दोन महिन्यांपूर्वी बहिणीचा आळंदीत प्रेमविवाह, मावस भाऊ संतापानं लाल झाला, सलूनमध्ये जात दाजीला... पुण्यात धक्कादायक प्रकार
दोन महिन्यांपूर्वी दत्तात्रय आणि स्नेहा यांनी आळंदी येथे लग्न केलं .मात्र मुलीच्या कुटुंबीयांना हा प्रेमविवाह मान्य नव्हता .

Pune crime: पुण्यात शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी गावात प्रेमविवाह केल्याच्या रागातून एका तरुणावर थेट कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात 22 वर्षीय दत्तात्रय वाघ हा तरुण गंभीर जखमी झाला असून, दोघा हल्लेखोरांना गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या हवाली केलं आहे. अटक आरोपींची नावे शारुख शेख (26) आणि प्रशांत साठे (19) अशी असून, मुख्य आरोपी जीवन गायकवाड फरार आहे.
पुण्यात ऑनर किलिंगच्या वारंवार होणाऱ्या घटना समोर येत असताना पुण्यातील शिरूर तालुक्यात धक्कादायक घटना घडलीय. प्रेम विवाह केल्याच्या रागातून तरुणावर मुलीच्या मावस भावासह नात्यातील इतर व्यक्तींनीच कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याचं समोर आलंय . दत्तात्रय हौशीराम वाघ ( 22) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे.
दोन महिन्यांआधी आळंदीत प्रेमविवाह
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दत्तात्रय वाघ आपली पत्नी स्नेहा हिचासह टाकळीहाजी येथे वास्तव्यास आहे . या परिसरातच त्याचे सलूनचे दुकान आहे . दोन महिन्यांपूर्वी दत्तात्रय आणि स्नेहा यांनी आळंदी येथे लग्न केलं .मात्र मुलीच्या कुटुंबीयांना हा प्रेमविवाह मान्य नव्हता .त्यामुळेच मुलीच्या नातेवाईकांनी वारंवार दत्तात्रय ला जीवे मारण्याचा धमक्याही दिल्या होत्या .याबाबत पोलिसांमध्ये तक्रारी देखील दाखल झाले आहेत .
दुकानाची तोडफोड, जीवघेणा हल्ला
दत्तात्रय वाघ त्याच्या सलूनमध्ये गिऱ्हाईकाचे केस कापत असताना तरुणीचा भाऊ व इतर काही लोक दुकानात घुसले .त्यांनी दुकानाच्या काचा फोडल्या . नासधूस केली .त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतात त्यांनी लोखंडी कोयत्याने दत्तात्रय वाघ याच्यावर जीवघेणा वार करून गंभीर जखमी केले .त्याला जीवे मारण्याची धमकी देऊन तीनही आरोपी दुचाकीवरून रांजणगावच्या दिशेने निघाले .आरोपी पळून जात असताना गावकऱ्यांनी पाठलाग करून दोघांना पकडले . व पोलीस ठाण्यात आणले .पोलिसांनी आरोपी तरुणांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी हल्ला केल्याची कबुली दिली .यात शिरूर ग्रामीण पोलिसांनी तिघांविरोधात गंभीर दुखापत तोडफोड व जीव घेण्याचा प्रयत्न या गंभीर कलमानखाली गुन्हा दाखल केलाय . हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दत्तात्रय वाघ याला शिरूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे .
हेही वाचा
अर्धनग्न अवस्थेत मनसे नेत्याच्या मुलाचा धिंगाणा; रिल्सस्टार राजश्री मोरेच्या कारला धडक, धमकीही दिली























