सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 4 आरोपी अजूनही मोकाट; पोलिसांच्या भूमिकेवर संशय, राजकीय दबावातून दिरंगाई?
Santosh Deshmukh Murder Case : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात आरोप असलेले केजचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.
Sarpanch Santosh Deshmukh Murder Case Beed : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात अनेक आरोप-प्रत्यारोप होत असल्याचे चित्र आहे. अशातच या प्रकरणात आरोप असलेले केजचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. त्यांचा अतिरिक्त पदभार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्याकडे देण्यात आलाय.
तर दुसरीकडे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे यांच्यासह सात जणांचा सहभाग आढळला, यातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र अद्याप चार आरोपी फरार आहे. दरम्यान या प्रकरणात आता पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात आल्याने पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना निलंबित करण्यात आलंय. त्या पाठोपाठ आता पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. मात्र प्रशांत महाजन यांना दोषी पकडून या प्रकरणांमध्ये त्यांना सहआरोपी करा, अशी मागणी दलित पॅंथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी केली आहे.
पोलीस निरीक्षक महाजन यांनाही या प्रकरणात सह आरोपी करा -दीपक केदार
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी केज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना आजच सक्तीच्या रजेवर पाठवला आहे. मात्र प्रशांत महाजन यांना दोषी पकडून या प्रकरणांमध्ये त्यांना सहारोपी करा अशी मागणी दलित पॅंथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी केली आहे. संतोष देशमुख यांची हत्या ज्या वादातून झाले ते अशोक सोनवणे या दलित व्यक्तीवर हल्ला झाला होता. त्या संदर्भात तो वाद मिटवण्यासाठी गेले होते आणि त्यातून परत वाद वाढला आणि त्यात संतोष देशमुख यांची हत्या झाली. म्हणून संतोष देशमुख यांच्या हस्ते प्रकरणांमध्येच अशोक सोनवणे या दलित व्यक्तीची पण तक्रार घेऊन गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी दीपक केदार यांनी केली आहे.
एस.पी ऑफिस समोर कराड समर्थकांचा ठिय्या
संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध होत असतानाच आता जिल्ह्यात वाल्मीक करा यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याविरोधातही लोक रस्त्यावर उतरताना पाहायला मिळत आहेत. एकीकडे नगर- आष्टी रोडवर रास्ता रोको झाला असताना बीड एसपी कार्यालयासमोर कराड समर्थकांनी ठिय्या दिला आहे. वाल्मीक काड यांच्यावर राजकीय व्यवस्थेतून गुन्हा दाखल झाला आहे. तो मागे घेण्याची मागणी आंदोलकांकडून केली जात आहे.
डोईठाण येथील अहमदनगर बीड-कल्याण महामार्गावर रस्ता रोको.
वाल्मिक कराड यांच्या वरील खोटा गुन्हा मागे घ्यावा, या मागणीसाठी डोईठाण येथील अहमदनगर बीड-कल्याण महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ही मागणी ही यावेळी आंदोकांनी केली आहे. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावी, तसेच सामाजिक कार्यकर्ते वाल्मिक कराड यांच्यावरील खोटा खंडणीचा गुन्हा तात्काळ माघे घ्यावा, या मागणीसाठी डोईठाण येथे रस्ता रोको करण्यात आला आहे. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. एक तास रस्ता रोको हा आष्टी तालुक्यातील डोईठाण येथील अहमदनगर बीड कल्याण रस्त्यावर करण्यात आला आहे. यावेळी तालुक्यातील शेकडो ग्रामस्थ रस्ता रोकोमध्ये सहभागी झाले होते.
हे ही वाचा