Kolhapur News: आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला कागलमध्ये पोलिसांनी ठोकल्या बेड्या, शहरात व्यवहार सुरळीत, चौकाचौकात बंदोबस्त तैनात
Kolhapur News: स्टेट्सचे स्क्रीनशाॅट व्हायरल झाल्यानंतर कागल शहरात तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.
Kolhapur News: कोल्हापूरला जातीय तणावाचा बट्टा लागलेला असतानाच कागलमध्ये (Kagal) एकाने आक्षेपार्ह स्टेटस लावण्यात आल्यानंतर काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी त्या तरुणाला अटक केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कागलमध्ये चौकाचौकात पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरात शांतता असून व्यवहार सुरळीत सुरु आहेत.
नेमका काय प्रकार घडला?
कागलमध्ये एका तरुणाने टिपू सुलतानचे स्टेटस लावल्याचे व्हायरल झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांसह काही आक्रमक तरुणांनी कागल पोलीस ठाण्याकडे धाव घेत कारवाईची मागणी केली. पोलिसांनी जमावाला परत जाण्यास सांगताना संबंधित तरुणाविरोधात गुन्हा नोंद केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी दिली. यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गोसावी यांनी दोन्ही समाजातील लोकांसह व्यापार्यांना बोलावून बैठक घेत बंद न करण्याचे आवाहन केले. त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत बंद न करण्याची ग्वाही या बैठकीत दिली.
वादग्रस्त स्टेट्सचे स्क्रीनशाॅट व्हायरल झाल्यानंतर कागल शहरात तणाव निर्माण झाला. त्यामुळे रविवारी संध्याकाळी आठच्या सुमारास खर्डेकर चौकात एकत्र आले आणि कारवाई करण्याची मागणी केली. खर्डेकर चौकानंतर गैबी चौकामध्येही तरुण एकत्र आले. त्यामुळे पोलिसांकडून रॅपिड अॅक्शन फोर्सला पाचारण करण्यात आले. पोलिसांनी स्टेट्स व्हायरल करणाऱ्यांचे जबाब नोंदवून घेतले.
औरंगजेब आपला होऊच शकत नाही; हसन मुश्रीफांचे परखड बोल
दुसरीकडे, छत्रपती शिवाजी महाराज यांनी बहुजनांचे रयतेचे स्वराज्य निर्माण केले. औरंगजेब हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि बहुजनांच्या स्वराज्याचा शत्रू होता. जो छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रू तो हिंदुस्थानी मुसलमानांचा शत्रूच, त्यामुळे औरंगजेबाचे उदात्तीकरण होऊच शकत नाही, औरंगजेब हा आपला शत्रूच आहे, असे परखड बोल माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी बहुजनांचे रयतेचे स्वराज्य निर्माण केले. औरंगजेब हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि बहुजनांच्या स्वराज्याचा शत्रू होता. जो छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रू तो हिंदुस्थानी मुसलमानांचा शत्रूच, त्यामुळे औरंगजेबाचे उदात्तीकरण होऊच शकत नाही, औरंगजेब हा आपला शत्रूच आहे, असे परखड बोल माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. धर्मा-धर्मात तेढ वाढवून सामाजिक विद्वेष करण्याच्या दृष्टिकोनातून कोणी कितीही चिथावणी देऊ देत. अशा चिथावणीखोरांना बळी पडू नका. सावध राहा-दक्ष रहा, असे आवाहन त्यांनी केले.
इतर महत्वाच्या बातम्या :