पैशाचा पाऊस पाडतो असे सांगून करायचे मुलींचे शोषण; सात जणांना बेड्या
पैशाचा पाऊस पाडतो असे सांगून महिलांवर अत्याचार करणाऱ्या एका टोळीला ठाणे गुन्हे शाखा एकने अटक केली आहे. या टोळीने राज्यातील विविध भागात महिलांना फसविल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
![पैशाचा पाऊस पाडतो असे सांगून करायचे मुलींचे शोषण; सात जणांना बेड्या Thane Crime Police arrested seven persons who exploited girls by claiming that it would rain money Maharashtra Marathi News पैशाचा पाऊस पाडतो असे सांगून करायचे मुलींचे शोषण; सात जणांना बेड्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/03/add8e25f1a5f0032a0a905226e628a7c1709428011476923_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : पैशाचा पाऊस पाडतो असे सांगून महिलांवर अत्याचार करणाऱ्या एका टोळीला ठाणे गुन्हे शाखा एकने अटक केली आहे. या टोळीने राज्यातील विविध भागात महिलांना फसविल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
गरजू मुली अथवा महिला यांना हेरुन त्यांना पैशाचा पाऊस पाडतो असे सांगून तशा आशयाचा व्हिडीओ दाखवून मुली, महिलांचा विश्वास संपादन करुन त्यांचे शोषण केले जात होते. याप्रकरणी असलम शमी उल्ला खान, सलीम जखरुद्दीन शेख यांना 17 फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती.
पैशाच्या पाऊस पाडतो सांगून मुलींची दिशाभूल
या गुन्ह्याचा समांतर तपास करताना पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, यातील पीडित मुलगी हिला पैशाचे पाऊस पाडणाऱ्या टोळीने तिची दिशाभूल करून स्वतःच्या ताब्यात ठेवले आहे. या माहितीची खात्री करून योग्य ती कारवाई करण्यासाठी पोलिसांनी यातील पीडित मुलीचा शोध घेतला व पीडित मुलीला विश्वासात घेऊन तिच्याकडे चौकशी केली असता, पैशाचा पाऊस पाडणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
सात जाण पोलिसांच्या ताब्यात
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. असलम शमी उल्ला खान, सलीम जखरुद्दीन शेख, साहेबलाल वजीर शेख उर्फ युसुफ बाबा (मांत्रिक), तौसिफ शेख, शबाना शेख, शबिर शेख, हितेंद्र शेट्टे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पीडित मुलींची व्हिडिओ दाखवत फसवणूक
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, गरजू मुली अथवा महिला यांना हेरुन त्यांना पैशाचा पाऊस पडतो यावर विश्वास बसावा यासाठी त्यांच्या मोबाइलमध्ये रेकॉर्डींग करुन ठेवण्यात आलेला व्हिडीओ पीडित मुलींना दाखविला जात होता. या व्हिडिओद्वारे आरोपींनी अनेक महिलांना मुलींना फसवले आहे. मुलींना फसविणारी टोळी राज्याच्या विविध ठिकाणी पसरल्याचेही पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरिक्षक दिलीप पाटील, पोलीस निरिक्षक कृष्णा कोकणी यांच्या पथकाने केली.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)