Pune Crime : पुण्यात माजी सरपंचाचं घृणास्पद कृत्य, अल्पवयीन मुलीवर लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार
Pune Crime : पुणे जिल्ह्यातील एका माजी सरपंचाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
Pune Crime : पुण्यात (Pune) लैंगिक अत्याचारांच्या (Sexual Assault) घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. पुणे जिल्ह्यातील एका माजी सरपंचाने (Formar Sarpanch) अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. संतोष नझिरकर (वय 40 वर्षे) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. संतोष नझिरकर हा पुरंदर तालुक्यातील नझिरे गावाचा माजी सरपंच आहे.
भारती विद्यापीठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष नझिरकर याची पीडित मुलीशी व्हॉट्सअॅप या मेसेजिंग अॅपच्या माध्यमातून ओळख झाली होती. 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी आणि माजी सरपंच यांच्यात काही दिवसातच मैत्री झाली. त्यानंतर संतोष नझिरकरने बुधवारी (23 नोव्हेंबर) बाहेर जेवायला जाऊ असं सांगत त्याने पीडित मुलीला कात्रज इथे असलेल्या एका लॉजवर नेलं आणि तिच्यावर बलात्कार नेला.
यानंतर घाबरलेल्या मुलीने रुममधील बाथरुममध्ये जाऊन आईला फोन केला आणि घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. तसंच तिने आईला तिचं लोकेशन देखील पाठवलं. तिच्या आईने तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी थेट लॉजवर धाड टाकली. यावेळी पोलिसांनी संतोष नझिरकर याला रंगेहाथ पकडलं. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये बलात्कार तसंच पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
पुण्यात सावत्र बापाकडून 11 वर्षीय मुलीवर लैंगिक शोषण
काही दिवसांपूर्वी सावत्र बापानेच अकरा वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. पुण्यातील दत्तवाडी परिसरात ही धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी 32 वर्षीय सावत्र बापावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 11 वर्षीय मुलीच्या आईने घडल्या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी सावत्र बापावर कारवाई केली आहे. आरोपी हा तक्रारदार महिलेचा दुसरा पती आहे. महिलेची पहिल्या पतीपासून झालेली अकरा वर्षाची मुलगी त्यांच्यासोबत राहते. 9 नोव्हेंबरला घरात कोणीच नव्हतं. या सगळ्याचा फायदा नराधम सावत्र बापाने घेतला. 11 वर्षीय मुलगी घरात एकटी असल्याची संधी साधून तिच्यासोबत अश्लील कृत्य करत तिचं लैंगिक शोषण केलं. हा सगळा प्रकार समजताच आईने पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत बापावर गुन्हा दाखल केला आहे.