एक्स्प्लोर

Rupali Thombare: मी नाही त्यातली अन्..., रुपाली चाकणकरांनीच अशोक खरातचं प्रकरण दाबलं; भोंदूबाबा राज्य महिला आयोग चालवत होता, रूपाली ठोंबरेंचा चाकणकरांवर घणाघात

Rupali Thombare: चाकणकर अतिशय निच आहेत आणि त्यांना या प्रकरणाची सावली माहिती होती, त्यांचं म्हणजे मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली असं वागणं असा घणाघात रूपाली ठोंबरे यांनी केला आहे.

पुणे : नाशिकमध्ये भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात अडचणीत सापडलेल्या रूपाली चाकणकर यांच्यावरती विरोधकांसह त्यांच्याच पक्षाच्या नेत्या रूपाली ठोंबरेंनी हल्लाबोल केला आहे. रूपाली ठोंबरे (Rupali Thombre) यांनी चाकणकरांवरती गंभीर आरोप केला आहे. रूपाली पाटील चाकणकर या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्राधार असल्याचा आरोप ठोंबरे यांनी केला आहे. याप्रकरणात रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना आरोपी करावे, असे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे.

राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा नाशिक मधील सेक्स रॅकेट प्रकरणात रूपाली चाकणकर या मुख्य आरोपी आहेत. कायद्याला धरून करण्यात आलेली ही मागणी आहे आणि या प्रकरणात कलम १२० अंतर्गत त्या मुख्य आरोपी होतात असं सांगत ठोंबरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. रुपाली चाकणकर अतिशय निच आहेत आणि त्यांना या प्रकरणाची सावली माहिती होती, त्यांचं म्हणजे मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली असं वागणं असा घणाघात रूपाली ठोंबरे यांनी केला आहे. या प्रकरणात पुण्यातील एका महिला समाजसेविका सुद्धा आहेत त्यांच्यासोबत त्यांची तडजोड झाली असा सुद्धा आरोप ठोंबरे यांनी केला आहे. 

रूपाली ठोंबरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून रुपाली चाकणकर यांना या संपूर्ण 'सेक्स रॅकेट'च्या मुख्य सूत्रधार ठरवून कलम १२० (ब) अंतर्गत तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. खरातच्या अघोरी कृत्यांमध्ये आणि या रॅकेटमध्ये चाकणकर यांच्या सहभागाशिवाय हे सर्व घडणे अशक्य आहे, असा दावा त्यांनी केला. खरातवर गेल्या वर्षभरापासून कारवाई होऊ नये म्हणून चाकणकर यांनी आपल्या संवैधानिक पदाचा (महिला आयोग अध्यक्ष) गैरवापर करून त्याला राजकीय पाठबळ दिले आणि गुन्हे दाबण्याचा प्रयत्न केला. खरातला ब्लॅकमेल करणाऱ्या दोन मुलांनी जेव्हा एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेला भेटून पुरावे दिले, तेव्हा त्या महिलेने खरातशी (गुरुमाऊली) आर्थिक तडजोड करून हे प्रकरण दुसऱ्यांदा दाबले. या सामाजिक कार्यकर्त्या महिलेचे नाव लवकरच समोर येईल, असेही त्यांनी सांगितले. 

खरातच्या मोबाईलमधील आक्षेपार्ह व्हिडिओंचा आकडा आता २५० च्या वर गेला आहे. यात गोरगरिबांपासून हाय-प्रोफाईल महिलांपर्यंत अनेकांचा समावेश आहे.अनेक महिला प्रतिष्ठेपोटी समोर यायला घाबरत आहेत, कारण त्यांना या भोंदू बाबाने अत्यंत अघोरी आणि निंदनीय प्रकार (उदा. मूत्र पाजणे) करायला लावले आहेत. रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला असला, तरी तो आनंदाने दिलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना "आधी राजीनामा द्या आणि मगच बोला, अन्यथा मी पत्र काढून हकालपट्टी करेन" अशा कडक भाषेत तंबी दिली होती, असा दावा ठोंबरे यांनी केला. राजीनामा देताना चाकणकर हसत होत्या, यावरून ठोंबरे यांनी टीका केली की, "ज्या पदावर बसून महिलांचे रक्षण करायचे होते, त्या पदाचा राजीनामा देताना किमान लाज वाटायला हवी होती" असंही त्यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा राधाकृष्ण विखे पाटील यांचे खरातसोबतचे फोटो हे केवळ शिर्डीत दर्शनाला गेले असतानाचे आहेत. कार्यकर्त्यांनी सांगितले म्हणून ते तिथे गेले होते, त्यांचा या अघोरी कृत्यांशी संबंध नाही. मात्र, रुपाली चाकणकर यांना खरातचे सर्व कारनामे माहित होते आणि त्यांनीच त्याला राजकीय वलय मिळवून दिले. खरातला ३९ लाख लिटर पाणी आरक्षित करून देणे किंवा सरकारी सोयीसुविधा मिळवून देण्यासाठी कोणी प्रेशर टाकले, याचा सखोल तपास व्हावा अशी मागणी त्यांनी केली. राजकारण्यांनी कोणत्याही भोंदू बाबाच्या नादाला लागू नये. "तुम्हाला मंत्रीपद देतो किंवा अप्सरा देतो" असे सांगून वश करणाऱ्या लोकांपासून आणि अशा महिलांपासून लांब राहावे, असा सल्ला त्यांनी दिला. जर पोलिसांनी चाकणकर यांच्यावर ठोस कारवाई केली नाही, तर आपण उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

रूपाली ठोंबरे पाटील यांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी एसआयटी (SIT) प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्या तपासावर विश्वास व्यक्त केला असून, शेवटच्या गुन्हेगाराला शिक्षा होईपर्यंत लढा सुरू ठेवणार असल्याचे सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
धक्कादायक! चार जणांच्या टोळक्यानं युवकाला जागीच संपवलं, नांदेडच्या ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीतच घडली घटना
धक्कादायक! चार जणांच्या टोळक्यानं युवकाला जागीच संपवलं, नांदेडच्या ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीतच घडली घटना
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget