एक्स्प्लोर

Raigad Crime News: गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा! खासगी क्लासच्या शिक्षकाकडून दहावीच्या विद्यार्थ्यासोबत नको ते कृत्य; रायगडमधील संतापजनक घटना

Raigad Crime News: रायगडमध्ये गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. खासगी क्लासच्या शिक्षकाने दहावीच्या विद्यार्थ्यासोबत नको ते कृत्य केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलाय.

Raigad Crime News: समाजात गुरु-शिष्याचे नाते अत्यंत पवित्र मानले जाते. मात्र, रायगड (Raigad) जिल्ह्यातील महाडमध्ये (Mahad) या नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका नामांकित खासगी शिकवणी वर्गाच्या शिक्षकाने आपल्याच विद्यार्थ्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Raigad Crime News)

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना महाड येथील 'गांधी क्लासेस' मध्ये घडली आहे. या प्रकरणातील पीडित मुलगा सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीमध्ये शिकत होता. क्लासेसचा मालक आणि शिक्षक सुनील गांधी याने विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

Raigad Crime News: बेडरुममध्ये नेऊन अश्लील चाळे

पीडित विद्यार्थ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी शिक्षक सुनील गांधी हा शिकवणीच्या बहाण्याने मुलाच्या गुप्तांगाला स्पर्श करणे आणि अश्लील चाळे करत असे. इतकेच नव्हे तर, क्लासच्या वरच्या मजल्यावर असलेल्या स्वतःच्या बेडरुममध्ये नेऊन त्याने विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक आणि अश्लील कृत्य केल्याचेही समोर आले आहे. या सलग होत असलेल्या त्रासामुळे पीडित मुलगा प्रचंड मानसिक तणावाखाली होता. अखेर त्याने धाडस करून हा सर्व प्रकार समोर आणला.

Raigad Crime News: पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

या प्रकरणी पीडित मुलाच्या तक्रारीवरून महाड शहर पोलिसांनी तात्काळ दखल घेतली आहे. आरोपी शिक्षक सुनील गांधी याच्या विरोधात 'बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण' (POCSO Act) आणि भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षकासारख्या जबाबदार व्यक्तीनेच अशा प्रकारचे घृणास्पद कृत्य केल्याने पालकांमध्ये प्रचंड संताप आणि भीतीचे वातावरण आहे.

Raigad Crime News: महाड पोलिसांकडून तपास सुरु 

महाड शहर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आरोपीने अशा प्रकारे इतरही कोणत्या विद्यार्थ्यांची फसवणूक किंवा छळ केला आहे का? याचा शोध घेतला जात आहे. शैक्षणिक क्षेत्रातील या घटनेने रायगड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Solapur Crime News: नवीन मोबाईलसाठी धरला हट्ट, घरच्यांनी नकार देताच 21 वर्षीय तरुणाने संपवलं जीवन; सोलापूर हादरलं!

Ashok Kharat Nashik Crime News: अशोक खरातच्या बँक खात्यांचे 'ते' गूढ रहस्य काय? विशिष्ट तारखेला उघडली अनेक अकाऊंटस्; पोलीसही चक्रावले!

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
Pune Crime News: दारूसाठी पैसे न दिल्याने संतापला, पोटच्या मुलानेच आईचा काढला काटा, नंतर बॉडी घरात ठेवली अन्...; पुण्यातील हादरवणारी घटना
दारूसाठी पैसे न दिल्याने संतापला, पोटच्या मुलानेच आईचा काढला काटा, नंतर बॉडी घरात ठेवली अन्...; पुण्यातील हादरवणारी घटना
Pune Crime News: नवजात चिमुकलीचा नदीत आढळला मृतदेह, जन्मानंतर फेकल्याचा संशय; पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना
नवजात चिमुकलीचा नदीत आढळला मृतदेह, जन्मानंतर फेकल्याचा संशय; पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Embed widget