एक्स्प्लोर

सलमान खानला जिवंत रहायचं असेल तर...; 'भाईजान'ला पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी

Salman Khan Death Threat : अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा बिश्नोई गँगकडून धमकी मिळाली आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या भावाने धमकी दिली आहे.

Salman Khan Lawrence Bishnoi Death Threat : अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा धमकी मिळाली आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या भावाने आता सलमान खानला धमकी दिली आहे. सलमान खाननं माफी मागावी, अन्यथा त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांना धमकीचा मेसेज आला आहे. धमकी देणाऱ्याने लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने धमकीचा मेसेज मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला पाठवला आहे.

अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा धमकी

 वाहतूक नियंत्रण कक्षाला आलेल्या मेसेजमध्ये लारेन्स बिष्णोईचा भाऊ बोलत असल्याचं सांगत धमकी देण्यात आली आहे. अभिनेता सलमान खान लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर असल्याचं बोललं जात आहे. सलमान खान काळवीट शिकार प्रकरणामध्ये आरोपी आहे. बिश्नोई समाज काळविटाची पूजा करतो, यामुळे या प्रकरणापासून लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला धमक्या देण्यास सुरुवात केली. एप्रिल 2024 मध्ये सलमानच्या घरावर गोळीबारही करण्यात आला होता. दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

"सलमान खानला जिवंत रहायचं असेल तर..."

वाहतूक नियंत्रण कक्षाला आलेल्या मेसेजमध्ये दावा करण्याता आला आहे की, संबंधित व्यक्ती गँगस्ट लॉरेन्स बिश्नोईला भाऊ आहे. धमकीच्या मेसेजमध्ये लिहिलं आहे की, 'सलमान खानला जिवंत रहायचं असेल तर त्याने आमच्या मंदिरात जाऊन माफी मागावी, किंवा पाच कोटी रुपये द्यावे. असे न केल्यास आम्ही त्याला जीवे मारू. आमची गँग आजही सक्रिय आहे'. असा धमकीवजा मेसेज मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाला सोमवारी मध्यरात्री आला आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण  कक्षाला मेसेज करणाऱ्या व्यक्तीचा शोध सध्या पोलिस घेत आहेत. या प्रकरणी तपास सुरु आहे.

सलमान खान बिश्नोई गँगकडून वारंवार धमक्या

काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खानलाही जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांनी नोएडा येथून एका व्यक्तीला अटक केली होती. मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक हेल्पलाइन क्रमांकावर अनेक व्हॉट्सॲप मेसेज पाठवून बॉलिवूड सुपरस्टारकडून दोन कोटी रुपयांची मागणी केल्याप्रकरणी वरळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

सलमान खानची 25 कोटींची सुपारी

बिश्नोई गँगच्या अटकेत असलेल्या आरोपीने पोलिस तपासात खुलासा केला होता की, लॉरेन्स बिश्नोई गँगने त्यांना सलमान खानला जीवे मारण्यासाठी 25 कोटी रुपयांची सुपारी दिली होती. सलमानच्या मुंबई आणि पनवेल येथील फार्म हाऊसवर अनेक जणांना रेकी करण्यासाठी ठेवण्यात आलं होतं. सलमान खानला पनवेलच्या फार्म हाऊसवर मारण्याचा प्लॅन होता, अशीही धक्कादायक माहिती आरोपींनी पोलिस चौकशीत दिली आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Abhishek-Aishwarya Divorce : अभिषेक बच्चनकडून घटस्फोटावर शिक्कामोर्तब? ऐश्वर्या रायच्या वाढदिवशी केलं असं काही की...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

AC Local : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या, 3 नॉन एसी लोकल नव्यानं  सुरु  
मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
IND vs PAK : भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड

व्हिडीओ

Special Report Manoj Jarange On Protest : जरांगेंचा पुन्हा एल्गार,आंदोलनाआधी सरकारच्या हालचाली सुरु?
Special Report Pune Kalakar Katta : पुण्यातला कलाकार कट्टा हटवणार?; भाजपच्या नगरसेवकांची मागणी
Special Report MVA : मविआची मैत्री सेट तरच 'रेड कार्पेट'; Uddhav Thackeray विधान परिषदेवर जाणार?
Narhari Zirwal Special Report झिरवळांच्या कार्यालयात क्लार्कला 35 हजारांची लाच स्विकारताना अटक
NCP Merge Special Report शशिकांत शिंदेंच्या लेखामध्ये काय?,राष्ट्रवादीचं विलिनीकरण कुठे अडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AC Local : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या, 3 नॉन एसी लोकल नव्यानं  सुरु  
मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
IND vs PAK : भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
Maharashtra live blog updates: मुंबई महानगर क्षेत्रात ‘पॉड टॅक्सी’साठी महापालिकांनी आराखडा तयार करावा; एकनाथ शिंदेंचे निर्देश
मुंबई महानगर क्षेत्रात ‘पॉड टॅक्सी’साठी महापालिकांनी आराखडा तयार करावा; एकनाथ शिंदेंचे निर्देश
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
IND vs PAK : पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, नामिबियाच्या फलंदाजांनी धुलाई केल्यानं सुनील गावस्कर नाराज,  'या' खेळाडूचं नाव सूचवलं 
पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, सुनील गावस्कर यांचा सूर्यकुमार यादवला सल्ला, कोणाचं नाव सूचवलं?
Embed widget