![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Pune Crime : महिलेकडून झोपलेल्या पतीचा गळा आवळून खून, गळफास घेतल्याचा बनाव रचला
महिलेने झोपलेल्या पतीचा दोरीने गळा आवळून खून केला आणि त्यानंतर त्याने आत्महत्या केली, असा बनाव रचला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पत्नीला अटक केली आहे.
![Pune Crime : महिलेकडून झोपलेल्या पतीचा गळा आवळून खून, गळफास घेतल्याचा बनाव रचला Pune Crime news Woman strangles sleeping husband, then pretended he commits suicide by hanging himself Pune Crime : महिलेकडून झोपलेल्या पतीचा गळा आवळून खून, गळफास घेतल्याचा बनाव रचला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/08/cc83b5463f40bcece10622232d352e6b_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : राहत्या घरी झोपेत असलेल्या पतीचा दोरीने गळा आवळून खून करुन नंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असा बनाव रचल्याप्रकरणी एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातील उत्तमनगर परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला. रमेश मिसे असं हत्या झालेल्या पतीचं नाव आहे. विशेष म्हणजे असाच प्रकार काही दिवसांपूर्वी कात्रज भागात घडला होता
रमेश मिसे आणि नंदिनी मिसे या दाम्पत्यामध्ये काही दिवसांपूर्वी भांडण झालं होतं. पती वारंवार चारित्र्यावर संशय घेत असल्याचा राग नंदिनी मिसेच्या मनात होता. पती दारुच्या नशेत झोपला असताना नंदिनीने दोरीने गळा आवळून त्याचा खून केला. त्यानंतर नंदिनीने त्याच्या गळ्यात टाकलेली दोरी लोखंडी हुकाला अडकवली आणि पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव रचला.
पोस्टमॉर्टेममध्ये मात्र रमेश मिसेचा गळा आवळून मृत्यू झाला, असा डॉक्टरांचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला. पोलिसांनी चौकशी केल्यावर मृताची पत्नी नंदिनीने आपणच रमेशचा खून करुन त्याने आत्महत्या केल्याचा बनाव रचल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी नंदिनीवर हत्येचा गुन्हा नोंदवून तिला अटक केली आहे.
कात्रजमध्येही पत्नीकडून पतीचा खून नंतर आत्महत्येचा बनाव
कात्रजमध्ये काही दिवसांपूर्वीच असाच प्रकार घडला होता. पती चारित्र्यावर संशय घेऊन भांडण करत असल्याच्या रागातून पत्नीने पतीचा गळा आवळून खून केला. कोणालाही संशय येऊ नये म्हणून पतीने आत्महत्या केल्याचा बनाव रचला. त्याचा मृतदेह घराजवळील मंदिरात लटकवला, जेणेकरुन त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असावी असं वाटेल. परंतु शवविच्छेदन अहवालात मारहाण आणि गळा आवळून खून झाल्याचं समोर आलं. यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी तपास करत आरोपी पत्नीला अटक केली.
हे ही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)