Dexter Web Series : जी वेबसीरिज पाहून आफताबनं श्रद्धाच्या खुनाचा प्लॅन आखला, त्या Dexter ची कहाणी नेमकी काय?
Dexter Web Series : श्रद्धा हत्याकांडातील क्रूरता पाहून संपूर्ण देश हादरला. तिचा प्रियकर आफताब पूनावालानं तिच्या शरीराचे 35 तुकडे केले.
Dexter Web Series : प्रेम... लिव्ह-इन रिलेशनशिप... संताप... खून... दिल्लीत घडलेल्या श्रद्धा हत्याकांडानं संपूर्ण देश हादरला आहे. प्रियकराकडून निर्घुणपणे श्रद्धाची हत्या करण्यात आली. या घटनेतील अनेक पैलू पोलीस तपासातून समोर येत आहेत. हे एखाद्या क्राईम-थ्रिलर वेबसिरीजपेक्षा कमी नाही. देशातील प्रत्येकाच्याच मनात एकच प्रश्न आहे की, कोणी एवढं क्रूर कसं असू शकतं?
दिल्ली पोलिसांनी श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावालाला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 28 वर्षीय आफताबनं दिल्लीत त्याची लिव्ह-इन पार्टनर असलेल्या श्रद्धा वालकरची हत्या केली आणि त्यानंतर तिच्या शरीराचे एक, दोन नाहीतर तब्बल 35 तुकडे केले. त्यानंतर ते तुकडे फ्रीजमध्ये ठेवले आणि नंतर दिल्लीतील वेगवेगळ्या भागांत फेकून दिले. पोलीस चौकशीत आफताबनं सांगितलं की, श्रद्धानं लग्नासाठी तगादा लावला होता. रोजच्या कटकटीला वैतागून त्यानं अखेर तिची हत्या केली. महत्त्वाचं म्हणजे, आपल्याला एका सीरीजमधून श्रद्धाच्या हत्येची कल्पना सुचल्याचा धक्कादायक खुलासा आफताबनं केला आहे. अमेरिकन क्राईम सीरीज 'डेक्स्टर' (Dexter) पाहूनच आफताबनं श्रद्धाच्या हत्येचा कट रचला होता.
Dexter कथा नेमकी काय?
डेक्स्टर हे अमेरिकन टेलिव्हिजन ड्रामा आहे. सर्वात आधी ही सीरिज अमेरिकेतील केबल चॅनल्सवर प्रसारित करण्यात आली होती. आता ही सीरिज OTT प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. डेक्स्टरचे 1 ऑक्टोबर 2006 ते 22 सप्टेंबर 2013 पर्यंत एकूण 8 सीझन रिलीज करण्यात आले आहेत. 8 सीझन्समध्ये एकूण 96 एपिसोड्स आहेत. 8 सीझन्सच्या या सीरिजमध्ये क्राईम, ड्रामा, सस्पेन्स, थिलर सगळं काही आहे. सीरिजची कथा मायकल सी. हॉलने साकारलेल्या Dexter Morgan भोवती फिरते. मियामी मेट्रो पोलीस विभागात ब्लड पॅटर्न एनालिस्ट आहे. डेक्स्टर गुन्हेगारांना शोधतो आणि त्यांना मारुन टाकतो. पण, एवढं करुनही तो कायद्याच्या कचाट्यात सापडत नाही.
पण का हत्या करतो डेक्सटर?
3 वर्षांचा असताना त्याच्या आईची निर्घुणपणे हत्या होते. तब्बल दोन दिवस त्याची आई रक्ताच्या थारोळ्यात तशीच पडलेली होती. त्यानंतर डेक्स्टरला मियामीचे पोलीस अधिकारी हॅरी मॉर्गन यांनी दत्तक घेतलं. पुढे काही दिवसांनी डेक्स्टर अत्यंत आक्रमक असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. डेक्सटर खून करूनही स्वतः निष्पाप असल्याचं दाखवण्यासाठीही डेक्सटर नव्या योजना आखायचा.
आफताब आणि डेक्सटर च्या कहाणीमध्ये साम्य नेमकं काय?
श्रद्धाच्या हत्येनंतर आफताबनं 300 लिटरचा नवा फ्रिज खरेदी केला होता. ही कल्पनाही त्याला Dexter मधूनच सुचली होती. 20 मे रोजी आफताबनं श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि फ्रिजमध्ये ठेवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबनं हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं होतं. तो शेफ म्हणून काम करत होता. तो शिकत असताना त्यानं तब्बल दोन दिवस मांस कापण्याची ट्रेनिंग घेतलं होतं. याचा उपयोग त्यानं श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करताना केला. आफताबनं दोन दिवसांपर्यंत श्रद्धाच्या शरीराचे तुकडे केले. त्यानंतर खोलीतील दुर्गंध घालवण्यासठी अगरबत्ती आणि रुम फ्रेशनरचा वापर केला.
डेक्स्टरही सीरिजमध्ये असंच काहीसं करतो. पहिल्या सीझनमध्ये डेक्स्टर मृतदेहांचे शरीर तोडतो. त्यानंतर त्याचे लहान लहान तुकडे करुन प्रत्येक तुकडा बायोडिग्रेडेबल कचऱ्याच्या बॅगमध्ये ठेवतो. खोलीतील प्लास्टिक शीट्स नष्ट करायचो. त्यानंतर ते बॅग्स आपल्या गाडीत घेऊन नदीपर्यंत पोहोचतो आणि आणि ते तुकडे नदीत टाकतो.
हत्या करताना सावध राहायचा डेक्सटर
'डेक्स्टर' क्रिमिनल्सची हत्या करताना खूप सावधगिरी बाळगायचा. तो हातात ग्लव्स घालून हत्या करायचा आणि ज्या खोलीत तो हत्या करायचा, तिथे सगळीकडे प्लास्टिक शीट्स अंथरायचा. मृतदेहांचे तुकडे केल्यानंतर ते अटलांटिक महासागरातील गल्फ स्ट्रीममध्ये फेकून द्यायचा.
ही वेब सिरीज कुठे बघता येईल?
'डेक्स्टर' या क्राईम-ड्रामा वेब सिरीजचे आतापर्यंत 8 सीझन आले आहेत. त्याचा पहिला सीझन 2006 मध्ये रिलीज झाला होता आणि शेवटचा म्हणजेच, आठवा सीझन 2013 मध्ये आला होता. तुम्ही ही वेब सिरीज OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर पाहू शकता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :