Shraddha Walkar Murder Case : ऑनलाइन ट्रान्झॅक्शन, लोकेशन आणि बेपत्ता झाल्याची तक्रार; 'त्या' 54 हजारांमुळेच झाला आफताबचा पर्दाफाश
Shraddha Walkar Murder Case : 54 हजारांच्या ट्रान्झॅक्शनमुळे झाला श्रद्धाच्या खूनाचा उलगडा. ऑनलाइन ट्रान्झॅक्शन आणि आफताबनं पोलिसांना दिलेला जबाब, यामध्ये तफावत असल्यानं पोलिसांचा संशय बळावला आणि गुन्हा उलगडला.
![Shraddha Walkar Murder Case : ऑनलाइन ट्रान्झॅक्शन, लोकेशन आणि बेपत्ता झाल्याची तक्रार; 'त्या' 54 हजारांमुळेच झाला आफताबचा पर्दाफाश shraddhas walker friends had expressed apprehension of untoward incident to police vasai police workout exposed aftab poonawalla Marathi News Shraddha Walkar Murder Case : ऑनलाइन ट्रान्झॅक्शन, लोकेशन आणि बेपत्ता झाल्याची तक्रार; 'त्या' 54 हजारांमुळेच झाला आफताबचा पर्दाफाश](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/16/688c7c3d4136d6b729e13c2ee0da4ebe1668578289090218_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shraddha Walkar Murder Case : श्रद्धा हत्याकांडाचा (Shraddha Walkar Murder Case) उलगडा झाला आणि अवघा देश हादरला. लिव्ह-इन पार्टनरची एवढ्या निर्घुण आणि निर्दयीपणे हत्या करणाऱ्या आफताबविरोधात (Aftab Poonawalla) देशभरातून संतापाची लाट उसळली. या हत्याकांडाचा तब्बल पाच ते सहा महिन्यांनी उलगडा होण्यासाठी 54 हजारांच्या ट्रान्झॅक्शनची मोठी मदत झाली आहे. श्रद्धाच्या खात्यातून आरोपी आफताबच्या खात्यात 54 हजार रुपये ट्रान्स्फर करण्यात आले होते. याच ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचा तपास करताना आरोपी आफताबचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
पालघर पोलिसांनी श्रद्धा वालकरचे बालपणीचे मित्र लक्ष्मण नाडर आणि सुबिन यांचा जबाबाची गांभीर्यानं दखल घेतली. लक्ष्मणनं पोलिसांना दिलेल्या जबाबातून माहिती दिली की, श्रद्धा नेहमी त्याच्या संपर्कात असायची. त्याच्याशी बऱ्याच गोष्टी शेअर करायची. पण अचानक बेपत्ता झाली. तिच्याशी कोणताच संपर्क होत नव्हता. म्हणून काहीतरी चुकीचं झाल्याचा आम्हाला संशय आला. ही गोष्ट जाऊन त्यानं श्रद्धाच्या वडिलांना सांगितली. त्यानंतर श्रद्धाच्या वडिलांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार माणिकपूर पोलीस ठाण्यात दाखल केली.
आफताबला पश्चातापच नाही
पालघर जिल्ह्यातील वसई पोलिसांनी सर्वांचे जबाब नोंदवले, तेव्हा आफताबला श्रद्धाच्या बेपत्ता होण्याचं कोणतंही दु:ख किंवा पश्चाताप नव्हता. भांडण झाल्यावर तो नेहमी घर सोडण्याबाबत श्रद्धाला धमकी द्यायचा.
26 ऑक्टोबर रोजी वसई पोलिसांनी सर्वात आधी आफताबचा जबाब नोंदवला होता. 14 मे रोजी श्रद्धा आणि आफताब छतरपूरच्या घरी शिफ्ट झाले. आफताबनं आपल्या पहिल्या जबाबात सांगितलं की, 22 मे रोजी भांडण झाल्यानंतर श्रद्धा तिचा फोन घेऊन घरातून निघून गेली होती. 26 मे रोजी श्रद्धाचा फोन बंद झाला." पण, वसई पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं होतं की, श्रद्धाचा फोन 22 ते 26 मे दरम्यान, ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरला जात होता. श्रद्धाच्या बँक खात्यातून आफताबच्या खात्यात 54 हजार ट्रान्सफर करण्यात आले होते. ऑनलाईन व्यवहार झाला, त्यावेळी फोनचं लोकेशन छतरपूर होतं. मात्र आफताबनं जबाबात खोटं सांगितलं होतं.
11 नोव्हेंबरच्या दिवशी जेव्हा वसई पोलीस आणि दिल्ली पोलिसांनी एकत्र आफताबची चौकशी केली. त्यावेळी आफताबनं त्याला श्रद्धाचा पासवर्ड माहीत होता आणि पैसे त्यानंच ट्रान्सफर केल्याचं सांगितलं.
वसई पोलिसांनी आफताबनं सांगितलेली ठिकाणं, त्याचा दिल्लीतील पत्ता, लोकेशन तपासलं. त्यावेळी त्यांना संशय आला. तसेच, आफताब लपवाछपवी करुन दिशाभूल करत असल्याचं लक्षात आलं. आफताबने 15 आणि 16 मे रोजी श्रद्धाच्या एटीएममधून पैसे काढले होते. यावरुन पोलिसांचा आफताबवरील संशय बळावू लागला. वसई पोलिसांनी याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला.
वसई पोलीस आणि दिल्ली पोलिसांनी एकत्र चौकशी केली असता आफताबवरील संशय आणखी बळावला. पोलिसांनी त्याची कसून चौकशी सुरु केली. त्यानंतर आफताबन गुन्हा कबुल केला. एवढंच नाहीतर, श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचंही आफताबनं पोलिसांना सांगितलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)