Pune Crime News : अल्पवयीन मुलीला लॉजवर डांबून गिऱ्हाईक पाठवले, बापाने घेतलेले उसने पैसे वसूल केले, दाम्पत्याचे कृत्याने पुणे हादरलं!
वडिलांच्या आजारपणासाठी उसने घेतलेले पैसे दिले नाहीत म्हणून एका अल्पवयीन मुलीला 15 दिवस डांबून ठेवून तिच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय (Pune rape) करून घेतल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे.
![Pune Crime News : अल्पवयीन मुलीला लॉजवर डांबून गिऱ्हाईक पाठवले, बापाने घेतलेले उसने पैसे वसूल केले, दाम्पत्याचे कृत्याने पुणे हादरलं! Pune Crime News minor girl held hostage in lodge for 15 days and raped to pay fathers debt crime case File against husband and wife Pune Crime News : अल्पवयीन मुलीला लॉजवर डांबून गिऱ्हाईक पाठवले, बापाने घेतलेले उसने पैसे वसूल केले, दाम्पत्याचे कृत्याने पुणे हादरलं!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/15/0a9898cb53bbe555f9eac41865fa5b801707984950701442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : पुण्यात गुन्हेगारी वाढत असताना आणि रोज लैंगिक छळाच्या (Pune Crime News) घटना ताज्या असताना पुण्याला हादरवणारं कृत्य पुण्यातील एका दाम्पत्याने केलं आहे. वडिलांच्या आजारपणासाठी उसने घेतलेले पैसे दिले नाहीत म्हणून एका अल्पवयीन मुलीला 15 दिवस डांबून ठेवून तिच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय (Pune rape) करून घेतल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी याप्रकरणी पती-पत्नीला अटक केली आहे.
नेमका काय प्रकार घडला?
आरोपी असलेल्या पती-पत्नीक़डून मुलीच्या वडिलांनी आजारपणासाठी पैसे घेतले होते. साधारण 30 हजार रुपये उसने घेतले होते. मात्र, त्यांना पैसे परत करता आले नाहीत. याचा काटा काढण्यासाठी आरोपी पती पत्नीने आघोरी प्रकार केला. त्याआरोपींनी मुलीला जबरदस्तीने पळवून नेत तिला के.के.मार्केट येथील एका लॉजमध्ये 10 ते 15 दिवस डांबून ठेवलं. त्यानंतर आरोपीने मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. हा सगळा प्रकार आरोपीच्या पत्नीला माहिती असूनसुद्धा मुलीवर लैंगिक अत्याचार केले. ‘माझे पैसे दे, नाही दिले तर कुठूनही वसूल करुन दे, तुला सोडणार नाही’ अशी दमदाटी केली. त्यानंतर मात्र या आरोपीने आपली हद्द पार केली. लॉजवर राहायला येणाऱ्या ग्राहकाकडून पैसे घेवून वेश्याव्यवसाय करायला भाग पाडला. लॉजमध्ये आलेल्या प्रत्येक ग्राहकाला त्याने विचारणा केली आणि ज्यांनी होकार दिला त्यांच्याकडून पैसे घेत थेट मुलीच्या खोलीत पाठवून अत्याचार करायला सांगितला.
याप्रकरणी एका दाम्पत्यावर भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police Station) पोक्सो (Pocso Act) आणि पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. महिलेला अटक केली आहे. तर आरोपी पती फरार झाला आहे. पुनम आकाश माने आणि पती आकाश सुरेश माने अशी आरोपींची नाव आहे. हा प्रकार ऑक्टोबर 2023 ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
पती-पत्नीच्या कृत्यानं पुणे हादरलं!
मागील काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारी आणि बलात्काराच्या घटनेच चांगलीच वाढ झाली आहे. शिक्षक, डॉक्टर यांनीदेखील लैंगिक छळ केल्याच्या घटना समोर आल्या आहेत किंवा प्रेमसंबंधातून बलात्कार झाल्याचे प्रकारही समोर आले आहेत. मात्र पती-पत्नी दोघांनी मिळून या 17 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्याची घटना पहिल्यांदाच पुढे आली आहे. या दोघांनी केलेल्या या कृत्यानं पुणे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
इतर महत्वाची बातमी-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)