धक्कादायक! दुसऱ्याशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून प्रेयसीला इमारतीवरून ढकलले, तरुणीचा जागीच मृत्यू
साताऱ्यातील कराड येथील कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात शिक्षण घेत होते.प्रेमसंबंधातून धक्कादायक प्रकार समोर आता आहे.
Satara Crime: दुसऱ्याशी प्रेमसंबंध असल्याचा संशय घेत प्रियकराने प्रेयसीला इमारतीवरून ढकलून दिल्याने तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. साताऱ्यातील कराड तालुक्यात घडलेल्या या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. आरुषी सिंग असे प्रेयसीचे नाव असून ध्रूव छिक्कर असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. काल रात्री प्रेयसीची आई कराडमध्ये दाखल झाल्यानंतर मध्यरात्री 103 कलमाअंतर्गत ध्रुव वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्यामुळे अध्यापक अटक करण्यात आलेली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्रेमसंबंधातून धक्कादायक प्रकार समोर
साताऱ्यातील कराड येथील कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात शिक्षण घेत होते. प्रेयसी आरुषी आणि ध्रुव यांचे दिल्लीत एकत्र शिकत असताना पासूनचे प्रेम संबंध होते. त्यामुळे त्यांनी एकत्रच कराड मधील कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कॉलेजच्या जवळच असलेल्या सन सिटी इमारतीमध्ये तो राहत होता. बुधवारी ध्रुवणे आरुषीला आपल्या फ्लॅटवर बोलावून घेतलं होतं. तुझे दुसऱ्या मुलासोबत प्रेम संबंध आहेत असे म्हणत त्याने आरुषी ला दुसऱ्या मजल्यावरून ढकलून दिले. यात आरुषीचा जागीच मृत्यू झाला. यावेळी झालेल्या झटापटीत ध्रुवही जखमी झाला असून त्याचा पाय मोडल्याचे सांगण्यात येत आहे.
झटापटीत प्रियकरही जखमी, उपचार सुरू
प्रेयसी आरुषी आणि ध्रुवमध्ये झालेल्या वादावादीत दुसऱ्याशी प्रेम संबंध असल्याचा आरोप करत प्रियकराने तरुणीचा दुसऱ्या मजल्यावरून ढकलून दिले. या झटापटीत प्रियकर ही जखमी झाला असून त्याचा पाय मोडलाच सांगण्यात आले आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून अद्याप त्यास अटक झालेली नाही.
तरुणीचं भीतीपोटी टोकाचं पाऊल
माझ्यासोबत मैत्री कर, मला भेटायला ये असे म्हणून आरोपी विद्यार्थिनीला गेल्या वर्षभरापासून त्रास देत होता. माझ्यावर प्रेम केलं नाही तर आत्महत्या करेल, अशी धमकीही या तरुणाने या विद्यार्थिनीला दिली होती. त्यामुळे घाबरलेल्या बीएचएमएसच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या (BHMS Student) गायत्री दाभाडे (Gayatri Dabhade) या तरुणीने हॉस्टेलमध्येच (Hostel) गळाफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी दत्तू गायके (Dattu Gaike) याला पोलिसांनी (Police) अटक केली आहे. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा: