जळणारी चिता, बाजूला रक्तानं माखलेली लाकडं; पोलिसांची ट्युब पेटली अन् पुण्यातील गुन्ह्याचा उलगडा, कशा आवळल्या आरोपींच्या मुसक्या?
Pune Crime Updates : चितेजवळ सापडलेल्या लाकडावरील रक्ताच्या डागावरुन खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यास ग्रामीण पोलिसांनी यश आले आहे. इंदापूरमधील तावशी गावात ही घटना घडली होती.

Pune Crime: पुणे : पुण्यात (Pune Crime News Updates) घडलेल्या एका खुनाचा छडा पोलिसांनी (Pune Police) अगदी शिताफिनं लावला आहे. खुनाचा गुन्हा घडला, पण त्यासंदर्भात पोलिसांच्या हाती कोणताच महत्त्वाचा पुरावा लागला नव्हता. अशातच कोणताही सक्षम पुरावा नसताना पोलिसांना खुनाचा गुन्हा उघड केला. चितेजवळ सापडलेल्या लाकडावरील रक्ताच्या डागावरुन खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यास ग्रामीण पोलिसांनी यश आले आहे. इंदापूरमधील तावशी गावात ही घटना घडली होती.
परभणीच्या गंगाखेडमध्ये राहणाऱ्या हरिभाऊ धुराजी जगताप (वय 74) असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव होतं. पोलिसांनी या गुन्हाचा छडा लावत साताऱ्यातील फलटण इथे राहणारे हरिभाऊ जगतापांचे मारेकरी दादासाहेब मारुती हरिहर (वय 30) आणि त्याचा मित्र विशाल सदाशिव खिलारे (वय 23) यांना अटक केली आहे.
नेमकं काय घडलेलं?
वालचंदनगर परिसरात तावशी गावातील स्मशानभूमीत एक मृतदेह जळत आहे. चितेजवळ पडलेल्या लाकडावर मोठ्या प्रमाणात रक्ताचे डाग पडले आहेत, अशी माहिती गावच्या पोलीस पाटलांनी 16 नोव्हेंबरला पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केला. तिथे स्मशानभूमीतील लोखंडी जाळीवर पूर्णपणे जळालेली हाडं, तसेच काही अंतरावर रक्त पडलेले दिसत होते. रक्ताचे डाग ताजे असल्यानं हा खूनाचा प्रकार असू शकतो, असा संशय पोलिसांना होता. पोलिसांनी तात्काळ कसून तपास सुरू केला.
अखेर पोलिसांना यश, गुन्हाचा छडा लागला...
पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर जळणाऱ्या चितेजवळ सापडलेली लाकडं एका वखारीमधील असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर फलटण येथील गुणवरे गावातील एका वखारीत पोलिसांचं पथक पोहोचलं. रोपी दादासाहेब आणि विशाल हे दोघे अंत्यविधीसाठी लाकडे घेऊन गेल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा त्यांनी खुनाची कबुली दिली.जगताप याच्या नात्यातील एका महिलेकडे वाईट नजरेने बघत असल्याचा संशय आरोपी दादासाहेबला होता.त्यामुळे त्याने मित्र विशाल याच्याशी संगनमत करून जगताप यांचा खून करण्याचे ठरवलं. जगताप यांना 15 नोव्हेंबर रोजी माण तालुक्यातील सतोबाची यात्रा इथे जाऊ, असं त्यांनी सांगितलं. प्रवासात आरोपींनी इंदापूर येथील तावशी गावातील स्मशानभूमीजवळ गाडी थांबवली. तिथे जगताप यांच्या डोक्यात दांडके मारुन त्यांचा खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं त्यांनी मृतदेह स्मशानभूमीत जाळून टाकला.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
