एक्स्प्लोर

Santosh Deshmukh Murder Case Updates: वाल्मिक कराडने ती कागदपत्रे मागवली; उज्जवल निकम यांनी सर्व सांगितलं, तिसऱ्या सुनावणीत काय काय घडलं?

Santosh Deshmukh Murder Case Updates Ujjwal Nikam: मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली.

Santosh Deshmukh Murder Case Updates Ujjwal Nikam बीड: बीडमधील मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी (Santosh Deshmukh Murder Case) आज (10 एप्रिल) बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत आरोपीच्या वकिलांनी जे कागदपत्र मागितली होती ती सर्व देण्यात आली. तर फॉरेन्सिक लॅबमधून आलेले पुरावे तपासून पुढील तारखेला तुमच्या वकिलांना दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले. यानंतर न्यायाधीश व्यंकटेश पाटवदकर यांनी पुढील सुनावणी 24 एप्रिल रोजी होणार आहे. 

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी संपल्यानंतर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि सुनावणीची दरम्यानची माहिती दिली. आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) याने काही कागदपत्रे मागतील ती दिली आहेत. सीलबंद दस्तावेज आहेत ते सील उघडल्यानंतर देऊ, असं उज्ज्वल निकम म्हणाले. आरोपीच्या वकिलांनी मागितलेली सर्व कागदपत्र सादर केली. तसेच संतोष देशमुखांच्या मारहाणीचा व्हिडीओ न्यायलयात हजर केला, असं उज्ज्वल निकम यांनी सांगितले. 

उज्ज्वल निकम काय म्हणाले?

आरोपीच्या वकिलांनी मागितलेला कागदपत्र सादर केली. संतोष देशमुखांच्या मारहाणीचा व्हिडीओ न्यायलयात हजर केला.  व्हिडीओ आरोपींनीच रेकॉर्ड केला आहे. हा व्हिडीओ बाहेर येऊ नये,अशा विनंती कोर्टाला केली, अशी माहिती उज्ज्वल निकम यांनी दिली. आरोपी वाल्मिक कराडची चल आणि अचल संपत्तीवर रितसर सुनावणी होईल. वाल्मिकने या प्रकरणात तो सहभागी नाही,असा अर्ज केला आहे. डिस्चार्जमध्ये अनेक मुद्दे मांडले आहेत. या गुन्ह्यात वाल्मिक कराडचा सहभाग नाही आणि इतर बाबी या अर्जात आहेत. सीआयडीकडून वाल्मिक कराडच्या संपत्तीवर तपास सुरू आहे, असंही उज्वल निकम यांनी सांगितले. 

तिसऱ्या सुनावणीत बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात काय काय घडलं?

बीडच्या विशेष मकोका न्यायालयात आज न्यायाधीश व्यंकटेश पाटवदकर यांच्यासमोर झाली सुनावणी 

- आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले

- सरकार पक्षाच्या वतीने विशेष वकील एडवोकेट उज्वल निकम यांनी बाजू मांडली 

- आरोपींच्या वतीने ॲड विकास खाडे यांनी बाजू मांडली

- सरकारी पक्षाच्या वतीने मुद्देमाल न्यायालयात जमा करण्यात आला 

- या मुद्देमालामध्ये काही सीलबंद पॉकेट्स होते ते न्यायालयासमोर उघडली जाणार त्यानंतर आरोपींच्या वकिलांना दिली जाणार 

- सीलबंद पॉकेटमध्ये 164 ब चे जवाब पंचनामे यासह इतर बाबींचा समावेश 

- मुद्देमालामध्ये आरोपींनी गुन्हा करताना वापरलेले शस्त्र तसेच इतर जप्त करण्यात आलेले साहित्य यांचा समावेश 

- या प्रकरणातील आरोपी क्रमांक 1 वाल्मीक कराड याचे डिस्चार्ज एप्लीकेशन न्यायालयात दाखल करण्यात आले 

- गतवेळच्या सुनावणीवेळी यासंबंधीचा अर्ज करण्यात आला होता 

- या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे हा सध्या लातूर कारागृहात आहे त्याला बीडच्या कारागृहात हलवण्यात यावे यासाठी विष्णू चाटेचे वकील राहुल मुंडे यांनी अर्ज दाखल केला

- या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली असल्यामुळे विष्णू चाटे याला बीड येथील कारागृहात हलवावे अशी मागणी करण्यात आली 

- याबाबत सरकार पक्षाच्यावतीने से दिल्यानंतर कारवाई होऊ शकेल.

