एक्स्प्लोर

Ranjit Kasle: धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न केला होता; रणजीत कासलेंचा खळबळजनक दावा

Ranjit Kasle: नव्याने प्रसारित केलेल्या एका व्हिडीओमध्ये रणजीत कासले यांनी हा खळबळजनक दावा केला आहे. 

Ranjit Kasle: राज्यात गेल्या काही दिवसांपासून बीड (Beed News) जिल्हा मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. बीडमध्ये घडलेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे राजकीय वातावरण देखील मोठ्या प्रमाणावर तापल्याचं पहायला मिळालं. याचदरम्यान बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले (Ranjit Kasle) यांनी केलेल्या दाव्यानं खळबळ उडाली आहे. 

वाल्मिक कराडचा (Walmik Karad) एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांनी केला होता. वाल्मिक कराड त्यांचे अंडी पिल्ली बाहेर काढणार होते. त्यामुळे ते खुनाचा आरोप सहरोपी झाले असते, असा दावा वादग्रस्त निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी केला आहे. नव्याने प्रसारित केलेल्या एका व्हिडीओमध्ये रणजीत कासले यांनी हा खळबळजनक दावा केला आहे. 

अनेक पुरावे दाबल्याने धनंजय मुंडे सहआरोपी होणार नाही- रणजीत कासले

धनंजय मुंडे यांना मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा असल्याने आणि संतोष देशमुख प्रकरणात अनेक पुरावे दाबल्याने धनंजय मुंडे सहआरोपी होणार नाही, असा दावाही रणजीत कासले यांनी केला आहे. तसेच महाराष्ट्र पोलिसांनी मला पकडून दाखवावे, असं आव्हान देखील रणजीत कासले यांनी दिले आहे. आपला कोणत्याही समाजाला दुखावण्याचा हेतू नाही बोलायचं ओघात काही आक्षेपार्ह विधान झाले मी माफी मागतो, असंही स्पष्टीकरणही रणजीत कासले यांनी अॅट्रोसिटी गुन्हा संदर्भात दिले. 

मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर होती- रणजीत कासले

मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर होती, असा खळबळजनक दावा देखील रणजीत कासले यांनी केला आहे. वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरसाठी पाच कोटी, दहा कोटी आणि 50 कोटींची ऑफर दिल्याचं रणजीत कासले म्हणाले. रणजीत कासले हे बीडच्या सायबर विभागात पोलीस निरीक्षक होते. मागील काही दिवसांपूर्वी त्यांना निलंबित करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी अनेक दावे त्यांच्या सोशल माध्यमातून केले आहेत. मी सायबर विभागात होतो. त्यांना माहिती होतं, हा माणूस करु शकतो. याच्यामध्ये दम आहे. मी माझा मोठेपणा सांगत नाही, नाहीतर सोडलेले कुत्रे माझ्या अंगावर भुंकतील, असंही रणजीत कासले म्हणाले. आता वाल्मिक कराड याच्या एन्काऊंटरबद्दल केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. सोशल माध्यमांवर देखील रणजीत कासले यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.

संबंधित बातमी:

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ऑर्डरशिवाय केसच्या इन्व्हेस्टिगेशनसाठी दुसऱ्या राज्यात शिरला, धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, कोण आहे रणजीत कासले?

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget