एक्स्प्लोर

धक्कादायक! स्पेनहून भारतात आलेल्या महिला पर्यटकावर सामूहिक अत्याचार; तिघांना अटक

Crime News : पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. तसेच तिघांना ताब्यात घेतले असून, वैद्यकीय तपासणीसह संपुर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.

Crime News : महिला अत्याचाराच्या घटना काही थांबता थांबत नसल्याचे चित्र असतानाच, आता स्पेनहून (Spain) भारतात (India) आलेल्या महिला पर्यटकावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी (1 मार्च) रात्री उशिरा एका स्पेनच्या महिलेवर सामूहिक बलात्कार (Rape) करण्यात आला आहे. ही महिला आपल्या पतीसोबत भारताच्या दौऱ्यावर आली होती. असे असतानाच झारखंडमधील (Jharkhand) दुमका येथील हंसदिहा पोलीस स्टेशन हद्दीत तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. तसेच तिघांना ताब्यात घेतले असून, वैद्यकीय तपासणीसह संपुर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.

जारमंडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष कुमार यांनी सांगितले की, स्पेनच्या महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना शुक्रवारी रात्री घडली. याशिवाय उर्वरित माहिती नंतर दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच दुसऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, शुक्रवारी रात्री हे जोडपे बांगलादेशहून बाईकवरून दुमका येथे पोहोचले होते. तेथून बिहार आणि नंतर नेपाळला जाणार होते. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास हंसडीहा बाजारापूर्वी कुंजी-कुरुमहाट नावाच्या ठिकाणी ते तंबू ठोकून मुक्कामी थांबले होते. 

आरोपींमध्ये 7-8 तरुणांचा सहभाग

तंबू ठोकून मुक्कामी असलेल्या या स्पेनच्या महिलेवर सात ते आठ स्थानिक तरुणांनी सामूहिक बलात्कार केला. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे, तर उर्वरित लोकांचा शोध सुरू आहे. पीडितेला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंडमध्ये होते त्या दिवशी ही कथित सामूहिक बलात्कार प्रकरणाची घटना घडली आहे. विशेष म्हणजे आपल्या याच दौऱ्यात झारखंड राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थाबाबत पंतप्रधान मोदी यांनी गंभीर चिंता व्यक्त केली होती.

भाजपने राज्य सरकारवर साधला निशाणा

याप्रकरणी भाजप आमदार अनंत ओझा म्हणाले की, "हा राज्याला लागलेला कलंक आहे. यावरून राज्यातील ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था दिसून येते. राज्यात परदेशी नागरिकही सुरक्षित नाहीत. पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करावी आणि सरकारनेही याची दखल घ्यावी. अशा अराजकतावाद्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी देखील आमदार ओझा यांनी केली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

अनैतिक संबधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढला, दिल्लीतील गुंडांना 30 लाखांची सुपारी देऊन संपवलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil : पवार साहेबांनी सुप्रिया सुळे सोडून नेहमी इतरांना संधी दिली, पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा : जयंत पाटील
पवार साहेबांनी सुप्रिया सुळे सोडून नेहमी इतरांना संधी दिली, पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा : जयंत पाटील
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 
मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 
Marathi Serial Updates Zee Marathi :  'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या'  अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या' अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM : 14 May  2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सAaditya Thackeray Majha Vision : राज ठाकरेंसह युती का होत नाही? आदित्य ठाकरे पहिल्यांदाच बोललेAaditya Thackeray Majha Vision : मला शिंदेगटाकडून निरोप आला...गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोलाAaditya Thackeray Majha Vision : काकाचं दिल्लीत वाका झालंय... एकनाथ शिंदेंवर ठाकरेंचा टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil : पवार साहेबांनी सुप्रिया सुळे सोडून नेहमी इतरांना संधी दिली, पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा : जयंत पाटील
पवार साहेबांनी सुप्रिया सुळे सोडून नेहमी इतरांना संधी दिली, पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा : जयंत पाटील
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 
मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 
Marathi Serial Updates Zee Marathi :  'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या'  अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या' अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला! शिंदे गटाकडून निरोप, नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला! शिंदे गटाकडून निरोप, नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
घरी मुलीच्या लग्नाची तयारी अन् पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू
घरी मुलीच्या लग्नाची तयारी अन् पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू
3 जागा, 6 संघ... प्लेऑफची स्पर्धा रंजक; CSK, RCB की SRH कुणाची वर्णी? पाहा नेमकं समीकरण
3 जागा, 6 संघ... प्लेऑफची स्पर्धा रंजक; CSK, RCB की SRH कुणाची वर्णी? पाहा नेमकं समीकरण
Embed widget