मोठी बातमी : शिर्डीतील बहुचर्चित सागर शेजवळ प्रकरणातील आरोपी कारागृहातून फरार, नगरमध्ये एकच खळबळ
Ahmednagar News : शिर्डीतील बहुचर्चित सागर शेजवळ प्रकरणातील आरोपी कोपरगाव कारागृहातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला आहे. कारागृहातून आरोपी फरार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Shirdi Crime News : शिर्डीतील (Shirdi) बहुचर्चित सागर शेजवळ हत्याकांडातील आरोपी कारागृहातून फरार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोपरगाव येथील कारागृहातील (Kopargaon Jail) मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची (Police) पथके रवाना झाली असून यामुळे एकाच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सागर शेजवळ हत्याकांडातील आरोपी योगेश उर्फ गोट्या पारधे (Yogesh Pardhe) हा कोपरगाव येथील कारागृहात जेरबंद होता. त्याने छातीत दुखत असल्याचे सांगत रुग्णालयात घेऊन जाण्याची पोलिसांना विनंती केली. मात्र रुग्णालयात नेत असताना ड्युटीवरील पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पारधे फरार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
कोपरगाव कारागृहात एकच खळबळ
आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. मात्र कारागृह प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यापूर्वी कोपरगाव कारागृहात आरोपींकडे मोबाईल सापडल्याच्या घटना समोर आल्या होत्या. आता थेट आरोपीच कोपरगाव कारागृहातून फरार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून फरार आरोपीचा कसोशीने शोध सुरु आहे.
काय होत प्रकरण?
2015 साली शिर्डीत बाबासाहेब आंबेडकरांची रिंगटोन वाजली म्हणून सागर शेजवळ या दलीत तरुणाची हत्या करण्यात आली होती. शिर्डी इथल्या बिअर बारमध्ये 16 मे 2015 रोजी ही घटना घडली होती. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले होते. यातील नऊ आरोपींपैकी योगेश पारधे (रा. कोल्हार, ता.राहाता, जि. अहमदनगर) हा एक आरोपी आहे. योगेश पारधे हा कोपरगाव येथील कारागृहातील शिक्षा भोगत होता. मात्र आता तो कारागृहातून निसटला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या