Thane Crime News : ठाण्यात 8 कोटींच्या बनावट नोटा; पालघरमधील दोन आरोपी अटकेत
Maharashtra Thane Crime News : ठाण्यातून तब्बल 8 कोटींच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणातील मास्टर माईंडचा सध्या पोलीस (Thane Police) शोध घेत आहेत.
Maharashtra Thane Crime News : ठाण्यातून (Thane News) तब्बल 8 कोटींच्या बनावट नोटा जप्त (Fake Notes Seized) करण्यात आल्या आहेत. बनावट नोटांप्रकरणी पालघरमधील (Palghar News) जोडीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणातील मास्टर माईंडचा सध्या पोलीस (Thane Police) शोध घेत आहेत. तसेच, या प्रकरणाची सूत्र पालघरमध्ये (Palghar Crime News) असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. ठाणे गुन्हे शाखेनं (Thane Crime Branch) यासंदर्भातील कारवाई केली आहे.
ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट 5 नं (Thane Crime Branch Unit 5) पालघरमधील दोघांना अटक केली आहे. तब्बल 8 कोटींच्या बनावट भारतीय नोटा जप्त केल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी या सर्व बनावट नोटा बाजारात चलनात आणणार होते. सर्व नोटा दोन हजारांच्या आहेत. या प्रकरणी पालघरमधील दोघांना अटक केली आहे. राम शिंदे आणि राजेंद्र राऊत अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं असून दोघंही पालघरमधील राहणारे आहेत.
पाहा व्हिडीओ : 8 कोटींच्या बनावट नोटा जप्त, बनावट नोटांप्रकरणी पालघरमधील जोडगोळीला अटक
पोलिसांना यासंदर्भात माहिती मिळाली होती. त्याच माहितीच्याआधारे पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी दोन्ही आरोपींकडे 2,000 रुपयांच्या बनावट भारतीय नोटा असल्याचं आढळून आलं. पोलिसांनी आरोपींकडून 400 बंडल जप्त केले आहेत. यासर्व नोटा आरोपी चलनात आणणार असल्याचीही माहिती पोलिसांना चौकशीअंती मिळाली आहे. या प्रकरणातील अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. तसेच, याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत. याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 489 (ए), 489 (ब), 489 (सी) आणि 34 अन्वये गमोहन कासारवडवली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, ठाणे गुन्हे शाखेचं पथकाकडून ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींची कसून चौकशी सुरु आहे. तसेच, बनावट नोटा छापणाऱ्या कारखान्याचाही पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. यामागे मोठं रॅकेट असल्याचा संशय पोलिसांना आहे. अटक केलेल्या दोन्ही आरोपींची पोलिसांकडून अधिक चौकशी सुरु आहे. दोघांच्या चौकशीमधून आणखी माहिती मिळण्याची शक्यता असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे. याप्रकरणामुळे मोठं रॅकेटही उघडकीस येण्याची शक्यता असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
सैराट स्टाईल हत्या, बहिणीसह तिच्या पतीची सख्ख्या भावांकडून हत्या, न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा