एक्स्प्लोर

Bhiwandi Crime : भिवंडीत वीटभट्टीवरील 11 वेठबिगार मजुरांची सुटका; आर्थिक पिळवणूक केल्याचं उघडकीस

Crime News : भिवंडी तालुक्यातील चिंबिपाडा येथे सिद्दीकी शेख यांची वीटभट्टी असून त्याठिकाणी मंजू संतोष पवार तिचा पती संतोष पवार, मुलगा संदीप, सुनील आणि वडील लक्ष्मण सवरा हे मागील 8 वर्षांपासून वीटभट्टीवर मजुरी करत आहेत.

Bhiwandi Crime : भिवंडी : वीटभट्टी व्यवसायात मोठ्या प्रमाणावर आदिवासी मजूर काम करत असताना त्यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक होण्याचे प्रकार समोर येत आहेत. भिवंडी तालुक्यातील चिंबी पाडा परिसरात वीटभट्टी मालकानं आदिवासी मजुरांना आपल्या वीटभट्टीवर विठबिगरी म्हणून ठेऊन त्यांची आर्थिक पिळवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आणला. वीटभट्टी मालका विरोधात भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवंडी तालुक्यातील चिंबिपाडा येथे सिद्दीकी शेख यांची वीटभट्टी असून त्याठिकाणी मंजू संतोष पवार तिचा पती संतोष पवार, मुलगा संदीप, सुनील आणि वडील लक्ष्मण सवरा हे मागील 8 वर्षांपासून वीटभट्टीवर मजुरी करत आहेत. त्यासाठी 5 हजार रुपये बयाणा देऊन कामावर घेऊन गेला आणि दर आठवड्याला फक्त 800 रुपये इतका कमी मोबदला देऊन राबवून घेत होता. तर इतरत्र कामावर जाण्यास वीटभट्टी मालकाला सांगितल्यावर तुमचे पैसे अजून फिटलं नाहीत, असं धमकावून काम करून घेत असताना त्यांना मारहाण आणि शिवीगाळसुद्धा करत असे. आपली आणि आपल्यासोबत इतर मजुरांची आर्थिक पिळवणूक करत असल्या बाबत मंजू संतोष पवार हिने गावातील श्रमजीवी संघटनेच्या अलका भोईर यांना माहिती दिली.

त्यानंतर संस्थापक विवेक पंडित यांनी  मंगळवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास वीटभट्टीवर धाव घेत पाहणी केली. त्याठिकाणी मंजू संतोष पवार यांसह दहा आदिवासी मजूर हे वेठबिगार म्हणून काम करत असल्याचं आढळून आलं. त्यानंतर याबाबत भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात मंजू संतोष पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून वीटभट्टी मालक सिद्दीकी शेख या विरोधात अट्रोसिटीसह विठबिगरी कायद्यानं गुन्हा दाखल करण्यात आलं आहेत. तर त्यानंतर विवेक पंडित यांनी तहसीलदार अधिक पाटील यांची भेट घेऊन त्यांना तात्काळ वेठबिगार मुक्तीचे प्रमाणपत्र दिले आहे.

देशाला स्वतंत्र मिळून 76 वर्ष झाली तरीही मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आदिवासी कातकरी समाजातील मजुरांची पिळवणूक होत आहे, हे दुर्दैवी असून अशा मालकांविरोधात कठोर कारवाई करून या मजुरांचं पुनर्वसन करण्याची मागणी विवेक पंडित यांनी केली आहे. ो

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अशोक खरातच्या फरार पत्नीच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली; कोर्टाकडून नवी तारीख, नेमकं काय घडलं?
अशोक खरातच्या फरार पत्नीच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली; कोर्टाकडून नवी तारीख, नेमकं काय घडलं?
धक्कादायक! जालन्यात बँकेची 23 कोटी 33 लाखांची फसवणूक, खोटा शेतीमाल दाखवून 177 जणांच्या नावे उचललं कर्ज
धक्कादायक! जालन्यात बँकेची 23 कोटी 33 लाखांची फसवणूक, खोटा शेतीमाल दाखवून 177 जणांच्या नावे उचललं कर्ज
'मुलगा तुझ्यासारखा दिसत नाही' म्हणत गावकऱ्यांचे वारंवार टोमणे, निर्दयी जन्मदात्या बापानं पोटच्या सहा वर्षाच्या लेकराला मारलं; एक महिन्यानंतर थरकाप उघडकीस
'मुलगा तुझ्यासारखा दिसत नाही' म्हणत गावकऱ्यांचे वारंवार टोमणे, निर्दयी जन्मदात्या बापानं पोटच्या सहा वर्षाच्या लेकराला मारलं; एक महिन्यानंतर थरकाप उघडकीस
Amravati Crime News: मित्राचीच रूम भाड्याने घ्यायचा; मुलींना घेऊन यायचा, नको ते करताना व्हिडीओ काढायचा अन्...अमरावतीतील व्हिडीओ कांडमधील धक्कादायक माहिती समोर
मित्राचीच रूम भाड्याने घ्यायचा; मुलींना घेऊन यायचा, नको ते करताना व्हिडीओ काढायचा अन्...अमरावतीतील व्हिडीओ कांडमधील धक्कादायक माहिती समोर

