Purvanchal Expressway Couple Romance Video: एक्सप्रेस वेवर कारमध्ये नवविवाहित जोडप्यांचा रोमान्स; खासगी व्हिडीओ टोल मॅनेजरने रेकॉर्ड केला अन् नको नको ते केलं!
Purvanchal Expressway Couple Romance Video: उत्तर प्रदेशमधील पूर्वाचल एक्सप्रेसवेवरील टोल नाक्यावर जोडप्यांचा रोमान्स करतानाचा कारमधील व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

Purvanchal Expressway Couple Romance Video: उत्तर प्रदेशमधील पूर्वाचल एक्सप्रेसवेवरील टोल नाक्यावर जोडप्यांचा रोमान्स करतानाचा कारमधील व्हिडीओ (Purvanchal Expressway Couple Romance Video) समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. टोल प्लाझावरील एटीएमएसच्या व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या आशुतोष सरकारने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून जोडप्याचे खासगी क्षणांचे व्हिडीओ फुटेज काढले आणि सोशल मीडियावर व्हायरल केल्याचं समोर आले आहे. सदर प्रकरणी आशुतोषवर कारवाई देखील करण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय? (Purvanchal Expressway Couple Romance Video)
25 ऑक्टोबर रोजी लखनौमधील एक नवविवाहित जोडपे उत्तर प्रदेशमधील पूर्वाचल एक्सप्रेसवेवर प्रवास करत होते. यादरम्यान, नवविवाहित जोडपे त्यांची कार थांबवून रोमान्स करत होते. त्यादरम्यान आशुतोषने त्यांचा व्हिडीओ बनवला आणि दुचाकीवरून त्यांच्यापर्यंत पोहोचला. आशुतोषने जोडप्यांना धमकी देऊन 32000 रुपये उकळले. पैसे घेतल्यानंतरही तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला.
आशुतोषने अनेकवेळा केलाय सीसीटीव्हीचा गैरवापर- (Expressway Couple Romance Video)
आशुतोषने टोल प्लाझाच्या आसपासच्या तीन गावातील अनेक महिला आणि मुलींचे फुटेज बनवले आहेत आणि त्यांना ब्लॅकमेल केल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या FIR मध्ये लिहिले आहे की, टोल प्लाझावर ATMS अंतर्गत ड्युटीवर असताना मॅनेजर आशुतोष सरकारने कॅमेऱ्याचा गैरवापर केला आणि त्याचा दुरुपयोग केला.
आशुतोष सरकारवर कारवाई- (Expressway Couple Romance In Car Video)
एक्सप्रेस वे वर थांबून रोमान्स करणारे किंवा इंटिमेट होणारे जोडप्याचे खासगी व्हिडीओ आशुतोषने बेकायदेशीररित्या सिस्टीममधून काढले. एवढेच नाही, तर या व्हिडीओद्वारे तो संबंधित कपलकडून अवैध पैशांची मागणी (Extortion) करू लागला. पैसे दिल्यानंतरही त्याने हे खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले. या अनैतिक कृत्यामुळे अनेक पीडितांचे आयुष्य धोक्यात आले. अखेरीस, 2 डिसेंबर रोजी काही पीडितांनी थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार दाखल केली. प्रकरण तापताच, तातडीने कारवाई करत टोल व्यवस्थापनाने आरोपी आशुतोष सरकारला टर्मिनेट केले आहे.
























