एक्स्प्लोर

Nanded Crime News: मोबाईलच्या स्टेटसवरुन पोलिसांना 'कबुतरा'चा माग काढला, नांदेडच्या अर्जितसिंह चव्हाणचा मारेकरी शाहरुखला अटक, बड्या राजकारण्यांशी कनेक्शन

Nanded Crime News: शाहरुख कबुतर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे, त्याचे नांदेडमध्ये विविध पक्षातील लोकांसोबत राजकीय कनेक्शन आहे, अशी माहिती देखील समोर आली आहे.

नांदेड : नांदेडमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या ई-स्क्वेअरच्या बाजूला ट्रिपल मर्डर हत्याकांड (Nanded Crime News) झाले होते. त्यात अर्जितसिंघ चव्हाण, शेख अरबाज आणि आवेश यांच्या खून झाला होता. या प्रकरणी दोन्ही गटातील 6 आरोपीला पोलिसांनी अटक करण्यात (Nanded Crime News) आली आहे, त्यातील फरार असलेला शाहरुख उर्फ कबुतर (रा. देगलूर नाका) याला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. शाहरुख कबुतर हा इंस्टाग्रामवर (Nanded Crime News) रोज स्टेटस ठेवत होता, तो सोशल मिडीयावर सक्रिय होता,तपासादरम्यान तो हैदराबादमध्ये असल्याची स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली, त्याचा ठाव ठिकाणा पत्ता काढत त्याचा साथीदारा शेख आबेद सोबत त्याला अटक करण्यात आली आहे. शाहरुख कबुतर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे, त्याचे नांदेडमध्ये विविध पक्षातील लोकांसोबत राजकीय कनेक्शन आहे, अशी माहिती देखील समोर आली आहे. (Nanded Crime News)

Nanded Crime News : शाहरुख कबुतर हा इंस्टाग्रामवर रोज स्टेटस...

शाहरुख कबुतर हा इंस्टाग्रामवर (Nanded Crime News) रोज स्टेटस ठेवत होता, तो सोशल मिडीयावर सक्रिय होता,तपासादरम्यान तो हैदराबादमध्ये असल्याची स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली, त्याचा ठाव ठिकाणा पत्ता काढत त्याचा साथीदारा शेख आबेद सोबत त्याला अटक करण्यात आली आहे. 

Nanded Crime News: नेमकं प्रकरण काय?

नांदेडमध्ये 3 एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास तीन जणांची हत्या (Nanded Crime news) झाल्याची थरारक घटना घडली होती. नांदेडमधील डी मार्ट परिसरामध्ये असलेल्या ई-स्क्वेअरच्या बाजूला हे हत्याकांड घडलेलं आहे. अर्जितसिंघ चव्हाण याचा या घटनेत मृत्यू झाला आहे. ई-स्क्वेअरच्या बाजूला रात्री दीड वाजण्याच्या सुमारास जुन्यावादाच्या (Nanded Crime news) कारणातून काही गुन्हेगारांमध्ये तलवार आणि खंजीराने मारहाण झाली, या घटनेत सय्यद आवेज, सय्यद खलील आणि घनश्याम रेड्डी, मोहमद अरबाज आणि इतर अज्ञात हल्लेखोरांनी (Nanded Crime news) अर्जितसिंघ चव्हाणवर हल्ला केला. धारदार शस्त्रांनी वार केल्याने अर्जितसिंघ चव्हाण (वय 25) याचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्यात जखमी सय्यद आवेज सय्यद खलील आणि आणखी एका युवकाला पोलिसांनी सरकारी रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर अर्जितसिंघ चव्हाणचा भाऊ चाकू घेऊन दवाखान्यात गेला आणि जखमी असलेल्या सय्यद आवेज सय्यद खलील (वय 27) आणि मोहंमद अरबाज मोहंमद फारुख (वय 23) या दोघांवरती दवाखान्यातच चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात दोघांचाही मृत्यू झाला.(Nanded Crime news) 

Nanded Crime news: अर्जितसिंघचा मृतदेह होता, त्याच ठिकाणी आवेजवर वार...

यामधील दोघेजण घटनास्थळी गंभीर जखमी झालेले होते, आवेज देखील गंभीर जखमी होता, त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं, त्यानंतर त्याला विष्णुपुरी येथे रेफर करण्यात आले, तिथे तो खूप गंभीर स्वरूपाचा जखमी अवस्थेत गेला होता, तिथे आधीच अर्जितसिंघ चव्हाणचे भाऊ आणि वडील गेलेले होते, अर्जितसिंघ चव्हाणचा मृतदेह तिथे होता, त्याच ठिकाणी आवेज वर तिथे वार झाला, तो आधी ही गंभीर जखमी होता, शेवटी त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला, यामध्ये दोन एफआयआर झाले आहेत, ते दोन्ही क्रॉस आहेत, भाग्यनगर पोलीस स्टेशनमध्येच दोन क्रॉस एफआयआर दाखल होतील. एक आहे ती अर्जितसिंघ चव्हाणच्या फॅमिलीची आणि दुसरी आवेज किंवा अरबाज या दोघांपैकी एकाची एफआयआर घेऊन मर्डरचे गुन्हे दाखल करणार आहोत, अशी माहिती पोलिसांनी दिली होती. 

Nanded Crime news: तो धुरंधर सिनेमा बघून बाहेर आला...

या वादामध्ये पहिल्यांदा मृत्यमुखी पडलेला अर्जितसिंघ चव्हाण हा बुलेट गाडीवर आला होता, त्याच्यासोबत आणखी दोन जण होते.  तो धुरंधर सिनेमा बघून बाहेर आला होता, याच दरम्यान ही वादाची घटना घडली आहे, 4 आरोपी ताब्यात आहेत, अशी माहिती देखील पोलिसांनी दिली होती.

 

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Embed widget