संतोष देशमुख प्रकरणाच्या पहिल्या आणि दुसऱ्या सुनावणीत काय काय घडलं?

खटल्याचा घटनाक्रम- पहिली सुनावणी:

केज येथील जिल्हा व सत्र न्यायालयात 12 मार्चला पहिली सुनावणी झाली. बचाव पक्षाने डिजिटल पुरावे, सीडीआर, आरोपींचे जबाब देण्याची मागणी केली होती. त्यावर सरकारी वकिलांनी पुढील सुनावणीत पुरावे देऊ असे सांगितले.

दुसरी सुनावणी:

26 मार्चला सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद करत कराड याने इतर आरोपींना गाइड केल्याचे सांगितले. कराडचे वकील विकास खाडे यांनी सीडीआर, फुटेज, कागदपत्रांची मागणी केली. त्यानुसार कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचे निर्देश न्यायाधीशांनी दिले.

संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 एप्रिलला, video:

संबंधित बातमी:

Santosh Deshmukh Murder Case: काही वेळात तुमच्या भावाला सोडतो, विष्णू चाटे धनंजय देशमुखांना काय म्हणाला होता?, जबाबात धक्कादायक माहिती समोर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Municipal Election 2026: नाशिकच्या प्रभाग 8 मध्ये जादूटोणा? हळद, कुंकू, तांदूळ आढळल्याने खळबळ, शिवसेनेच्या विलास शिंदेंचा विरोधकांवर गंभीर आरोप
नाशिकच्या प्रभाग 8 मध्ये जादूटोणा? हळद, कुंकू, तांदूळ आढळल्याने खळबळ, शिवसेनेच्या विलास शिंदेंचा विरोधकांवर गंभीर आरोप
Gold Rate Weekly Update : आठवड्यात सोनं स्वस्त झालं की महाग, चांदी दरातील तेजी सुरुच, जाणून घ्या बाजारात काय घडलं?
आठवड्यात सोनं स्वस्त झालं की महाग, चांदी दरातील तेजी सुरुच, जाणून घ्या बाजारात काय घडलं?
इरई नदीपात्रात 3 वर्षीय वाघाचा मृतदेह आढळल्याने खळबळ; वन विभाग आले, पोस्टमार्टमसाठी पाठवले
इरई नदीपात्रात 3 वर्षीय वाघाचा मृतदेह आढळल्याने खळबळ; वन विभाग आले, पोस्टमार्टमसाठी पाठवले
श्रेय चोरणारी टोळी सक्रीय झाली, त्यांचं मराठीवरचं प्रेम 'पुतना मावशीचं' आहे, त्यांचा वचननामा म्हणजे फक्त टोमणेनामा, घोटाळेनामा; ठाकरे बंधूंना उद्देशून एकनाथ शिंदे काय काय म्हणाले?
श्रेय चोरणारी टोळी सक्रीय झाली, त्यांचं मराठीवरचं प्रेम 'पुतना मावशीचं' आहे, त्यांचा वचननामा म्हणजे फक्त टोमणेनामा, घोटाळेनामा; ठाकरे बंधूंना उद्देशून एकनाथ शिंदे काय काय म्हणाले?