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'मुलगा तुझ्यासारखा दिसत नाही' म्हणत गावकऱ्यांचे वारंवार टोमणे, निर्दयी जन्मदात्या बापानं पोटच्या सहा वर्षाच्या लेकराला मारलं; एक महिन्यानंतर थरकाप उघडकीस
'मुलगा तुझ्यासारखा दिसत नाही' म्हणत गावकऱ्यांचे वारंवार टोमणे, निर्दयी जन्मदात्या बापानं पोटच्या सहा वर्षाच्या लेकराला मारलं; एक महिन्यानंतर थरकाप उघडकीस
अशोक खरातच्या फरार पत्नीच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली; कोर्टाकडून नवी तारीख, नेमकं काय घडलं?
अशोक खरातच्या फरार पत्नीच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली; कोर्टाकडून नवी तारीख, नेमकं काय घडलं?
'तर आपण त्यांना काय सांगावे?' निवडणुकीत सक्तीच्या मतदानाची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
'तर आपण त्यांना काय सांगावे?' निवडणुकीत सक्तीच्या मतदानाची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का, आयपीएलमध्ये 91 विकेट घेणारा गोलंदाज दुखापतीमुळं बाहेर, ऋतुराज गायकवाडचं टेन्शन वाढलं
चेन्नईला मोठा धक्का, IPL मध्ये 91 विकेट घेणारा गोलंदाज दुखापतीमुळं बाहेर, ऋतुराज गायकवाडचं टेन्शन वाढलं
भाजप 'नारी'ला केवळ 'नारा' बनवत आहे, जातीय जनगणना टाळण्याचा डाव, यूपीत जागा वाढण्यामागे षड्यंत्र, परिसीमन म्हणजे निवडणूक नकाशा आपल्या राजकीय सोयीनुसार बदलण्याचा डाव; अखिलेश यादवांचा हल्लाबोल
भाजप 'नारी'ला केवळ 'नारा' बनवत आहे, जातीय जनगणना टाळण्याचा डाव, यूपीत जागा वाढण्यामागे षड्यंत्र, परिसीमन म्हणजे निवडणूक नकाशा आपल्या राजकीय सोयीनुसार बदलण्याचा डाव; अखिलेश यादवांचा हल्लाबोल
Video: आदित्य ठाकरेंनी महिलेला मारलं, निशिकांत दुबेंच्या आरोपाने सभागृह तापलं, अरविंद सावंत कडाडून म्हणाले, तडीपार माणसाचं नाव घेऊ का?
Video: आदित्य ठाकरेंनी महिलेला मारलं, निशिकांत दुबेंच्या आरोपाने सभागृह तापलं, अरविंद सावंत कडाडून म्हणाले, तडीपार माणसाचं नाव घेऊ का?
Heat Wave: राज्यात पारा 44 अंशांच्या पार; पुढील तीन दिवस महत्त्वाचे, जगातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये महाराष्ट्रतील चार शहर, उष्णतेने नागरिक हैराण
राज्यात पारा 44 अंशांच्या पार; पुढील तीन दिवस महत्त्वाचे, जगातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये महाराष्ट्रतील चार शहर, उष्णतेने नागरिक हैराण
उष्णतेच्या तीव्रतेत जास्त काम करणे टाळा, 12 ते 4 उन्हात जाणे टाळा; गिरीश महाजनांचे नागरिकांना आवाहन
उष्णतेच्या तीव्रतेत जास्त काम करणे टाळा, 12 ते 4 उन्हात जाणे टाळा; गिरीश महाजनांचे नागरिकांना आवाहन
Embed widget