एक्स्प्लोर

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ऑर्डरशिवाय केसच्या इन्व्हेस्टिगेशनसाठी दुसऱ्या राज्यात शिरला, धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, कोण आहे रणजीत कासले?

Ranjit Kasle On Walmik Karad: वाल्मिक कराड याचा एन्काऊंटर करण्याची ऑफर मला मिळाली होती, असा दावा रणजीत कासले यांनी केला आहे.

Ranjit Kasle On Walmik Karad: राज्यात गेल्या काही दिवसांपासून बीड (Beed News) जिल्हा मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. बीडमध्ये घडलेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे राजकीय वातावरण देखील मोठ्या प्रमाणावर तापल्याचं पहायला मिळालं. याचदरम्यान बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले (Ranjit Kasle) यांनी केलेल्या दाव्यानं खळबळ उडाली आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case) मुख्य आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) याचा एन्काऊंटर करण्याची ऑफर मला मिळाली होती, असा दावा रणजीत कासले यांनी केला आहे.

मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर होती, असा खळबळजनक दावा बीडमधील  निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी केला आहे. वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरसाठी पाच कोटी, दहा कोटी आणि 50 कोटींची ऑफर दिल्याचं रणजीत कासले म्हणाले. रणजीत कासले हे बीडच्या सायबर विभागात पोलीस निरीक्षक होते. मागील काही दिवसांपूर्वी त्यांना निलंबित करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी अनेक दावे त्यांच्या सोशल माध्यमातून केले आहेत. मी सायबर विभागात होतो. त्यांना माहिती होतं, हा माणूस करु शकतो. याच्यामध्ये दम आहे. मी माझा मोठेपणा सांगत नाही, नाहीतर सोडलेले कुत्रे माझ्या अंगावर भुंकतील, असंही रणजीत कासले म्हणाले. आता वाल्मिक कराड याच्या एन्काऊंटरबद्दल केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. सोशल माध्यमांवर देखील रणजीत कासले यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.

कोण आहेत रणजीत कासले? (Who is Ranjit Kasle?)

- रणजीत कासले हे बीडच्या सायबर विभागात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते.  
- सायबर विभागात दाखल झालेल्या गुन्ह्यात तपासासाठी ते परवानगी न घेता परराज्यात गेले होते. 
- मात्र वरिष्ठांची परवानगी न घेता परराज्यात गेल्याचा ठपका त्यांच्यावर होता 
- परराज्यात गेले असता त्यांनी आरोपींकडून पैशांची देवाण-घेवाण केली असा आरोप त्यांच्यावर होता. 
- विधानसभा निवडणुकीदरम्यान परळीत कार्यरत असताना माजी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या गाड्या पकडणं, पैशांच्या पेट्या पकडल्या असा दावा रंजीत कासले यांनी केला होता.
- तसेच वाल्मिक कराड हा फिल्म प्रोड्यूसर असल्याचा दावा करत मुंबईतील आलिशान ऑफिसचे फोटो कासले यांनी पोस्ट केले होते. 
- आता त्यानंतर वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर असल्याचा दावा कासले यांनी केला आहे.

संबंधित बातमी:

Beed Crime: मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर देण्यात आली होती, बीडच्या पोलीस अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
Team India : टीम इंडियाला आणखी एक धक्का,तिलक वर्मानंतर वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर, T20 वर्ल्ड कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह
टीम इंडियाला धक्का,तिलक वर्मानंतर आणखी एक खेळाडू न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर

व्हिडीओ

Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग
Special Report Orange Guard :ठाकरे बंधू दक्ष,भगवा गार्डचं लक्ष,मतदान केंद्रावर पोलिसांबरोबर बाचाबाची
BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
Team India : टीम इंडियाला आणखी एक धक्का,तिलक वर्मानंतर वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर, T20 वर्ल्ड कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह
टीम इंडियाला धक्का,तिलक वर्मानंतर आणखी एक खेळाडू न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर
Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
Shankar Jagtap : शंकर जगतापांचा अश्विनी जगतापांवर पलट'वार'! गृहकलहाने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ
शंकर जगतापांचा अश्विनी जगतापांवर पलट'वार'! गृहकलहाने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
Embed widget