कोरोनाची लक्षणे पुन्हा दिसली म्हणून वरळीतील दाम्पत्याची आत्महत्या
कोरोनाची लक्षणे पुन्हा दिसली म्हणून दाम्पत्याने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मुंबईतील वरळी येथे घडली आहे.
मुंबई : मुंबईतील वरळी येथील भारत मिल्क को-ऑपरेटिव्ह सोसायटी मध्ये एकच खळबळ उडाली जेव्हा त्याच सोसायटीमध्ये राहणार्या पती-पत्नीने राहत्या घरात आत्महत्या केली. मृत पती-पत्नीचं नाव अजय कुमार आणि सुजा असं होतं. दोघेही केरळ येथील राहणारे होते आणि दहा महिन्यापूर्वीच त्यांचं लग्न झालं होते. बुधवारी वरळी पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात फोन आला आणि पोलिसांचा पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले.. तिथे पोहोचल्या नंतर पोलिसांनी दोघांनाही नायर रुग्णालयात नेले जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
एप्रिल महिन्यामध्ये पती आणि पत्नी दोघेही कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. बरं होऊन दोघे ही घरी परतले मात्र काही दिवसानंतर त्यांना पुन्हा कोरोनाची लक्षणे जाणवू लागली या संदर्भात पोलिसांनी त्यांच्या घरातून सुसाईड नोट सुद्धा सापडली आहे. ज्यामध्ये त्यांनी आपल्या मृत्यूचे कारण कोरोनाची लक्षण दिसल्याचं लिहल आहे. पती अजय कुमार हा एका प्रायव्हेट कंपनीत नवी मुंबई येथे काम करायचा तर पत्नी सूजा एका खाजगी बँकेत कामाला होती,या दोघांचं नवीनच लग्न झालं होतं.
अजय कुमार आणि सुचाचे नवीनच लग्न झालं होतं त्यांच्या लग्नाला फक्त दहा महिनेच झाले होते वरळी येथील भारत मिल्स मध्ये दोघेही भाड्याच्या घरात राहत होते,आपला सुखी संसार ते थाटतच होते की एप्रिल आणि मे 2021 च्या दरम्यान या नवं दांपत्याला कोरोनाची लागण झाली. दोघांनाही कोरोनाची लक्षणे पुन्हा जाणवू लागली त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास येत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिस मात्र या प्रकरणात अधिक तपास करत असून दोघांचाही एटोपसी रिपोर्टची वाट पाहत आहेत जेणे करून मृत्यूचं कारण हे स्पष्ट होऊ शकेल. पतीचा मृतदेह किचन मध्ये सापडला तर पत्नीचा मृतदेह हॉल आणि बाथरूमच्या मधल्या जागेत सापडला.
बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास सुजाच्या आईने सुजाला कॉल केला होता, वारंवार फोन करून सुद्धा सुजा फोन उचलत नव्हती ज्यामुळे तिची आई चिंतित झाली. त्यानंतर सुजाच्या आईने सुजाच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या तिच्या मैत्रिणीला फोन करून सुजाला बघायला सांगितलं सुजाची मैत्रीण वारंवार दार ठोठावत होती तरी सुद्धा सुजाने काही दार उघडलं नाही. संध्याकाळी सातच्या सुमारास जेव्हा शेजाऱ्यांनी दार तोडून घरात शिरले तेव्हा त्यांना दोघांचाही मृतदेह आढळला. शेजाऱ्यांनी तात्काळ कंट्रोल रूमला संपर्क केला कंट्रोल रूमवरून जेव्हा वरळी पोलीस स्टेशनला फोन आला तेव्हा वरळी पोलीस ठाण्याच्या पथक घटनास्थळी पोहोचले आणि दोघांनाही नायर रुग्णालयात घेऊन गेले.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात त्यांना निदर्शनास आलं की दोघांनाही एप्रिल आणि मे महिन्याच्या दरम्यान कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर दोघेही बरे होऊन आले. त्यानंतर सुजा तिच्या आईच्या घरी केरळ येथे गेली. सुजा जेव्हा मुंबईला परतली, तेव्हा नवरा बायको दोघेही नित्यनियमाप्रमाणे त्यांच्या कामावर जाऊ लागले. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांना पुन्हा कोरोनाची लक्षणे जाणवू लागली ज्यामुळे दोघेही चिंतित झाले. त्यांच्या घरातून मिळालेल्या सुसाईड नोट मध्ये त्यांनी कोरोन ची लक्षणे पुन्हा दिसू लागल्या कारणाने ते आत्महत्या करत असल्याचं लिहिलं आहे मात्र या प्रकरणात पोलिस अधिक तपास करीत आहेत..