एक्स्प्लोर

Pune Crime News : लग्नात हुंडा दिला नाही म्हणून मानसिक छळ, हताश झालेल्या विवाहतेची आत्महत्या

Crime News : लग्नात हुंडा दिला नाही म्हणून महिलेचा मानसिक छळ केला जात होता. त्यामुळे हताश झालेल्या 21 वर्षीय महिलेने गळफास घेत आत्महत्या केली आहे.

Pune Latest Crime News Update : शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात लाजीरवाणी घटना (Pune Crime News) घडली आहे. लग्नात हुंडा दिला नाही म्हणून महिलेचा मानसिक छळ केला जात होता. त्यामुळे हताश झालेल्या 21 वर्षीय महिलेने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रुकय्या शहनवाज शेख असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पुण्यातील दत्तवाडी मधील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये (Pune Dattawadi Police Station) तक्रार दाखल झाली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

पुण्यातील दत्तवाडी परिसरात 21 वर्षीय महिलेनं आत्महत्या केली आहे. लग्नात हुंडा दिला नाही म्हणून सासरच्या मंडळीकडून दररोज मानसिक छळ केला जात होता, त्यामुळे हताश झालेल्या विवाहित महिलेनं गळफास घेत आत्महत्या केली. रुकय्या शहनवाज शेख  असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या संदर्भात रुकय्या चे वडील अल्ताफ अन्सारी यांनी दत्तवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.  आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रुकय्याचे पती आणि सासू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

9 महिन्यांपूर्वी रुकय्या आणि तिचे पती यांचा विवाह झाला होता. विवाहच्या काहीच दिवसात रुकय्याचा पती आणि सासू यांनी तिला हुंडा दिला नाही म्हणून मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली. लग्नामध्ये तिच्या माहेरच्या लोकांनी हुंडा दिला नाही, या गोष्टीवरून तिला अनेक वेळा हिणवले जात होते. तसेच तिचा वारंवार मानसिक छळ केला जात  होता. लग्नात दिलेल्या भेट वस्तू या भेट वस्तू नसून त्या भिक घातल्या आहेत, असे म्हणून रुकय्या यांना पती आणि सासू यांनी मिळून अनेक वेळा घालून पाडून बोलले जात होते.  तसेच तिचा वारंवार मानसिक छळ केला जायचा. या सर्व जाचाला कंटाळून रुकय्याने तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. 

21 वर्षीय रुकय्या हिच्या वडिलांनी याप्रकरणी दत्तवाडी पोलीस तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्यास सुरुवात केली. रुकय्याचे पती शहानवाज कासिम शेख याला पोलिसांनी अटक केली असून तिची सासू राजमा शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तवाडी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. 21 वर्षीय महिलेला सासरच्या जाचाला कंटाळून जीव द्यावा लागला, त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.  

आणखी वाचा :
अटक करायला आलेल्या पोलिसांवर सोडला कुत्रा, सोबत ऑक्सिजन मशिन घेऊन फिरायचा; अशी झाली क्रिकेट बुकी जयसिंघानीला अटक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Marathwada: 'दुष्काळी' मराठवाड्यावर आभाळमाया! आठही जिल्ह्यांत पावसाने शंभरी ओलांडली, कुठे किती झाला पाऊस?
'दुष्काळी' मराठवाड्यावर आभाळमाया! आठही जिल्ह्यांत पावसाने शंभरी ओलांडली, कुठे किती झाला पाऊस?
Mumbai Local :मुंबईकरांसाठी मोठी बातमी, सलग पाच दिवस पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल रद्द होणार, जाणून घ्या नेमकं कारण...
मोठी बातमी, पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल 4 ऑक्टोबरपर्यंत रद्द, जाणून घ्या कारण...
Maharashtra Assembly Election 2024: भाजपच्या संजय कुटेंविरोधात वंचितचा डाव, जळगाव जामोदमधून डॉ.प्रवीण पाटील रिंगणात?
भाजपच्या संजय कुटेंविरोधात वंचितचा डाव, जळगाव जामोदमधून डॉ.प्रवीण पाटील रिंगणात?
CM Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांचाही आनंद दिघेंप्रमाणे घात करण्याचा डाव होता, शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
एकनाथ शिंदे यांचाही आनंद दिघेंप्रमाणे घात करण्याचा डाव होता, शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 30 सप्टेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सVijay Wadettiwar on  Dharamrao Baba Atram : आत्रम यांच्या मुलीचा पराभव होईल - विजय वडेट्टीवारShaikh Subhan Ali :

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Marathwada: 'दुष्काळी' मराठवाड्यावर आभाळमाया! आठही जिल्ह्यांत पावसाने शंभरी ओलांडली, कुठे किती झाला पाऊस?
'दुष्काळी' मराठवाड्यावर आभाळमाया! आठही जिल्ह्यांत पावसाने शंभरी ओलांडली, कुठे किती झाला पाऊस?
Mumbai Local :मुंबईकरांसाठी मोठी बातमी, सलग पाच दिवस पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल रद्द होणार, जाणून घ्या नेमकं कारण...
मोठी बातमी, पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल 4 ऑक्टोबरपर्यंत रद्द, जाणून घ्या कारण...
Maharashtra Assembly Election 2024: भाजपच्या संजय कुटेंविरोधात वंचितचा डाव, जळगाव जामोदमधून डॉ.प्रवीण पाटील रिंगणात?
भाजपच्या संजय कुटेंविरोधात वंचितचा डाव, जळगाव जामोदमधून डॉ.प्रवीण पाटील रिंगणात?
CM Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांचाही आनंद दिघेंप्रमाणे घात करण्याचा डाव होता, शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
एकनाथ शिंदे यांचाही आनंद दिघेंप्रमाणे घात करण्याचा डाव होता, शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
Khatron Ke Khiladi 14: करण वीर मेहरा ठरला खतरों के खिलाडी 14 चा विजेता; नव्याकोऱ्या कारसह, लाखोंच्या प्राईज मनीचा ठरला मानकरी
करण वीर मेहरा ठरला खतरों के खिलाडी 14 चा विजेता; नव्याकोऱ्या कारसह, लाखोंच्या प्राईज मनीचा ठरला मानकरी
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Embed widget