Raigad Crime news: माणगावच्या लॉजवरील तरुणीच्या मृतदेहाबाबत धक्कादायक खुलासा; प्रेमप्रकरण अन्...; आरोपीला नवी मुंबईतून बेड्या
Raigad Crime News: मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या एका लॉजमध्ये 22 वर्षीय तरुणीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता.

Raigad Crime News: मुंबई-गोवा महामार्गावरील लोणेरे येथील 'ओमकार रेसिडेन्सी' या लॉजिंगमध्ये काल उघडकीस आलेल्या तरुणीच्या हत्याकांडामुळे रायगड जिल्हा हादरून गेला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृत तरुणीची ओळख पटवली असून, पल्लवी मोरे (वय 22, रा. वडगाव बौद्धवाडी, ता. माणगाव) असे तिचे नाव आहे. गोरेगाव पोलिसांनी याप्रकरणी आरोपीविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, संशयित आरोपीला नवी मुंबईतून ताब्यात घेतले आहे.
Raigad Crime News: नेमकी घटना काय?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने पल्लवीला लोणेरे येथील ओमकार लॉजमध्ये नेले होते. तिथे त्यांच्यात वाद झाला आणि त्याचे पर्यावसान हत्येत झाले. काल पल्लवीचा मृतदेह लॉजमधील खोलीत विवस्त्र अवस्थेत आढळून आला, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली. प्रेमप्रकरणातून हा टोकाचा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
Raigad Crime News: पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या टीमने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढला. आरोपी हा मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील असून हत्येनंतर तो फरार झाला होता. मात्र, रायगड पोलिसांनी विशेष पथके तयार करून त्याला नवी मुंबई परिसरातून फिल्मी स्टाईलने अटक केली आहे.
Raigad Crime News: गंभीर कलमान्वये गुन्हा नोंद
केवळ हत्याच नाही, तर या प्रकरणात अत्याचार झाल्याचा संशय असल्याने पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांसह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत देखील गुन्हा दाखल केला आहे. पल्लवीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अधिक बाबी स्पष्ट होतील. दरम्यान, या घटनेमुळे रायगड जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. भरदिवसा अशा प्रकारची घटना घडल्याने कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या






















