिती आक्रमक
तुळजाभवानी दानपेटी घोटाळा प्रकरणातील घोटाळ्याचा तपास बंद करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला होता. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाने या प्रकरणात सनदी अधिकारी, लिलावदार, मंदिर कर्मचारी, विश्वस्त अशा 19 दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र, अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही. या प्रकरणाकडे लक्ष वेधण्यासाठी हिंदू जनजागृती समितीने मंदिरासमोर आंदोलन केलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























