एक्स्प्लोर

सैराट स्टाईल हत्या, बहिणीसह तिच्या पतीची सख्ख्या भावांकडून हत्या, न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा

Kolhapur Crime News : कोल्हापुरात घडलेल्या धक्कादायक घटनेनं सर्वांनाच हादरवलं आहे. आंतरजातीय विवाह केल्यामुळे बहीण आणि तिच्या पतीची हत्या करण्यात आली.

Maharashtra Kolhapur Crime News : सैराट चित्रपटातील (Sairat Movie) कहाणीप्रमाणे आंतरजातीय विवाह केलेल्या बहीण (Sister) आणि तिच्या पतीची हत्या करणाऱ्या दोन सख्ख्या भावांना कोल्हापुरातील न्यायालयानं आजन्म कारावासाची शिक्षा (Punishment of life imprisonment) सुनावली आहे. पन्हाळा तालुक्यातल्या (Panhala Taluka) मेघा पाटील हिने प्रियकराबरोबर आंतरजातीय विवाह (Intercaste Marriage) केला होता. या लग्नाला तिच्या कुटुंबीयांचा विरोध होता. लग्नानंतर कसबा बावडा (Kasaba Bawada) इथं राहणाऱ्या मेघा आणि तिच्या पतीची तिच्या सख्ख्या भावांनी हत्या केली होती. 2015 साली या घटनेच्या आधी सैराट चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामुळे कोल्हापुरातील ऑनर किलिंगच्या या घटनेची राज्यभर चर्चा झाली होती. 

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील मेघा पाटील हिनं आपल्या प्रियकरासोबत आंतरजातीय विवाह केला होता. या विवाहाला मेघाच्या कुटुंबियांचा तीव्र विरोध होता. तरीही कुटुंबीयांच्या विरोधात जात मेघा हिनं आपल्या प्रियकराशी विवाह केला. लग्नानंतर मेघा आपल्या पतीसोबत कोल्हापुरातील कसबा बावडा येथे राहण्यासाठी गेली. तिच्या सख्ख्या भावांनी तिचा मागोवा घेतला. कसबा बावडा येथील गणेश कॉलनीत मेघा पतीसह राहत असल्याची माहिती तिच्या भावांना मिळाली. त्यानंतर मेघा आणि तिच्या पतीची तिच्या दोन सख्ख्या भावांनी हत्या केली होती. 2015 मध्ये ही धक्कादायक घटना घडली होती. 

मेघा हिनं आपल्या प्रियकरासोबत आंतरजातीय विवाह केल्यामुळे गावातील लोक तिच्या कुटुंबीयांना आणि दोन सख्ख्या भावांना टोमणे मारत होते. त्यामुळे दोन भावांना गावात फिरणं अशक्य झालं होतं. याची खदखद दोघांच्याही मनात गेल्या अनेक दिवसांपासून होती. त्यामुळे राग अनावर झालेल्या दोन सख्ख्या भावांनी बहिणीसह मेव्हण्याची हत्या केली होती. या प्रकरणात दोन भावांसोबत तिसरा आरोपीही होता. त्यालाही न्यायालयानं शिक्षा सुनावली आहे. त्यानं याप्रकरणात पुरावे नष्ट करुन दोन भावांची मदत केल्यामुळे तीन वर्ष सहा महिन्यांची शिक्षा न्यायालयानं सुनावली आहे. 

भावांनी कसा रचला गुन्ह्याचा कट? 

लग्नानंतर बहिण कुठे राहते याचा मागोवा दोन्ही भावांनी घेतला. त्यानंतर बहिणीकडे जाणं-येणं सुरु ठेवलं. तेव्हापासूनच मेव्हण्याच्या हत्येचा कट त्यांनी रचला होता. एके दिवशी रात्री दोघे भाऊ आपल्या साथीदारासह बहिणीच्या घरी गेले. घरी आलेल्या भावांसाठी चहा करण्यासाठी मेघा स्वयंपाक घरात गेली. त्यावेळी दोन्ही भावांनी बहिणीच्या पाठीवर आणि गळ्यावर सपासप वार करुन तिची हत्या केली. मेघाचा पती काहीतरी सामान आणण्यासाठी घराबाहेर गेला होता. तेवढ्यात तो घरी परतला. दोन भावांनी त्याच्यावरही सपासप वार करत हत्या केली. मेघाच्या पतीनं हल्ला होताना आरडाओरडा केला, त्यावेळी दोन्ही गुन्हेगारांनी तिथून पळ काढला. गुन्हा घडल्यानंतर तब्बल पाचच तासांत पोलिसांनी तिनही गुन्हेगारांना ताब्यात घेतलं होतं. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Nagpur Crime : अडीच लाखात ठरला आठ महिन्याच्या चिमुकल्याचा सौदा; पोलिसांची सतर्कता अन् टोळीचा पर्दाफाश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Guardian Minister : नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
Beed News: बीड जिल्ह्यात मोठी घडामोड, 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका; सदस्यत्त्व रद्द केले
मोठी बातमी: बीड जिल्ह्यातील 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका
Mhada Lottery Konkan Board : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kho Kho World cup| खो-खोने आम्हाला नॅशनल लेव्हलपर्यंत पोहोचवलं, कर्णधार प्रतीक वायकरची प्रतिक्रियाSaif Case Recreate Seen : सीन रिक्रिएशनसाठी आरोपी शेहजाद सैफच्या घरी, क्राईम ब्रँच घटनास्थळीABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 21 January  2025Akshay Shinde Case | अक्षय शिंदेचा फेक , पोलिसांचा दावा संशयास्पद ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Guardian Minister : नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
Beed News: बीड जिल्ह्यात मोठी घडामोड, 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका; सदस्यत्त्व रद्द केले
मोठी बातमी: बीड जिल्ह्यातील 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका
Mhada Lottery Konkan Board : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
Haribhau Bagde : विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
Eknath Shinde: फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
Crop Insurance : एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार? कृषी आयुक्तांच्या समितीची शिफारस; गैरव्यवहारामुळं मोठा निर्णय होणार?
एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार? कृषी आयुक्तांच्या समितीची शिफारस, नेमकं कारण काय?
मोठी बातमी: राज्यातील 32 जात वैधता प्रमाणपत्र समित्यांना अध्यक्षच नाही, महायुती सरकारकडून अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा काँग्रेसचा आरोप
राज्यातील 32 जात वैधता प्रमाणपत्र समित्यांना अध्यक्षच नाही, महायुती सरकारकडून अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा काँग्रेसचा आरोप
Embed widget