Shraddha Murder Case: श्रद्धा हत्याकांड प्रकरणाशी पाणी बिलाचा संबंध काय? पोलीस तपासात आणखी एक मोठा खुलासा
Shraddha Murder Case: श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात पाण्याचं बिल महत्त्वाचा पुरावा ठरणार? समोर आली मोठी अपडेट...
Shraddha Murder Case: श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) हत्या प्रकरणात नवनवे खुलासे होत आहेत. समोर आलेल्या नव्या माहितीनुसार, श्रद्धाची हत्या झाल्यानंतरच्या दिवसात आफताबनं (Aftab Poonawalla) पाण्याचा खूप वापर केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आफताबनं अधिक पाणी वापरलं का? आणि श्रद्धा हत्याकांडाच्या प्रकरणात पाण्याचं बिल महत्त्वाचा पुरावा ठरणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
दिल्ली पोलीस (Delhi Police) गुरुवारी आफताबला साकेत न्यायालयात हजर करणार आहेत. आफताबची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी दिल्ली पोलिसांकडून केली जाणार आहे. अटकेनंतर साकेत न्यायालयानं आफताबला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. न्यायालयानं सुनावलेली पोलीस कोठडी आज संपत आहे. याप्रकरणी पोलीस सर्व पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आफताब आणि श्रद्धा राहत असलेल्या फ्लॅटची पाणी बिलाची थकबाकी सुमारे 300 रुपये असल्याची महत्त्वाची माहिती शेजाऱ्यांकडून पोलिसांना मिळाली आहे.
शेजाऱ्यांनी पोलिसांना काय माहिती दिली?
दिल्लीतील ज्या परिसरात श्रद्धा आणि आफताब राहायचे, त्या भागात दाटीवाटीची लोकवस्ती आहे. एकाच मजल्यावर जास्तीत जास्त लोक भाड्याच्या घरांमध्ये राहतात. दिल्लीमध्ये 20 हजार लिटरपर्यंतचं पाण्याचं बिल दिल्ली सरकारच्या वतीनं फ्री आहे. प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर पोलिसांनी आफताब आणि श्रद्धाच्या शेजाऱ्यांकडे चौकशी केली. त्यावेळी शेजाऱ्यांनी पाणी बिलासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मजल्यावरील सर्वांचं पाणी बिल शून्य आलंय. मात्र आफताबचं पाण्याचं बिल 300 रुपये आलं आहे.
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धाची हत्या केल्यानंतर रक्त स्वच्छ करण्यासाठी आफताब पाण्याचा वापर करायचा. त्यामुळेच पाण्याचं बिल एवढं आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून आफताब वारंवार पाण्याची टाकी पाहण्यासाठी वरती जायचा, असंही शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं.
रेंट अॅग्रीमेंटवर कोणाचं नाव?
श्रद्धा आणि आफताबनं केलेल्या रेंट अॅग्रीमेंटवर श्रद्धा वालकरचं नाव आधी आणि त्यानंतर आफताबचं नाव लिहिलं असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. घरमालकानं दिलेल्या माहितीनुसार, त्या दोघांचं लग्न न झाल्याची माहिती त्यांनी घरमालकाला दिली होती. एका दलालानं श्रद्धा आणि आफताबला घर मिळवून दिलं होतं. आफताब न चुकता दरमाह 8 तचे 10 तारखेदरम्यान, घरमालकाच्या खात्यात 9000 रुपये जमा करायचा.
महत्त्वाच्या इतर बातम्या :