Santosh Deshmukh Case: संतोष देशमुखांच्या भावाचे विष्णू चाटेला 35 कॉल, 36 व्या कॉलला डेड बॉडीच पाठवली
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख आणि अपहरण व हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी विष्णू चाटे यांच्यात 36 वेळा कॉल झाल्याचं सुरेश धस म्हणाले.
Beed: बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलं असून दुसरीकडे हत्या प्रकरणातील मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. एकीकडे संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) यांच्या हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत असताना आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी य घटनेत धक्कादायक खुलासा केलाय. संतोष देशमुख यांचे अपहरण झाल्यानंतर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि आरोपी विष्णू चाटे यांच्यात 36 वेळा कॉल झाले होते. 'आत्ता भाऊंना पाठवतो असं चाटे म्हणत राहिला. 36व्या कॉलला डायरेक्ट बॉडीच पाठवली असं सुरेश धस यांनी सांगितलंय.
संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी विष्णू चाटे (Vishnu Chate) जयराम चाटे प्रतीक घुले आणि महेश केदारला या आधीच अटक करण्यात आली आहे. या क्रूर घटनेला अनेक दिवस उलटून गेले असले तरी संतोष देशमुख यांचे मारेकरी अद्याप मोकाटच असल्याची जनभावना आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे यांच्यासह इतर आरोपींवरही अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
काय म्हणाले सुरेश धस?
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख आणि अपहरण व हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी विष्णू चाटे यांच्यात 36 वेळा कॉल झाल्याचं सुरेश धस म्हणाले. यातील 35 कॉल धनंजय देशमुखने विष्णू चाटेला केल्याचं ते म्हणाले. प्रत्येक वेळी वीस मिनिटात तुझा भाऊ पाठवतो असं चाटे म्हणत होता. धनंजय देशमुखांना 35 वेळा विष्णू चाटेने हेच सांगितलं. 36व्या कॉलला बॉडीच पाठवली. असं सुरेश धस म्हणाले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत असताना अपहरण आणि नंतर हत्तीचा हा थरार त्यांनी सांगितला.
वाल्मिक कराडवर 15 गुन्हे, सुदर्शन घुलेवर 19 गुन्हे दाखल
संतोष देशमुख यांची हत्या आणि पवनचक्की खंडणी प्रकरणातील सर्वच गुन्हेगार अट्टल असून मुख्य आरोपी सुदर्शन घुले सुद्धा वाल्मिक कराडच्या पुढचा असल्याचे दिसून येत आहे. खंडणी, हाफ मर्डर, असेच गुन्हे या प्रकरणातील सर्व आरोपींवर दाखल होत आहेत. मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप होत असलेला खंडणीखोर वाल्मिक कराडवर 19 गुन्हे दाखल आहेत. सुदर्शन घुलेवर तब्बल 19 गुन्ह्यांची नोंद आहे. कृष्णा आंधळेवर सहा गुन्ह्यांची नोंद आहे, महेश केदारवर सहा गुन्ह्यांची नोंद आहे. प्रतीक घुलेवर पाच गुन्ह्यांची नोंद आहे. जयरामम चाटेवर तीन गुन्ह्यांची नोंद आहे, विष्णू चाटे आणि सुधीर सांगळेवर दोन गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामुळे इतके गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई होणार का? असा प्रश्न आहे.
हेही वाचा:
Special Report Ajit pawar : धनूभाऊ, अजितदादांची सव्वा तास खलबतं, काय ठरलं?