व्हिडीओ

Rupali Thombare Pune:Ajit Pawar यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या Mahesh Landgeयांच्यावर ठोंबरे संतापल्या
Sanjay Raut Mumbai: फडणवीसांना आव्हान, 11 लाखांचं बक्षीस; ठाकरें बंधूंच्या सभेआधी संजय राऊत काय काय म्हणाले?
Eknath Shinde Majha Katta :मुंबई,श्रेयवाद,ठाकरे बंधू ते महायुती! एकनाथ शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्‍यांवर टीका
Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Municipal Election 2026: नाशिकच्या प्रभाग 8 मध्ये जादूटोणा? हळद, कुंकू, तांदूळ आढळल्याने खळबळ, शिवसेनेच्या विलास शिंदेंचा विरोधकांवर गंभीर आरोप
नाशिकच्या प्रभाग 8 मध्ये जादूटोणा? हळद, कुंकू, तांदूळ आढळल्याने खळबळ, शिवसेनेच्या विलास शिंदेंचा विरोधकांवर गंभीर आरोप
Gold Rate Weekly Update : आठवड्यात सोनं स्वस्त झालं की महाग, चांदी दरातील तेजी सुरुच, जाणून घ्या बाजारात काय घडलं?
आठवड्यात सोनं स्वस्त झालं की महाग, चांदी दरातील तेजी सुरुच, जाणून घ्या बाजारात काय घडलं?
इरई नदीपात्रात 3 वर्षीय वाघाचा मृतदेह आढळल्याने खळबळ; वन विभाग आले, पोस्टमार्टमसाठी पाठवले
इरई नदीपात्रात 3 वर्षीय वाघाचा मृतदेह आढळल्याने खळबळ; वन विभाग आले, पोस्टमार्टमसाठी पाठवले
श्रेय चोरणारी टोळी सक्रीय झाली, त्यांचं मराठीवरचं प्रेम 'पुतना मावशीचं' आहे, त्यांचा वचननामा म्हणजे फक्त टोमणेनामा, घोटाळेनामा; ठाकरे बंधूंना उद्देशून एकनाथ शिंदे काय काय म्हणाले?
श्रेय चोरणारी टोळी सक्रीय झाली, त्यांचं मराठीवरचं प्रेम 'पुतना मावशीचं' आहे, त्यांचा वचननामा म्हणजे फक्त टोमणेनामा, घोटाळेनामा; ठाकरे बंधूंना उद्देशून एकनाथ शिंदे काय काय म्हणाले?
राज ठाकरे म्हणाले मुंबई विमानतळ बंद करुन जागा विकायचा केंद्राचा डाव; प्रकाश महाजनांचं उत्तर अन् टीका
राज ठाकरे म्हणाले मुंबई विमानतळ बंद करुन जागा विकायचा केंद्राचा डाव; प्रकाश महाजनांचं उत्तर अन् टीका
'प्रभास की जय ' म्हणत चित्रपटगृहात फिरवल्या मगरी.. ; प्रेक्षकांही घाबरले, चाहत्यांचा एकच धुमाकूळ; Video व्हायरल
'प्रभास की जय ' म्हणत चित्रपटगृहात फिरवल्या मगरी.. ; प्रेक्षकांही घाबरले, चाहत्यांचा एकच धुमाकूळ; Video व्हायरल
दोन महिने हिंदू मुस्लीम करून जुमलानामा जाहीर केला, पण भाजपच्या 2017 च्या जाहीरनाम्यातील पूरमुक्त मुंबई, 11 लाख घरे, आणि छत्रपती शिवराय, बाबासाहेबांच्या स्मारकांचं काय झाले? काँग्रेसचा हल्लाबोल
दोन महिने हिंदू मुस्लीम करून जुमलानामा जाहीर केला, पण भाजपच्या 2017 च्या जाहीरनाम्यातील पूरमुक्त मुंबई, 11 लाख घरे, आणि छत्रपती शिवराय, बाबासाहेबांच्या स्मारकांचं काय झाले? काँग्रेसचा हल्लाबोल
BMC Election 2026 Mahayuti Manifesto: पाच वर्षांसाठी पाणीपट्टी वाढीला स्थगिती ते लाडक्या बहिणींना बेस्टमध्ये 50 टक्के सवलत; महायुतीकडून मुंबईकरांसाठी घोषणांचा पाऊस
पाच वर्षांसाठी पाणीपट्टी वाढीला स्थगिती ते लाडक्या बहिणींना बेस्टमध्ये 50 टक्के सवलत; महायुतीकडून मुंबईकरांसाठी घोषणांचा पाऊस
Embed widget