श्रद्धा वालकर हत्येतील आरोपी लॉरेन्स बिश्नोई गँगच्या हिटलिस्टवर, तिहार तुरुंगातच संपवण्याचा होता कट; पण...
लॉरेन्स बिश्नोई गँग गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. बाब सिद्दीकी यांच्या हत्येनंतर या गँगचे अनेक कारनामे समोर येत आहेत.
मुंबई : ऑक्टोबर महिन्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या झाली. या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. पोलीस या घटनेचा कसूप तपास करत असून आतापर्यंत पोलिसांनी अनेकांना बेड्या ठोकल्या आहेत. सिद्दीकी यांच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई गँग चर्चेत आली होती. सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणात बिश्नोई गँगचा हात असल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान, हीच बिश्नोई गँग आता आणखी एका कारणामुळे चर्चेत आली आहे. श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपीही या गँगच्या हिटलिस्टवर होता, असं सांगण्यात येतंय.
शिवकुमार-शुभम यांच्यात झाली होती चर्चा
बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पथकातील एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपीही लॉरेन्स बिश्नोई गँगच्या हिटलिस्टरवर होता. श्रद्धा वालकर या तरुणीची 2022 साली त्याच्या लिव्ह इन पार्टनरने निर्घृण हत्या केली होती. मुंबई पोलिसाच्या गुन्हे शाखेतील सूत्रांनुसार बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात शिवकुमार गौतम हा प्रमुख आरोपी आहे. याच शिवकुमार गौतमने वरील माहिती दिली आहे. गौतमने सांगितल्यानुसार बिश्नोई गँगचा सदस्य असलेल्या शुभम लोणकरने त्याच्यासोबत श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपीवर हल्ला करण्याबाबत चर्चा केली होती. मात्र तिराह तुरुंगात या आरोपीला कडक सुरक्षेत ठेवण्यात आल्याने त्यांनी हा हल्ला करण्याचे टाळले होते, असे समोर आले आहे.
श्रद्धा वालकर हत्या प्रकरण काय आहे?
दिल्लीच्या छत्तरपूर पहाडी या भागात 18 मे 2022 रोजी श्रद्धा वालकर या तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर संपूर्ण देश हादरला होता. आरोपीने श्रद्धा वालकरची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकटे केले होते. हे तुकडे रेफ्रिजीरेटरमध्ये ठेवले होते. हेच तुकडे नंतर जंगलात जाऊन त्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता. हे प्रकरण समोर आल्यानंतर 12 नोव्हेंबर 2022 रोजी आरोपीला अटक करण्यात आली होती. सध्या हा आरोपी तिहारच्यात तुरुंगात आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात आरोपीने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी करवतीसारख्या उपकरणांचा वापर केला होता, असे नमूद आहे.
हेही वाचा :
सलमान खानला जिवंत रहायचं असेल तर...; 'भाईजान'ला पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी