एक्स्प्लोर

Rohit Arya Encounter: गोळी छातीतून शिरली अन् पाठीतून बाहेर निघाली, रोहित आर्यच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये नक्की काय?

Rohit Arya Encounter: मुंबईतील पवई परिसरात एका स्टुडिओमध्ये 17 अल्पवयीन मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला होता.

Rohit Arya Encounter: मुंबईतील पवई परिसरात एका स्टुडिओमध्ये 17 अल्पवयीन मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्य (Rohit Arya) याचा पोलिसांकडून एन्काऊंटर (Encounter) करण्यात आला. रोहित आर्यवर शनिवारी पहाटे पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यविधीवेळी केवळ पाच जण उपस्थित होते. त्यात त्याची पत्नी, मुलगा, मेव्हणा आणि इतर दोन जवळचे नातेवाईकांचा समावेश होता. तर रोहित आर्यच्या मृतदेहावर मुंबईतील जे. जे. रुग्णालयात (J J Hospital) शवविच्छेदन करण्यात आले. या शवविच्छेदनाचा अहवाल (Postmortem report) आता समोर आला आहे.

Rohit Arya Encounter: शवविच्छेदन अहवालात काय उघड झाले?

रोहित आर्यचा मृतदेह शुक्रवारी सायंकाळी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता. रोहित आर्यचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याबाबतची माहिती शवविच्छेदन अहवालातून उघड झाली आहे. रोहित आर्यच्या छाती आणि पाठीतून गोळी आरपार गेल्याची जखम आढळून आली आहे. छातीत गोळी मारल्यानंतर ती थेट पाठीतून बाहेर पडली, त्यामुळे त्यांची जिवंत राहण्याची काहीच संधी नव्हती. परिणामी रोहित आर्यचा मृत्यू झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.  

शवविच्छेदनापूर्वी मृतदेहाचे एक्स-रे काढण्यात आले, तसेच संपूर्ण प्रक्रिया व्हिडिओद्वारे चित्रीत करण्यात आली. पुढील रासायनिक परीक्षणासाठी व्हिसेरा नमुने सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, एन्काऊंटरनंतर तब्बल 24 तासांहून अधिक काळ रोहित आर्यच्या कुटुंबीयांशी पोलिसांचा संपर्क झाला नव्हता. त्यामुळे शवविच्छेदन उशिरा करण्यात आले. अखेर शुक्रवार सायंकाळी नातेवाईक रुग्णालयात पोहोचल्यानंतर शवविच्छेदनाची प्रक्रिया पार पडली. 

Rohit Arya Encounter: नेमकं काय घडलं होतं? 

रोहित आर्या हा महाराष्ट्र सरकारसाठी 'स्वच्छता मॉनिटर' या मोहिमेवर काम करत होता. या प्रकल्पासाठी त्याने स्वतःच्या खिशातून तब्बल दोन कोटी रुपयांहून अधिक खर्च केला होता. परंतु सरकारकडून थकबाकीची रक्कम परत मिळत नसल्याने तो मानसिक तणावाखाली होता. आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून त्याने मुंबईतील पवईतील एका स्टुडिओमध्ये लघुपट ऑडिशनच्या नावाखाली राज्यभरातील मुलांना बोलावले. या ठिकाणी त्याने 17 अल्पवयीन मुलांना बंदिस्त करून ठेवले आणि सरकारने देयकाची रक्कम द्यावी, अशी मागणी केली. या प्रकरणाची माहिती मिळताच मुंबई पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (ATS) कारवाई करत आर्यचा एन्काऊंटर केला. त्याचवेळी झालेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

चित्रपटाच्या पटकथेचे वास्तवात रूपांतर, मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटरने शेवट; पोलीस तपासात धक्कादायक खुलासा

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget