Shraddha Murder Case : चेहऱ्यावर जखमा असलेला श्रद्धाचा फोटो समोर, आफताबच्या निर्दयीपणाचा आणखी एक पुरावा
Shraddha Murder Case : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात श्रद्धाचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये श्रद्धाच्या चेहऱ्यावर जखमा दिसत आहेत.
Delhi Murder Case : मुंबईतील तरुणी श्रद्धा वालकर हिचा दिल्लीत निर्घृणपणे तिचा बॉयफ्रेड आफताब अमीन पुनावालाने खून केला आणि तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करत त्याची विल्हेवाट लावली. या प्रकरणाने संपूर्ण देश हादरून गेला आहे. श्रद्धाला आफताब मारहाण करायचा मात्र ती हे सर्व सहन करुन नातं टिकवण्यासाठी धडपड करत होती. या प्रकरणात आता श्रद्धाचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये श्रद्धाच्या चेहऱ्यावर आणि मानेवर जखमा दिसत आहेत. सहा महिन्यांपूर्वी आफताबने केलेला गुन्हा अखेर समोर आला. पोलिसांकडून या प्रकरणात तपास आणि फॉरोन्सिकच्या मदतीन पुरावे गोळा करण्याचं काम सुरु आहे. या प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन खुलासे होत आहेत.
श्रद्धाचा एक फोटो समोर
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाबाबत रोज नवनवीन खुलासे होत आहेत. पोलीस ठोस पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचवेळी आता श्रद्धाचे फोटो समोर आले असून, त्यामुळे आरोपी आफताबची क्रूरता पुन्हा एकदा लोकांसमोर आली आहे. हा फोटो श्रद्धाच्या मित्राने समोर आणला आहे. ज्यामध्ये आफताबने श्रद्धाला केलेल्या मारहाणीनंतरच्या जखमा दिसत आहेत. फोटोमध्ये श्रद्धाच्या चेहऱ्यावर आणि मानेवर जखमा स्पष्ट दिसत आहेत. हा फोटो पाहून आफताबने श्रद्धाला किती बेदम मारहाण केली होती याचा अंदाज लावला जाऊ शकतो. हा फोटो डिसेंबर 2020 मधील आहे.
फोटोमध्ये श्रद्धाच्या चेहऱ्यावर जखमा
या फोटोमध्ये श्रद्धाच्या हसऱ्या चेहऱ्यावर किती जखमा आहेत त्यावरून याचा अंदाज लावता येतो की, एवढ्या वेदना सहन करुनही श्रद्धाला कोणत्याही परिस्थितीत त्यांचं प्रेम टिकवायचं होतं. पण आफताब राक्षस असेल हे तिला माहीत नव्हतं. श्रद्धाने अँगर मॅनेजमेंटसाठी डॉक्टरांची मदतही मागितली होती, मात्र ही मदत तिला मिळाली नाही. यानंतर श्रद्धा दिल्लीला शिफ्ट झाली, पण दोघांमधील भांडणं कमी झाली नाहीत. अनेकवेळा श्रद्धा आफताबच्या हिंसाचाराची बळी ठरली. तिच्या हत्या करण्यापूर्वीही एकदा आफताबने श्रद्धाला मारण्याचा प्रयत्न केला होता, पण नंतर श्रद्धाच्या रडण्यामुळे तो थांबला.
दारुच्या नशेत आफताब श्रद्धाला मारहाण करायचा
दारूच्या नशेत आफताब श्रद्धाला अनेकदा शिवीगाळ करत असे तपासात समोर आलं आहे. तो दारूच्या नशेत असायचा आणि श्रद्धावर त्याचा काढत तिला मारहाण करायचा. दोघेही मुंबईत राहत असतानाही आफताबने अनेक वेळा श्रद्धाला दारुच्या मारहाण केली होती. ज्याबद्दल श्रद्धाने तिच्या काही मित्रांनाही सांगितलं होते. त्यानंतर चर्चेतूनच हे प्रकरण मिटलं होतं.
हत्येला सहा महिने उलटून गेल्याने पुरावे गोळा करण्याचं आव्हान
आफताबला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पोलीस पुरावे गोळा करण्यात गुंतले आहेत. हत्येला सहा महिने उलटून गेल्याने पुरावे गोळा करण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. आफताबने कोणत्या शस्त्राने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केले, याचा पोलीस शोध घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पोलीस याबाबत आफताबची चौकशी करत आहेत, मात्र तो सातत्याने पोलिसांची दिशाभूल करत आहे. आता पोलीस आफताबच्या चॅटचा शोध घेत आहेत.